अनुभव असूनही निवड नाही, अजित आगरकरला BCCI च्या अंतर्गत राजकारणाचा फटका?

बीसीसीआयच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी चेतन शर्मा यांची निवड करण्यात आली. निवड समितीच्या अध्यक्षपदासाठीच्या सर्व पात्रता अजित आगरकरने पूर्ण केलेल्या. तसेच अध्यक्षपदासाठी आगरकरचे नाव आघाडीवर होते. पण ऐनवेळेस आगरकरचं नाव डावळण्यात आलं. यामुळे आगरकरला बीसीसीआयच्या अंतर्गत राजकारणाच फटका बसल्याची चर्चा आहे.

अनुभव असूनही निवड नाही, अजित आगरकरला BCCI च्या अंतर्गत राजकारणाचा फटका?
Follow us
| Updated on: Dec 25, 2020 | 6:12 PM

अहमदाबाद : टीम इंडियाच्या निवड समितीच्या ( Bcci Selection Committee)अध्यक्षपदी माजी क्रिकेटपटू चेतन शर्मा (Chetan Sharma) यांची निवड करण्यात आली. निवड समितीच्या अध्यक्षपदासाठी मुंबईकर अजित आगरकरचं  (Ajit Agarkar) नाव आघाडीवर होतं. मात्र जेव्हा चेतन शर्मा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली, तेव्हा सर्वांना एकच धक्का बसला. निवड समितीच्या अध्यक्षपदासाठी पात्रतेपेक्षाही अधिक अनुभव होता. मात्र त्यानंतरही आगरकरला डावलून चेतन शर्मा यांची निवड करण्यात आली. यामुळे क्रिकेट विश्वात आगरकरसोबत पक्षपातीपणा झाल्याचा आरोप केला जात आहे. आगरकरसह अबे कुरुविलाने वेस्ट झोनमधून अर्ज दाखल केला होता. त्यामुळे अनुभवाच्या तुलनेत आगरकरची निवड होणं अपेक्षित होतं. मात्र तसं घडलं नाही. (Discussion that Ajit Agarkar was not elected as the chairman of the selection committee due to internal politics of BCCI)

अहमदाबादमध्ये बीसीसीआयची सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत टीम इंडियाच्या नव्या निवड समितीची घोषणा करण्यात आली. यामध्ये वेस्ट झोनसाठी आगरकरऐवजी अबे कुरुविलाच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यामुळे या सर्व मागे काही तरी नक्कीच कट कारस्थान आहे. तसेच आगरकरला बीसीसीआयच्या अंतर्गत राजकारणाचा फटका बसला असल्याची चर्चाही क्रिकेट वर्तुळात आणि चाहत्यांमध्ये सुरु आहे.

एमसीएची साथ नाही

माजी गोलंदाज अबे कुरुविलाला एमसीए अर्थात मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या काही अधिकाऱ्यांची साथ होती. त्यामुळे आगरकर ऐवजी कुरुविलाची निवड करण्यात आली, अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी पीटीआयला दिली.

अनुभव असूनही निवड नाही

सर्वाधिक कसोटी सामन्यांचा अनुभव असलेल्या उमेदवाराची निवड समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात येते. आगरकरच्या कारकिर्दीपुढे कुरुविला आसपासही नाही. आगरकरने टीम इंडियाकडून 221 सामने खेळले आहेत. यामध्ये 349 विकेट्स घेतल्या आहेत. तर कुरुविलाने केवळ एकूण 35 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 50 विकेट्स घेतल्या आहेत.

संबंधित बातम्या :

PHOTO | BCCI च्या निवड समितीत गोलंदाजांचा बोलबाला

मराठमोळ्या आगरकरचा पत्ता कट, चेतन शर्मांची बीसीसीआयच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड

(Discussion that Ajit Agarkar was not elected as the chairman of the selection committee due to internal politics of BCCI)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.