Bageshwar Baba : मुंबईत बागेश्वर बाबा खेळले क्रिकेट मॅच…एका ओव्हरमध्ये घेतल्या इतक्या विकेट्स
Bageshwar Baba Dhirendra Shastri : बागेश्वर महाराज इंडियन कॉर्पोरेशन गोदामाच्या निवासात काही वेळ थांबले. तिथे सेवादार आणि सुरक्षेसाठी तैनात असलेल्या महाराष्ट्र पोलिसांसोबत ते एक मॅच खेळले.

बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री 12 दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. मुंबईत ते आले आहेत. बागेश्वर महाराज 5 ते 11 एप्रिल दरम्यान श्रीमद्भागवत कथा वाचन करणार आहेत. पहिल्यादिवशी श्रीमद्भागवत कथा संपल्यानंतर बागेश्वर महाराज इंडियन कॉर्पोरेशन गोदामाच्या निवासात काही वेळ थांबले. तिथे सेवादार आणि सुरक्षेसाठी तैनात असलेल्या महाराष्ट्र पोलिसांसोबत ते एक मॅच खेळले.
सर्व सेवादार आणि बागेश्वर महाराजांच्या Y सुरक्षेसाठी तैनात सुरक्षारक्षक या मॅचमध्ये सहभागी झाले. एका टीममध्ये महाराष्ट्र पोलीस आणि निवासी सेवादार होते. दुसऱ्या मध्य प्रदेश टीमकडून बागेश्वर महाराज स्वत:हा, सुरक्षा रक्षक आणि सेवादार होते.
बागेश्वर महाराजांनी पहिली ओव्हर टाकली
दोन्ही टीममध्ये प्रत्येकी 9 खेळाडू होते. 6 ओव्हरची मॅच होती. महाराष्ट्र टीमने प्रथम फलंदाजी केली. मध्य प्रदेश टीमकडून बागेश्वर महाराजांनी पहिली ओव्हर टाकली. त्यात त्यांनी 9 रन्स देऊन 1 विकेट काढला.
मध्य प्रदेश टीमला किती धावांच लक्ष्य
चौथ्या ओव्हरमध्ये बागेश्वर महाराजांनी पुन्हा गोलंदाजी केली. त्यांनी 6 चेंडूत 3 धावा देऊन 3 विकेट काढले. महाराष्ट्र टीमने 6 ओव्हरमध्ये एकूण 48 धावा केल्या. बागेश्वर महाराजांच्या मध्य प्रदेश टीमला हे लक्ष्य देण्यात आलं.
कोणी जिंकली मॅच?
मध्य प्रदेश टीमकडून ओपनिंगला बागेश्वर बाबा आणि सेवादार सत्यम शुक्ला आले. बागेश्वर महाराज आणि सत्यम यांनी 38 धावांची भागीदारी केली. पाचव्या ओव्हरच्या अखेरच्या चेंडूवर बागेश्वर बाबा रनआऊट झाले. त्यानंतर मध्य प्रदेश टीमचा सुरक्षारक्षक दीपेश सोनी आला. लास्ट ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर 9 विकेटने मध्य प्रदेश टीमने मॅच जिंकली.
