AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

FIFA World Cup 2026: इंग्लंड संघ थांबणार त्या बेसजवळ फायरिंग, अंदाधुंद गोळीबारात 9 जण जखमी

फिफा वर्ल्डकप स्पर्धेसाठी 48 संघाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. सर्व संघ अमेरिकेत दाखल असून सराव शिबिरात अंतिम धडे गिरवत आहे. असं असताना इंग्लंडच्या बेसजवळ गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. यात 9 जण जखमी झाले आहेत.

FIFA World Cup 2026: इंग्लंड संघ थांबणार त्या बेसजवळ फायरिंग, अंदाधुंद गोळीबारात 9 जण जखमी
FIFA World Cup 2026: इंग्लंड संघाच्या बेसजवळ फायरिंग, अंदाधुंद गोळीबारात 9 जण जखमीImage Credit source: Leonardo Fernandez - The FA/The FA via Getty Images
| Updated on: Jun 08, 2026 | 10:20 PM
Share

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी आता काही दिवस उरले असताना एक धक्कादायक घटना घडली आहे. स्पर्धेचं आयोजन अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडामध्ये होत आहेत. असं अमेरिकेत या स्पर्धेपूर्वी बेछूट गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमी आणि फुटबॉलपटूंमध्ये भीतीचं वातावरण आहे. कारण हा गोळीबार इंग्लंड संघाच्या बेसजवळ झाल्याने चर्चा रंगली आहे. फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेसाठी इंग्लंडचा सराव शिबीर मिसौरीच्या कनसास सिटीजवळ आहे. या सराव शिबिराजवळ गोळ्यांचा धडाधड आवाज आला. या अंदाधुंद गोळीबारात 9 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार इंग्लंड संघाच्या सराव शिबिरापासून 10 मिनिटं लांब असलेल्या ठिकाणी शनिवारी हे प्रकरण घडलं. हा प्रकार सकाळी 4 वाजता घडला.

पोलिसांनी सांगितलं की, इंग्लंड संघाचं हॉटेल तिथपासून अगदी जवळ आहे. पण इंग्लंडचा संघ अजून फिफा वर्ल्डकप स्पर्धेसाठी कनसास सिटीत पोहोचलेला नाही. कनसास सिटीत जेव्हा सदर घटना घडली तेव्हा इंग्लंडचा संघ फ्लोरिडाच्या पाल्म बीचजवळ वर्ल्डकप स्पर्धेचा सराव करत होता. इंग्लंड संघ 13 जूनला कनसास सिटीत दाखल होणार आहे. कॅनसास सिटी पोलिसांच्या म्हणण्यांनुसार, गोळीबार घडल्याची घटना घडताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तिथे गोंधळ उडाला होता आणि जखमी झालेल्या महिलांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नऊ जण या गोळीबारात जखमी झाले आहेत. पण यात कोणीही गंभीर जखमी नाही. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. तसेच आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

फिफा वर्ल्डकप स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी इंग्लंडने न्यूझीलंडविरुद्ध एक सराव सामना खेळला. यात 1-0 ने न्यूझीलंडला पराभवाची धूळ चारली. आता दुसरा सराव सामना बुधवारी कोस्टा रिकाविरुद्ध होणार आहे. फिफा विश्वचषक 2026 दरम्यान कानसास सिटी हे इंग्लंडचे मुख्य तळ असेल.

इंग्लंडच संघ एल गटात असून क्रोशिया, घाना आणि पनामा हे देश आहेत. इंग्लंडचा पहिला सामना क्रोशियविरुद्ध 18 जूनला, त्यानंतर 24 जुनला घाना आणि 28 जूनला पनामाशी सामना होईल.

Follow Us
साहेब आता निर्णय घ्या... नाराज समर्थकांचं भुजबळांकडे साकडं, राज्यसभा..
साहेब आता निर्णय घ्या... नाराज समर्थकांचं भुजबळांकडे साकडं, राज्यसभा उमेदवारीमुळे थेट विनंती; काय घडतंय?
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली? राऊतांनी A टू Z सांगितलं!
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया,
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले माझा फोन हॅक...
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन फिरवला, त्या प्रकरणाची गंभीर दखल!
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं सत्य;  डिजेच्या तालावर...
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनी धुराच्या लोटात
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनीत धुराचे लोट, मोठी दुर्घटना टळली
अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
Dcm Sunetra Pawar | मोबाईलमध्ये व्यस्त, कामात हलगर्जीपणा! अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर...
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर विधान करणं भोवलं!
36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा
Datta Bharne | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा? कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा