मनीष पांडेची विकेट घेणारी 'ही' अभिनेत्री कोण आहे?

भारतीय क्रिकेट संघाच्या मधल्या फळीतील फलंदाज मनीष पांडे लवकरच विवाह बंधनात (Cricketer manish pandey and aashrita shetty wedding) अडकणार आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री अश्रिता शेट्टीसोबत मनीष पांडे लग्न करणार आहेत.

मनीष पांडेची विकेट घेणारी 'ही' अभिनेत्री कोण आहे?

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाच्या मधल्या फळीतील फलंदाज मनीष पांडे लवकरच विवाह बंधनात (Cricketer manish pandey and aashrita shetty wedding) अडकणार आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री अश्रिता शेट्टीसोबत मनीष पांडे लग्न करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याच्या डिसेंबर महिन्यात मनीष पांडे मुंबईत लग्न (Cricketer manish pandey and aashrita shetty wedding) करणार आहे.

मनीष आणि अश्रिता शेट्टी हे दोघेही खूप दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. ही जोडी क्रिकेट आणि मनोरंजन क्षेत्रातील नवीन जोडी आहे. याआधी अभिनेत्री अनुष्का शर्मा- क्रिकेटर विराट कोहली, क्रिकेटर युवराज सिंह- अभिनेत्री हेजल केच, क्रिकेटर जहीर खान- अभिनेत्री सागरिका घाटगे, क्रिकेटर हरभजन सिंह- अभिनेत्री गीता बसरा, क्रिकेटर मोहम्मद अजहरुद्दीन- अभिनेत्री संगीता बिजलानी यासारख्या अनेक क्रिकेटपटूंनी अभिनेत्रींशी लग्न केलं आहे.

मनीष पांडेने डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आपल्या लग्नाची तारीख ठरवली आहे. कारण डिसेंबर महिन्यात भारत विरुद्ध वेस्ट इंडिज टी 20 सामने मुंबईत आयोजित करण्यात आले आहे. त्यामुळे टीम इंडिया मुंबईत असेल. यामुळे मनीषने लग्नाची तारीख डिसेंबरमध्ये ठरवली आहे.

कोण आहे आश्रिता शेट्टी?

आश्रिता शेट्टीचा जन्म 16 जुलै 1993 रोजी झाला आहे. 2010 मध्ये ब्युटी कॉन्टेस्ट ‘क्लीन अँड क्लिअर फ्रेश फेस’मध्ये जिंकल्यानंतर तिने एका कॉमेडी चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. तिच्या पहिल्या चित्रपटाचे नाव तेलिकेडा बोली आहे.

यानंतर आश्रिता शेट्टीला एनएच 4 मध्ये अभिनेता सिद्धार्थसोबत काम केले. एनएच 4 एक तमिळ रोमांटिक थ्रिलर चित्रपट होता. जो 2013 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन मणिमारन यांनी केले होते. चित्रपटात येण्यापूर्वी आश्रिताने अनेक जाहिरातीतही काम केलं आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *