AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

England-India Test Series : कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास घडणार? इंग्लंड एका दिवसात 536 धावा चोपणार? आतापर्यंत तर नाही घडले असे

England-India Test Match : कसोटी क्रिकेटमध्ये एक इतिहास घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एका दिवसात कसोटी क्रिकेटमध्ये 588 धावांचा विक्रम 1936 मध्ये झाला होता. त्यानंतर आता अशी संधी इंग्लंड संघाला चालून आली आहे. काय आहे ही अपडेट?

England-India Test Series : कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास घडणार? इंग्लंड एका दिवसात 536 धावा चोपणार? आतापर्यंत तर नाही घडले असे
भारत-इंग्लंड कसोटी Image Credit source: गुगल
| Updated on: Jul 06, 2025 | 9:50 AM
Share

भारत आणि इंग्लंडमधील दुसऱ्या कसोटी सामन्याचा आज अखेरचा दिवस आहे. इंग्लंडला एजबेस्टन कसोटी सामना जिंकण्यासाठी अखेरच्या दिवशी 536 धावांची गरज आहे. भारताने गोऱ्या साहेबांसमोर 608 धावांचे उद्दिष्ट ठेवले आहे. चौथ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा भारताने इंग्लंडचे 3 खेळाडू 72 धावांवर तंबूत पाठवले होते. पण उलटफेर करण्याता हा संघ माहिर मानण्यात येतो. हा संघ धावांचा डोंगर उभा करू शकतो का? असा सवाल विचारण्यात येत आहे. इंग्लंड 536 धावा चोपू शकतो का? टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात एका दिवसात सर्वाधिक धावा कधी आणि कोणत्या संघाने केल्या होत्या? अखेरच्या दिवशी 500 पेक्षा अधिक धाव करणे शक्य आहे का? या सवालांचे उत्तर जाणून घेऊयात…

कसोटीत एका दिवसात 588 धावा

कसोटी इतिहासात एका दिवसात धावांचा डोंगर रचण्याचा इतिहास झाला आहे. एका दिवसात 588 धावा चोपण्यात आल्या आहेत. हा कारनामा इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी सामन्या दरम्यान 1936 साली हा विक्रम करण्यात आला होता. टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात पाच वेळा असे यापूर्वी घडले होते. त्यावेळी 500 हून अधिक धावा करण्यात आल्या. पण धावांचा डोंगर हा 5 व्या अथवा अखेरच्या दिवशी हा विक्रम झालेला नाही. तो विक्रम आज इंग्लंड करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कसोटीच्या पाचव्या दिवशी सर्वाधिक धावा

कसोटीच्या पाचव्या आणि अखेरच्या दिवशी सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम झाला आहे. 2001 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलँड या दोन देशात कसोटी सामना झाला. त्यात 459 धावा करण्यात आल्या होत्या. पण आतापर्यंत 500 अथवा त्याहून अधिक धावा अखेरच्या दिवशी कसोटी इतिहासात आतापर्यंत झाल्या नाहीत. त्यामुळे भारताविरोधात इंग्लंडला ऐतिहासिक विजय मिळवायचा असेल तर त्याला धावांचा डोंगर उभारावा लागणार आहे.

धावांचा पाठलाग करण्यात यश

टेस्ट क्रिकेट इतिहासात आतापर्यंत 418 धावांपेक्षा अधिकचे लक्ष्य कोणत्याही संघाला गाठता आलेले नाही. हा कारनामा वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाविरोधात 2003 मध्ये करून दाखवला होता. या सामन्यात वेस्ट इंडिजने 3 धावांसह विजय नोंदवला होता. टेस्ट क्रिकेटमध्ये 4 वेळा 400 पेक्षा अधिक धावांचा पाठलाग करण्यात आला आहे. त्यात इंग्लंड संघाचे नाव नाही. पण टीम इंडियाचे नाव आहे.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.