शोएब मलिकच्या स्पोर्टस कारचा मोठा अपघात, बोनेटचा भाग चक्काचूर

पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक याच्या गाडीचा मोठा अपघात झाला. (Cricketer Shoaib Malik sports car Accident)

शोएब मलिकच्या स्पोर्टस कारचा मोठा अपघात, बोनेटचा भाग चक्काचूर

इस्लामाबाद : पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक याच्या स्पोर्टस कारचा मोठा अपघात झाला आहे. भरधाव वेगात असलेली शोएब मलिकची स्पोर्ट्स कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका ट्रकला धडकली. या धडकेत बोनेटचा भाग चक्काचूर झाला. सुदैवान या अपघातात शोएब मलिकला कोणतीही इजा झालेली नाही. (Cricketer Shoaib Malik sports car Accident)

मिळालेल्या माहितीनुसार, लाहोरच्या नॅशनल हायपरफॉरमेन्स सेंटरच्या (NHPC) बाहेर एक ट्रक रस्त्याच्या कडेला उभा होता. त्याचवेळी शोएब मलिकची स्पोर्टस कार त्या ट्रकला जाऊन धडकली. ही धडक इतकी जबरदस्त होती की त्यावेळी त्या स्पोर्ट्स कारचा पुढील भाग चक्काचूर झाला. या घटनेनंतर शोएब मलिककडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

दरम्यान पाकिस्तानी न्यूज चॅनलच्या वृत्तानुसार, शोएब मलिक आणि वहाब रियाज हे दोघे कार रेसिंग करत होते. या रेसिंगदरम्यान शोएब मलिकच्या गाडीला अपघात झाला. पाकिस्तान स्पोर्ट लीगच्या पार्श्वभूमीवर एक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान शोएब मलिकच्या कारची फार चर्चा होत होती.

यानंतर पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहम्मद आमिर आणि बाबर आजम यांनी शोएबची कार पाहिली. तसेच हा कार्यक्रम संपल्यानतंर शोएब मलिक आणि वहाब रियाज दोघेही घरी जाण्यासाठी आपापल्या गाड्यांमधून रवाना झाले.

याच वेळी त्या दोघांनी रेसिंगचा निर्णय घेतला. मात्र रेसिंग करताना काही वेळातच शोएबची कार स्लिप झाली. त्यानंतर त्या स्पोर्ट्स कारने तीन-चार गाड्यांना धडक दिली. यानंतर ही स्पोर्ट्स कार थेट ट्रकवर जाऊन आदळली.

पाकिस्तानच्या जिओ न्यूजच्या माहितीनुसार, शोएब मलिकची स्पोर्ट्स कार ही लाहौरच्या नॅशनल हायपरफॉरमन्स सेंटरच्या बाहेरुन भरधाव वेगात जात होती. या गाडीचा वेग प्रचंड असून ती नियंत्रणाबाहेर होती. त्यामुळे ही गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या ट्रकला जाऊन धडकली. (Cricketer Shoaib Malik sports car Accident)

संबंधित बातम्या : 

शोएब म्हणतो, ‘पाकिस्तान जिंदाबाद’, सानिया मिर्झा म्हणते…

शोएब-सानियाच्या घरी मिर्झा मलिकची एन्ट्री

Published On - 11:21 pm, Sun, 10 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI