AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs DC : मुंबई इंडियन्सचं दिल्ली कॅपिटल्ससमोर विजयासाठी 165 धावांचं आव्हान, कोण मारणार बाजी?

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने 20 षटाकत 6 गडी गमवून 165 धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्ससमोर विजयासाठी धावांचं आव्हान दिलं आहे.

MI vs DC : मुंबई इंडियन्सचं दिल्ली कॅपिटल्ससमोर विजयासाठी 165 धावांचं आव्हान, कोण मारणार बाजी?
Image Credit source: Twitter
| Updated on: Feb 15, 2025 | 9:00 PM
Share

वुमन्स प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमनेसामने आहेत. मुंबई इंडियन्सने 19.1 षटकात सर्व गडी गमवून 164 धावा केल्या आणि विजयासाठी 165 धावांचं आव्हान दिलं आहे.  मुंबई इंडियन्सकडून नॅट स्कायव्हर ब्रंटने 59 चेंडूत 13 चौकरांच्या मदतीने नाबाद 80 धावा केल्या. या सामन्यात नाणेफेकीचा कौल दिल्ली कॅपिटल्सच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. दव फॅक्टर आणि खेळपट्टीचा अंदाज घेऊन दिल्लीने गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे मुंबई इंडियन्सला बोर्डवर जास्तीत जास्त धावा लावण्याशिवाय पर्याय नव्हता. पण मुंबई इंडियन्सचा पॉवर प्ले काही खास गेला नाही. हेले मॅथ्यूजच्या रुपाने पहिला धक्का बसला. तिला आपलं खातंही खोलता आलं नाही. शिखा पांडेच्या गोलंदाजीवर स्लीपला मेग लेनिंगने तिचा अप्रतिम झेल पकडला. त्यानंतर यास्तिक भाटियाही काही खास करू शकली नाही. यास्तिका फक्त 11 धावा करून बाद झाली. तिसऱ्या विकेटसाठी नॅट स्कायव्हर ब्रंट आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्यात चांगली भागीदारी झाली. या दोघांनी 73 धावांची भागीदारी केली. हरमनप्रीत कौरने या सामन्यात आक्रमक पवित्रा घेतला होता. 22 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 42 धावा केल्या होत्या. पण अनाबेलच्या गोलंदाजीवर फटका मारताना चूक झाली आणि थेट निक्की प्रसादच्या हाती चेंडू गेला.

कर्णधार हरमनप्रीत कौर बाद झाल्यानंतर इतर फलंदाज काही खास करू शकले नाही. एका बाजूने नॅट स्कायव्हर ब्रंट खिंड लढवत होती. दुसरीकडे धडाधड विकेट पडत होत्या. अमेलिया करचं नशिब इतकं खराब होतं की नॅटने मारलेला शॉट मिनूच्या हाताला लागला आणि थेट स्टंपवर लागला यामुळे धावचीत होत तंबूत परतली. संजीवन संजना 1, अमनज्योत कौर 7 आणि संस्कृती गुप्ता 2 धावा करून तंबूरत परतली. शबनम इस्माईल तर एकही चेंडू न खेळता धावचीत होत तंबूत गेली.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

मुंबई इंडियन्स महिला (प्लेइंग इलेव्हन): हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णदार), अमेलिया केर, सजीवन सजाना, अमनजोत कौर, जिंतीमणी कलिता, संस्कृती गुप्ता, शबनीम इस्माईल, सायका इशाक.

दिल्ली कॅपिटल्स महिला (प्लेइंग इलेव्हन): शफाली वर्मा, मेग लेनिंग (कर्णधार), ॲलिस कॅप्सी, जेमिमाह रॉड्रिग्स, ॲनाबेल सदरलँड, निकी प्रसाद, सारा ब्राइस (विकेटकीपर), शिखा पांडे, अरुंधती रेड्डी, मिन्नू मणी, राधा यादव.

माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.