AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC Final Weather Update : भारत-न्यूझीलंड सामना रंगात, आजचा दिवस महत्त्वाचा, मॅचबाबत साऊदम्पटनमधून मोठी बातमी

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा सामना चांगलाच रंगात आला असून आजचा राखीव दिवसही खेळवला जाणार आहे. पावसामुळे सतत व्यत्यय येणाऱ्या या महत्त्वाच्या सामन्यात आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे.

WTC Final Weather Update : भारत-न्यूझीलंड सामना रंगात, आजचा दिवस महत्त्वाचा, मॅचबाबत साऊदम्पटनमधून मोठी बातमी
WTC Final 2021
| Edited By: | Updated on: Jun 23, 2021 | 1:01 PM
Share

WTC Final Weather Update : मागील दोन वर्षांपासून सुरु असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची स्पर्धा (ICC WTC Final) आता अंतिम टप्प्यात आली आहे. भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात इंग्लंडच्या साऊदम्पटन (Southmpton) मैदानात सुरु असलेल्या अंतिम सामन्यात पहिल्या दिवशीपासून पावसाचा व्यत्यय येतच आहे. त्यामुळे 5 दिवसांपैकी केवळ 3 दिवसाचाच खेळ झाला आहे. त्यातही संपूर्ण ओव्हर खेळवल्या गेल्या नसून पहिला आणि तिसरा दिवस मिळून 141.2 ओव्हर्सच खेळल्या गेल्या आहेत. तर पाचव्या दिवशीही पावसामुळे अर्धा तास उशीराने खेळ सुरु झाला. (WTC Final 2021 Southampton Weather Forecast india vs New Zealand Match 6th day reserve day Updates from Southampton ground)

कधी पाऊस कधी खराब प्रकाशमान या सर्व व्यत्ययांमुळे 5 दिवसांत सामना पूर्ण होऊ शकला नसल्याने आजचा सहावा राखीव दिवस ही वापरण्यात येणार आहे. मात्र आजच्या वातावरणावर आजच्या दिवशी खेळ होणार का? आणि होणार तर किती ओव्हर्सचा याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान याबाबतच साऊदम्पटनमधून मोठी माहिती समोर आली आहे.

आजचं वातावरण साफ

साऊदम्पटनमधून आज समोर आलेल्या माहितीनुसार आज दिवसभर आकाश साफ राहणार आहे. त्यामुळे पाऊस किंवा खराब प्रकाशमानाचा व्यत्यय येण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे इतर दिवशीच्या तुलनेत आजा चांगला आणि संपूर्ण ओव्हर्सचा खेळ खेळवला जाण्याची दाट शक्यता आहे. आज संपूर्ण सामना खेळवला गेल्यास विजयी कोण? हा निर्णयही लवकरच समोर येईल.

आतापर्यंतच्या सामन्याचा धावता आढावा

सर्वात आधी न्यूझीलंडने टॉस जिंकून गोलंदाजी घेतली. भारताला 217 धावांवर ऑलआऊट करुन न्यूझीलंडने 249 धावा केल्या आणि भारतावर 32 रनांची आघाडी मिळवली. त्यानंतर भारत आता आपला दुसरा डाव खेळत असून पाचव्या दिवसाखेर भारताची स्थिती 64 वर 2 बाद अशी आहे. सध्या विराट (8) आणि पुजारा (12) खेळत आहेत.

हे ही वाचा :

WTC Final : ‘सुपरमॅन’ शुभमन, चित्त्यासारखी झेप घेत पकडला झेल, सोशल मीडियावर कौतुकाचा पाऊस

ICC WTC Final : 196 ओव्हर ठरवणार विजेता, जाणून घ्या कोणता संघ होणार विजयी

WTC Final 2021 : फायनल सामना ड्रॉ झाला तर भारताला मोठं नुकसान, न्यूझीलंड फायद्यात!

(WTC Final 2021 Southampton Weather Forecast india vs New Zealand Match 6th day reserve day Updates from Southampton ground)

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.