
Google Search 2025: गुगलने भारतात 2025 मध्ये सर्वाधिक काय सर्च करण्यात आले याची यादी जाहीर केली आहे. टॉप ट्रेडिंग सर्चमध्ये यंदा खेळाडूंचा दबदबा दिसून आला. या सर्च यादीत सर्वात जास्त इंडियन प्रीमियर लिग, तिसऱ्या क्रमांकावर आशिया कप, चौथ्या क्रमांकावर ICC चॅम्पियन ट्रॉफी, 5 व्या स्थानी प्रो कबड्डी लिग आणि 7 व्या क्रमांकावर महिला विश्वचषकचा समावेश आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर यंदा गुगल जेमिनी सर्च झाले. सहाव्या स्थानी कुंभमेळा होता. तर आठव्या क्रमांकावर GROK, नवव्या क्रमांकावर सैयारा आणि दहाव्या क्रमांकावर दिवगंत बॉलिवूड हिरो धर्मेंद्र यांचा समावेश आहे.
यादीत सूर्यवंशींचे ‘वैभव’
सर्वाधिक वेळा सर्च करण्यात आलेली व्यक्ती क्रिकेटचे तुफान वैभव सूर्यवंशी हा सर्वात कमी वयाचा स्फोटक फलंदाज राहिला. गुगलने भारतात यंदा काय काय सर्वाधिक वेळा सर्च करण्यात आले, त्याची यादी जाहीर केली आहे. त्यात सूर्यवंशींने वैभव मिळवले आहे. तो सर्वाधिक वेळा गुगलवर सर्च केला गेला. त्याचे वय, त्याचा अभ्यास, त्याचा रेकॉर्ड यामध्ये अनेकांना रूची आहे. त्याचे वडील काय करतात. तो कुठे शिकला. त्याला भारतीय संघात स्थान मिळेल का, असा सर्चचा आलेख होता.
भारतात 2025 मध्ये एकूण टॉप ट्रेंडिंग सर्च
1. इंडियन प्रीमियर लिग
2. Google Gemini
3. आशिया कप
4. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी
5. प्रो कबड्डी लिग
6. कुंभ मेळा
7. महिला विश्वचषक
8. ग्रोक
9. सैयारा
10. धर्मेंद्र
सर्वाधिक वेळा सर्च करण्यात आलेले क्रिकेटर्स
भारतात यंदा अनेक दिग्गजांविषयी गुगलमध्ये सर्च करून माहिती घेण्यात आली. यामध्ये वैभव सूर्यवंशीसह इतरही अनेक क्रिकेटर्सचा समावेश आहे. या क्रिकेटर्समध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, शुभमन गिल सारख्या दिग्गजांनी जागा पटकावली आहे. या खेळाडूंमध्ये अर्थातच वैभव सूर्यवंशीने अव्वल स्थान पटकावलं आहे.
2025 मध्ये भारतात सर्वाधिक वेळा सर्च करण्यात आलेल्या व्यक्ती
1- वैभव सूर्यवंशी
2. प्रियांश आर्य
3. अभिषेक शर्मा
4. शाएक राशिद
5. जेमिमा रोड्रिग्स
6. आयुष म्हात्रे
7. स्मृती मानधना
8. करुण नायर
9. उर्विल पटेल
10. विग्नेश पुथुर
2025 मध्ये भारतात सर्वाधिक वेळा सर्च झालेल्या 5 महिला
1. जेमिमा रोड्रिग्स
2. स्मृती मानधना
3. शेफाली वर्मा
4. सुनीता विलियम्स
5. हरमनप्रीत कौर