WPL 2026 Auction Date and Time : 277 पैकी 73 खेळाडूंचीच निवड होणार, मेगा ऑक्शन लाईव्ह कुठे पाहता येणार?
WPL 2026 Auction: क्रिकेट चाहत्यांना आयपीएल मिनी ऑक्शनआधी डब्ल्यूपीएलच्या चौथ्या मोसमासाठीच्या मेगा ऑक्शनचा थरार अनुभवायला मिळणार आहे. जाणून घ्या मेगा ऑक्शन लाईव्ह कुठे पाहायला मिळेल.

आयपीएलच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) मिनी ऑक्शनचं आयोजन हे अबुधाबीत करण्यात आलं आहे. मिनी ऑक्शन 16 डिसेंबरला होणार आहे. त्याआधी डब्ल्यूपीएल अर्थात वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या आगामी चौथ्या मोसमासाठी (WL 2026) मेगा ऑक्शनचा थरार रंगणार आहे. राजधानी नवी दिल्लीत गुरुवारी 27 नोव्हेंबरला मेगा ऑक्शन पार पडणार आहे. डब्ल्यूपीएल 2026 मेगा ऑक्शनसाठी एकूण 277 खेळाडूंची नावं अंतिम करण्यात आली आहेत. या 277 खेळाडूंमध्ये 196 भारतीय आणि 66 विदेशी क्रिकेटपटूंचा समावेश आहे. मात्र 5 संघांना फक्त 73 खेळाडूंचीच गरज आहे. त्यामुळे कोणत्या 73 खेळाडूंची निवड केली जाणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. या मेगा ऑक्शनला किती वाजता सुरुवात होणार? मेगा ऑक्शनला लाईव्ह कुठे पाहायला मिळणार? हे सविस्तर जाणून घेऊयात.
वूमन्स प्रीमियर लीग 2026 मेगा ऑक्शन कधी?
वूमन्स प्रीमियर लीग 2026 मेगा ऑक्शन गुरुवारी 27 नोव्हेंबरला होणार आहे.
वूमन्स प्रीमियर लीग 2026 मेगा ऑक्शन कुठे?
वूमन्स प्रीमियर लीग 2026 मेगा ऑक्शनचं आयोजन हे नवी दिल्लीत पंचतारांकीत हॉटेलमध्ये करण्यात आलं आहे.
वूमन्स प्रीमियर लीग 2026 मेगा ऑक्शनला किती वाजता सुरुवात होणार?
वूमन्स प्रीमियर लीग 2026 मेगा ऑक्शनला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.
वूमन्स प्रीमियर लीग 2026 मेगा ऑक्शन टीव्ही-मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?
वूमन्स प्रीमियर लीग 2026 मेगा ऑक्शन टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर मेगा ऑक्शन मोबाईल आणि लॅपटॉपवर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल.
कोणत्या संघाकडे किती रक्कम?
मेगा ऑक्शनसाठी युपी वॉरियर्सकडे सर्वाधिक रक्कम आहे. तर दिल्ली कॅपिट्ल्सकडे सर्वात कमी रक्कम आहे. कोणत्या संघाकडे किती रक्कम आहे? हे जाणून घेऊयात.
- दिल्ली कॅपिटल्स : 5 कोटी 7 लाख
- मुंबई इंडियन्स : 5 कोटी 75 लाख
- आरसीबी : 6 कोटी 15 लाख
- गुजरात जायंट्स : 9 कोटी
- यूपी वॉरियर्स : 14.5 कोटी
WPL 2026 मेगा ऑक्शनसाठी महत्त्वाचे नियम
प्रत्येक फ्रँचायजीला टीममध्ये 15 खेळाडू ठेवणं बंधनकारक आहे. तर जास्तीत 18 खेळाडूंचाच टीममध्ये समावेश करता येणार आहे. एकूण 5 संघांना 73 खेळाडूंची गरज आहे. या मेगा ऑक्शनद्वारे 73 पैकी 23 विदेशी खेळाडूंची निवड केली जाणार आहे. तर 50 भारतीय खेळाडूंची चौथ्या मोसमासाठी मेगा ऑक्शनद्वारे निवड करण्यात येणार आहे. प्रत्येक फ्रँचायजीला जास्तीत जास्त 5 वेळा आरटीएम अर्थात राईट टु मॅच कार्डचा वापर करता येईल. आरटीएमद्वारे फ्रँचायजींना त्यांनी करारमुक्त केलेल्या खेळाडूला पुन्हा आपल्या गोटात घेता येतं.
