AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 Gujarat Titans : गुजरात टायटन्सच्या खेळाडूंच्या बसचा टळला मोठा अपघात, थोडक्यात वाचला जीव,अचानक..

IPL 2026 : गुजरात संघाच्या बसमध्ये शॉर्ट सर्किट झाले. मात्र, सर्व खेळाडूंना सुखरूप बाहेर काढण्यात आले. अंतिम सामन्यातील पराभवानंतर खेळाडू टीम हॉटेलकडे परतत असताना हा अपघात झाला.

IPL 2026 Gujarat Titans : गुजरात टायटन्सच्या खेळाडूंच्या बसचा टळला मोठा अपघात, थोडक्यात वाचला जीव,अचानक..
गुजरात टायटन्स
| Updated on: Jun 01, 2026 | 9:13 AM
Share

GT Team Bus Accident : आयपीएल 2026 अंतिम सामन्यातील पराभवानंतर गुजरात टायटन्सचा संपूर्ण संघ एका मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावला. पीटीआयच्या वृत्तानुसार, अंतिम सामन्यानंतर संघ स्टेडियमवरून हॉटेलकडे परतत असताना ही दुर्दैवी घटना घडली. नरेंद्र मोदी स्टेडियमवरून गुजरात टायटन्स संघातील खेळाडूंना हॉटेलकडे जात असताना संघाच्या बसला अचानक आग लागली आणि धूर पसरला. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे ही दुर्दैवी घटना घड़ली तेव्हा सर्व खेळाडू बसमध्येच होते. मात्र सुदैवाने, कोणताही मोठा अपघात झाला नाही आणि खेळाडू व सपोर्ट स्टाफला वेळेवर वाचवण्यात यश आलं.

बसमध्ये अचानक पसरला धूर

पीटीआयच्या रिपोर्टनुसार, आयपीएल फायनलनंतर गुजरातच्या संघाचे सर्व खेळाडू बसमधून हॉटेलच्या दिशेने जात होते, तेव्हाच बसमध्ये अचानक काही बिघाड झाला. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि बसच्या आत धूर पसरू लागला. यावेळी गुजरातचा कर्णधार शुबमन गिल, बटलर तसेतच संघातील खेळाडू आतमध्येच होते. बिगडलेली परिस्थिती पाहून, संघ व्यवस्थापन आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी खेळाडू आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांना तत्काळ बसमधून सुरक्षितपणे बाहेर काढलं. सुदैवाने, या घटनेत कोणताही खेळाडू किंवा कर्मचारी जखमी झाला नाही. या घटनेनंतर संपूर्ण संघ काही वेळ रस्त्याच्या कडेला थांबला होता. नंतर, खेळाडू आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांना हॉटेलपर्यंत पोहोचवण्यासाठी दुसऱ्या बसची व्यवस्था करण्यात आली.

आयपीएल फायनलमध्ये गुजरातचा पराभव

आयपीएलच्या अंतिम सामन्यात झालेल्या परभावामुळे गुजरात टायटन्सचा संघ आधीच निराश असताना, काल दिवसाअखेरीस ही घटना घडली. रविवारी आयपीएल 2026 च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (आरसीबी) विरुद्ध पाच गुजरातचा 5 विकेट्सनी पराभव झाला. या पराभवाने गुजरातच्या विजेतेपद जिंकण्याच्या आशा धुळीस मिळवल्या.

अंतिम सामन्यापूर्वीही गुजरात टायटन्सचे प्रवासाचे वेळापत्रक व्यस्त आणि आव्हानात्मक होतं. हा संघ 27 मे रोजी धरमशाला येथून मुल्लानपूरला गेला, जिथे 29 मे रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध दुसरा क्वालिफायर सामना खेळला गेला. मुल्लानपूरमधील त्यानंतर ते 30 मे रोजी अहमदाबादला परतणार होते, परंतु मुल्लानपूरमधील खराब हवामानामुळे संघाच्या विमानाला उशीर झाला. वारंवार झालेल्या विलंबानंतर, गुजरात टायटन्स संघ अखेर शनिवारी संध्याकाळी उशिरा त्यांच्या घरच्या मैदानावर, अहमदाबाद येथे पोहोचला.

त्यानंतर अंतिम सामन्यातील पराभव आणि हॉटेलवर परत येताना संघाच्या बसमधील तांत्रिक बिघाडामुळे गुजरात टायटन्सच्या प्रदीर्घ आणि खडतर मोहिमेचा निराशाजनक शेवट झाला. मात्र, सर्वात दिलासादायक बाब ही होती की, बसमध्ये धूर पसरूनही कोणालाही दुखापत वा त्रास झाला नाही, आणि सर्व खेळाडू तसेच कर्मचारी सुरक्षित राहिले.

