AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gautam Gambhir vs Rohit-Virat : टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधली बातमी फुटली, सीरीज दरम्यान मोठा खुलासा

Gautam Gambhir vs Rohit-Virat : दैनिक जागरणच्या रिपोर्ट्नुसार, गौतम गंभीर यांनी राहुल द्रविडच्या जागी हेड कोचची जबाबदारी संभाळली. त्यावेळी सर्वकाही सामान्य होतं. पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे.

Gautam Gambhir vs Rohit-Virat : टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधली बातमी फुटली, सीरीज दरम्यान मोठा खुलासा
Gautam Gambhir-Rohit Sharma-Virat KohliImage Credit source: PTI
| Updated on: Dec 01, 2025 | 1:45 PM
Share

भारतीय क्रिकेटमध्ये सीनियर खेळाडू आणि कोचमधील मतभेदांचा इतिहास जुना आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु असलेल्या वनडे सीरीज दरम्यान भारतीय क्रिकेटमधील काही अंतर्गत गोष्टींची चर्चा आहे. एका रिपोर्टनुसार, हेड कोच गौतम गंभीर आणि टीम मधील दोन मोठे खेळाडू रोहित शर्मा-विराट कोहली यांच्यातील संबंध बिघडले आहेत. हा तणाव इतका वाढला आहे की, हेड कोच आणि दोन दिग्गजांमधील बोलणं जवळपास बंदच झालं आहे. त्याचा परिणाम वनडे टीमच्या ड्रेसिंग रुमवर दिसून येतोय.

दैनिक जागरणच्या रिपोर्ट्नुसार, गौतम गंभीर यांनी राहुल द्रविडच्या जागी हेड कोचची जबाबदारी संभाळली. त्यावेळी सर्वकाही सामान्य होतं. पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. रोहित आणि कोहलीच्या भविष्याबद्दल चर्चा, कॅप्टनशिपचे मुद्दे आणि रणनितीवरुन मतभेद यामुळे ड्रेसिंग रुममधील वातावरण बिघडलं आहे. बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितलं की, बोर्ड या प्रकारामुळे त्रस्त आहे. खासकरुन सोशल मीडियावर गंभीर विरोधात रोहित-कोहलीच्या फॅन्सकडूनन सातत्याने हल्लाबोल सुरु आहे. त्यामुळे वातावरण आणखी तापलय.

काही मोठे बदल दिसू शकतात

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावेळी चीफ सिलेक्टर अजित आगरकर आणि रोहित शर्मा यांच्यात कुठलीही चर्चा झाली नव्हती. आता कोहली आणि गंभीरमध्ये सुद्धा अशीच स्थिती आहे. रिपोर्टनुसार, लवकरच रोहित, कोहली आणि गंभीरच्या भविष्याबद्दल एक महत्वाची बैठक होऊ शकते. ही बैठक रायपूर आणि विशाखापट्टणम येथे होणाऱ्या दुसऱ्या, तिसऱ्या वनडे दरम्यान होईल. या तणावाचा टीमच्या प्रदर्शनावर परिणाम व्हावा, अशी बोर्डाची इच्छा नाही. बीसीसीआय यावर काही तोडगा काढणार का? यावर आता सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. 2027 वनडे वर्ल्ड कप आधी काही मोठे बदल दिसू शकतात.

फोटो सोशल मीडियावर व्हायरल

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे सीरीजमध्ये पहिला सामना रांची येथे झाला होता. ही मॅच टीम इंडियाने जिंकली. या मॅचनंतर ड्रेसिंग रुममधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. यात रोहित शर्मा आणि गौतम गंभीर सीरियस चर्चा करताना दिसले. काही फॅन्सच्या मते दोघांमध्ये खूप टोकदार बोलणं झालं. काहींच्या मते ही नॉर्मल चर्चा होती.

भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.