AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीम इंडियाच्या निवडीबाबत प्रश्नचिन्ह, माजी क्रिकेटपटूकडून WTC FINAL साठी निवड झालेल्या संघाबाबत शंका व्यक्त

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप (World Test Championship) आणि इंग्लंड दौऱ्यासाठी (England tour 2021) 7 मे ला टीम इंडियाची (Team India) घोषणा करण्यात आली. यावरुन माजी क्रिकेटपटू डोडा गणेशने (Dodda Ganesh) प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

टीम इंडियाच्या निवडीबाबत प्रश्नचिन्ह, माजी क्रिकेटपटूकडून WTC FINAL साठी निवड झालेल्या संघाबाबत शंका व्यक्त
टीम इंडिया (team india)
| Updated on: May 09, 2021 | 4:13 PM
Share

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप (WTC Final 2021) आणि इंग्लंड दौऱ्यासाठी ( India Tour England 2021) शुक्रवारी (7 मे) टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. 4 राखीव खेळाडूंसह एकूण 24 सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला. चेतन शर्मा (Chetan Sharma) यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने संघ जाहीर केला. यामध्ये 6 वेगवान गोलंदाजांसह 4 फिरकीपटूंचा समावेश आहे. या टीममध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर (Bhuvneshwar Kumar) भुवनेश्वर कुमार, पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि हार्दिक पंड्यासारख्या (Hardik Pandya) खेळाडूंना डच्चू मिळाला आहे. यामुळे क्रिकेट चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान आता या संघ निवडीवरुन माजी भारतीय क्रिकेटपटूनेच प्रश्न उपस्थित केले आहे. डोडा गणेश (Dodda Ganesh) यांनी ट्विट करत आपले मत व्यक्त केलं आहे. (former indian cricketer Dodda Ganesh questions Team India selection for World Test Championship and England tour 2021)

ट्विटमध्ये काय म्हटलंय?

टीम इंडियाकडून 4 कसोटी सामने खेळणाऱ्या डोडा गणेशने या निवडीवर आक्षेप घेतला आहे. डोडा यांनी इंग्लंडमधील परिस्थतीत 4 फिरकी गोलंदाजांसह खेळण्याच्या निर्णयाला चूकीचं ठरवलंय. “कसोटी संघाची निवड ही आयपीएलमधील कामगिरीच्या आधारावर करु नये. तर संधी  प्रथम श्रेणी क्रिकेटमधील आकडेवारीच्या जोरावर देण्यात यावी,” असं डोडा यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केलं आहे.

जयदेव उनाडकटचा उल्लेख

डोडा यांनी वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटला संधी न देण्यावरुन आपली भूमिका स्पष्ट केली. “मागील 4-5 वर्षांपासून वेगवान गोलंदाज म्हणून जयदेवचा उदय होत आहे. त्यामुळे इंग्लंडला 4 फिरकीपटूंसह खेळण्याऐवजी आणखी एका गोलंदाजाला संधी दिल्यास ते उत्तम राहिलं असतं. त्यासाठी जयदेव हा अचूक पर्याय होता”, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं.

कोण आहे डोडा गणेश?

डोडा गणेश यांनी 4 कसोटी आणि 1 वनडेमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्यांनी कसोटीत 5 तर एकदिवसीय सामन्यांमध्ये 1 विकेट घेतली आहे. तसेच स्थानिक पातळीवर त्यांनी कर्नाटकचे प्रतिनिधित्व केलं आहे. कर्नाटककडून त्यांनी 104 फर्स्ट क्लास मॅच खेळल्या आहेत. यामध्ये त्याने 365 विकेट्स मिळवल्या आहेत.

18 जूनपासून ‘मिशन इंग्लैंड’

टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याची सुरुवात 18 जूनपासून होत आहे. भारतीय संघ विजेतेपदासाठी न्यूझीलंड विरुद्ध भिडणार आहे. हा सामना साउथम्पटनमध्ये 18-22 जून दरम्यान खेळवण्यात येणार आहे. तर त्यानंतर काही दिवसांच्या अंतराने इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. या टेस्ट सीरिजची सुरुवात 4 ऑगस्टपासून होणार आहे.

इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिली कसोटी, 4 ते 8 ऑगस्ट

दुसरी कसोटी, 12 ते 16 ऑगस्ट

तिसरी कसोटी, 25 ते 29 ऑगस्ट

चौथी कसोटी, 2 ते 6 सप्टेंबर

पाचवी कसोटी, 10 ते 14 सप्टेंबर.

अशी आहे टीम इंडिया

विराट कोहली(कर्णधार), अजिंक्य रहाणे(उपकर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव. केएल राहुल आणि वृद्धिमान साहा (फिटनेस टेस्ट आवश्यक)

राखीव खेळाडू : अभिमन्यू इश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि अर्जान नागवासवाला.

संबंधित बातम्या :

Team India | संघात स्थान हवंय? आधी वजन कमी कर, बीसीसीआयचा ‘या’ स्टार खेळाडूला सल्ला

‘भारतीय संघात निवड होताच आईवडिलांना कडकडून मिठी मारली’, 23 वर्षीय अर्जन नागवासवाला भावूक

(former indian cricketer Dodda Ganesh questions Team India selection for World Test Championship and England tour 2021)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.