AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENGW vs SAW Semi Final : नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने, गोलंदाजी घेत ब्रंट म्हणाली की…

वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील उपांत्य फेरीचा पहिला सामना इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात होत आहे. या सामन्यातील विजेता संघ भारत किंवा ऑस्ट्रेलिया यांच्यापैकी एकाशी अंतिम फेरीत भिडणार आहे. या सामन्यात इंग्लंडचं पारडं जड आहे.

ENGW vs SAW Semi Final :  नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने, गोलंदाजी घेत ब्रंट म्हणाली की...
Image Credit source: South Africa Women Twitter
| Updated on: Oct 29, 2025 | 2:47 PM
Share

वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील बाद फेरीचा प्रवास सुरु झाला आहे. पहिल्या उपांत्य फेरीत इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिका हे संघ आमनेसामने आले आहेत. इंग्लंडने साखळी फेरीत दक्षिण अफ्रिकेचा दारूण पराभव केला होता. त्यामुळे या सामन्यात इंग्लंडचं पारडं जड आहे. दुसरीकडे, दक्षिण अफ्रिकेला साखळी फेरीच्या सामन्यातील चुका दुरूस्त करून पुढे जावं लागणार आहे. दरम्यान, नाणेफेकीचा कौल या सामन्यात इंग्लंडच्या बाजूने लागला आणि कर्णधार नॅट स्कायव्हर ब्रंटने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. साखळी फेरीतील सामन्यातही इंग्लंडने अशीच रणनिती अवलंबली होती.  इंग्लंडची कर्णधार नॅट स्कायव्हर ब्रंट म्हणाली की, ‘आम्हाला प्रथम गोलंदाजी करायची आहे. चांगली गोलंदाजी करत त्यांच्यावर दबाव आणायचा आहे. त्यानंतर संध्याकाळच्या प्रकाशात त्याचा पाठलाग करायचा आहे. आमचा संघही तोच आहे. ती थोडीशी वेदना सहन करत खेळेल, पण ती पुढे जाण्यासाठी उत्सुक असेल. प्रक्रियेवर आणि तुम्ही केलेल्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवा आणि प्रसंगाचा आनंद घ्या.’

दक्षिण अफ्रिकेची कर्णधार, टआम्हीही प्रथम गोलंदाजी करण्याचा विचार करत होतो. आज आम्ही एक अतिरिक्त फलंदाज खेळवत आहोत. क्लासऐवजी बॉशचा संघात समावेश आहे. आज आपण प्रथम फलंदाजी चांगली करू शकू अशी आशा आहे. दिवसाच्या शेवटी, हे सर्व जिंकण्याबद्दल आहे.’ या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेने सलग पाचव्यांदा नाणेफेकीचा कौल गमावला आहे. 2017 आणि 2022 मध्ये झालेल्या दोन्ही एकदिवसीय विश्वचषक उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेचा इंग्लंडकडून पराभव झाला होता.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन : एमी जोन्स (विकेटकीपर), टॅमी ब्यूमोंट, हीदर नाइट, डॅनिएल वायट-हॉज, नॅट सायव्हर-ब्रंट (कर्णधार), सोफिया डंकली, एलिस कॅप्सी, शार्लोट डीन, सोफी एक्लेस्टोन, लिन्सी स्मिथ, लॉरेन बेल

दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन: लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), तझमिन ब्रिट्स, स्युने लुस, ॲनेरी डेर्कसेन, ॲनेके बॉश, मारिजाने कॅप, सिनालो जाफ्ता (डब्ल्यू), क्लो ट्रायॉन, नदिन डी क्लर्क, अयाबोंगा खाका, नॉनकुलुलेको म्लाबा

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.