AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निवृत्तीनंतर शिखर धवन आयपीएल 2025 मध्ये खेळणार का? शेअर केलेल्या व्हिडीओतच दडलंय रहस्य

टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवनने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. पण शिखर धवनने आयपीएल बाबतची भूमिका अजूनही जाहीर केलेली नाही. त्यामुळे त्याचे चाहते संभ्रमात आहेत. असं असताना त्याच्याच व्हिडीओत एक रहस्य दडलेलं आहे.

निवृत्तीनंतर शिखर धवन आयपीएल 2025 मध्ये खेळणार का? शेअर केलेल्या व्हिडीओतच दडलंय रहस्य
| Updated on: Aug 24, 2024 | 9:55 PM
Share

सलामीवीर शिखर धवनने त्याच्या चाहत्यांना आणि क्रीडाप्रेमींना शनिवारी सकाळी धक्का दिला. 24 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं. जवळपास 14 वर्षे शिखर धवनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाजवली. खरं तर शेवटच्या टप्प्यात शिखर धवनला संघात स्थान मिळणं कठीण झालं होतं.  युवा खेळाडूंची फळी पाहता त्याला पुनरागमन करणं कठीण झालं होतं. आता शिखर धवन आयपीएलमध्ये खेळणार की नाही असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. मागच्या पर्वात शिखर धवनने पंजाब किंग्सची धुरा सांभाळली होती. पण दुर्दैवाने सुरुवातीचे सामने खेळल्यानंतर दुखापतग्रस्त झाला आणि संघाबाहेर बसण्याची वेळ आली. त्यामुळे या आयपीएलमध्ये खेळणार की नाही असा प्रश्न विचारला जात आहे. त्याचं हे गुपित त्याने शेअर केलेल्या व्हिडीओतच दडलं आहे. पण आयपीएलबद्दल बोलल्याचं तर व्हिडीओत कुठे ऐकलं नाही. मग त्याने कसा खुलासा केला ते जाणून घेऊयात.

खरं तर शिखर धवनने निवृत्तीबाबत स्पष्ट काय ते व्हिडीओत सांगितलं आहे. आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे. पण त्याने आयपीएलचा कुठेही उल्लेख केलेला नाही. म्हणजेच आयपीएलच्या या पर्वात खेळण्यासाठी उपलब्ध असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे गब्बर अर्थात शिखर धवनची फटकेबाजी पाहण्याची संधी क्रीडारसिकांना मिळणार आहे. आता ही बाब स्पष्ट झाली असली तरी मेगा लिलावामुळे चिंता वाढली आहे. पंजाब किंग्स त्याला रिटेन करेल की नाही हा प्रश्न आहे. कारण मागच्या पर्वात शिखर धवन दुखापतग्रस्त झाला आणि संघाला फटका बसला. त्यामुळे कर्णधारपदाची धुरा सॅम कुरनकडे सोपण्यात आली. शेवटी तोही मायदेशी परतला आणि शशांक सिंहने कर्णधारपद भूषवलं. शिखर धवनचं वय आणि फॉर्म पाहता त्याला संघात ठेवणार की नाही हा देखील प्रश्न आहे.

शिखर धवनने शेवटचा वनडे सामना 10 डिसेंबर 2022 रोजी बांगलादेशविरुद्ध खेळला होता. सप्टेंबर 2018 मध्ये शेवटची कसोटी आणि 2021 मध्ये शेवटचा टी20 सामना खेळला होता. आयपीएलमध्ये मागच्या पर्वात 9 एप्रिलला शेवटचा सामना हैदराबाद विरुद्ध खेळला. या तारखा पाहता शिखर धवनला संघ निवडीत स्थान मिळालं नाही हे निश्चित होतं.

Follow Us
धनंजय मुंडेच्या हातात आता 2-3 महिनेच... करुणा मुंडेच्या दाव्याने राजका
धनंजय मुंडेच्या हातात आता 2-3 महिनेच... करुणा मुंडेच्या दाव्याने राजका.
ठाकरे खरंच फडणवीसांना भेटले होते का? अंबादास दानवेंनी अखेर सांगितलंच..
ठाकरे खरंच फडणवीसांना भेटले होते का? अंबादास दानवेंनी अखेर सांगितलंच...
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील गोळीबारामागे नेमका कुणाचा हात? मोठी अपडेट स
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील गोळीबारामागे नेमका कुणाचा हात? मोठी अपडेट स.
गुप्तधन शोधण्यासाठी अघोरी कृत्य, नंतर जे घडलं त्याची कल्पना करणं कठीण
गुप्तधन शोधण्यासाठी अघोरी कृत्य, नंतर जे घडलं त्याची कल्पना करणं कठीण.
फरार निदा खान आरोपींच्या संपर्कात, मोबाईलमधील त्या संशयास्पद फोटो...
फरार निदा खान आरोपींच्या संपर्कात, मोबाईलमधील त्या संशयास्पद फोटो....
मोठी घडामोड! भोंदू खरातला मदत करणाऱ्या बड्या अधिकाऱ्यावर होणार कडक कार
मोठी घडामोड! भोंदू खरातला मदत करणाऱ्या बड्या अधिकाऱ्यावर होणार कडक कार.
मोठी बातमी! भाजपमध्ये पक्षप्रवेश करताच राघ चड्ढांना धक्का, थेट...
मोठी बातमी! भाजपमध्ये पक्षप्रवेश करताच राघ चड्ढांना धक्का, थेट....
कर्जमाफीबद्दल मोठी अपडेट! 35 लाख शेतकऱ्यांना... नेमकी काय माहिती समोर
कर्जमाफीबद्दल मोठी अपडेट! 35 लाख शेतकऱ्यांना... नेमकी काय माहिती समोर.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होताच राऊत संतापले, भाजपला सुनावले खडे
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होताच राऊत संतापले, भाजपला सुनावले खडे.
काळजाचा ठोका चुकवणारी घटना! विमान टॅक ऑफ करणार इतक्यात.. थोडक्यात बचाव
काळजाचा ठोका चुकवणारी घटना! विमान टॅक ऑफ करणार इतक्यात.. थोडक्यात बचाव.