Follow Us
केंद्रात मंत्रिपद, पक्षात कार्याध्यक्ष पद मिळत नसल्यामुळे पटेल नाराज?
राष्ट्रवादीत मोठी खळबळ! केंद्रात मंत्रिपद, पक्षात कार्याध्यक्ष पद मिळत नसल्यामुळे पटेल नाराज?
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुप्रिया सुळे...
Supriya Sule | सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुप्रिया सुळे जंतरमंतरवर
माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश
Ketan Agarwal Father | माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश; मित्तल कुटुंबावर गंभीर आरोप
सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
Amit Thackeray | सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
अर्थखातं राष्ट्रवादीलाच मिळणार! हसन मुश्रीफांचा मोठा दावा
Hasan Mushrif | अर्थखातं राष्ट्रवादीलाच मिळणार! हसन मुश्रीफांचा मोठा दावा; महायुतीतील चर्चांना नवं वळण
मुंबईत हायटाईडचा इशारा! 4.49 मीटर उंच लाटा उसळणार; BMC कडून सतर्क...
Mumbai Sea | मुंबईत हायटाईडचा इशारा! 4.49 मीटर उंच लाटा उसळणार; BMC कडून सतर्क राहण्याचे आवाहन
लाडक्या बहिणींसाठी साडीही परवडत नाही?; घोषणा मोठ्या... योजना बंद!
Rohini Khadse | लाडक्या बहिणींसाठी साडीही परवडत नाही?; घोषणा मोठ्या... योजना बंद! रोहिणी खडसेंनी सरकारला कोंडीत पकडलं
शिवसेना नेत्या शायना एनसी यांचं WhatsApp हॅक
Shaina NC | शिवसेना नेत्या शायना एनसी यांचं WhatsApp हॅक; अज्ञातांकडून पैशांची मागणी सुरू!
एकाच क्षणात होत्याचं नव्हतं! शाळेच्या व्हॅनला ट्रेनची जोरदार धडक
West Bangal | एकाच क्षणात होत्याचं नव्हतं! रेल्वे क्रॉसिंगवर शाळेच्या व्हॅनला ट्रेनची जोरदार धडक, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
अजितदादांनंतर अर्थखात्यासाठी जयंत पाटीलच सक्षम, तटकरे-पटेल....
Sushma Andhare | अजितदादांनंतर अर्थखात्यासाठी जयंत पाटीलच सक्षम, तटकरे-पटेल यांच्या विश्वासार्हतेवर थेट सवाल!; सुषमा अंधारेंच्या एका विधानाने राजकारणात खळबळ!
मोठी बातमी! …तरच एनडीएमध्ये या भाजपची शरद पवार गटासमोर मोठी अट, राजकारणात घडामोडींना वेग.

मोठी बातमी! …तरच एनडीएमध्ये या भाजपची शरद पवार गटासमोर मोठी अट, राजकारणात घडामोडींना वेग

खासदार विशाल पाटील यांना मोठा धक्का, मिरज पंचायत समितीचे सभापतीपद रद्द, पुन्हा निवडणूक होणार.

खासदार विशाल पाटील यांना मोठा धक्का, मिरज पंचायत समितीचे सभापतीपद रद्द, पुन्हा निवडणूक होणार

Garry Sobers: जर्मनीच्या सैनिकांनी वडिलांना मारलं, लहानपणी कापली दोन बोटं! सोबर्स यांच्या 5 गोष्टी.

Garry Sobers: जर्मनीच्या सैनिकांनी वडिलांना मारलं, लहानपणी कापली दोन बोटं! सोबर्स यांच्या 5 गोष्टी

मध्य रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत रात्री उशीरा बिघाड, कर्जतकडे जाणाऱ्या लोकल २० ते २५ मिनिटे उशीराने...

मध्य रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत रात्री उशीरा बिघाड, कर्जतकडे जाणाऱ्या लोकल २० ते २५ मिनिटे उशीराने..

Garry Sobers: महान अष्टपैलू क्रिकेटपटू सर गॅरी सोबर्स यांनी वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.

Garry Sobers: महान अष्टपैलू क्रिकेटपटू सर गॅरी सोबर्स यांनी वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Rain Alert : मान्सून कुठे-कुठे बसरणार? महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये पावसाची शक्यता, IMD चा अंदाज आला.

Rain Alert : मान्सून कुठे-कुठे बसरणार? महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये पावसाची शक्यता, IMD चा अंदाज आला