AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL : आयपीएलमध्ये हा खेळाडू कधीच 0 वर आऊट झाला नाही, खोऱ्याने धावा करत मिळवली ऑरेंज कॅप

आयपीएल स्पर्धेची 18 पर्व पार पडली असून आता 19व्या पर्वाची तयारी सुरू झाली आहे. पण काही विक्रमांची चर्चा सुरू झाली आहे. आयपीएल स्पर्धेत एक खेळाडू कधीच शून्यावर बाद झाला नाही. तसेच सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम नावावर असून ऑरेंज कॅपही मिळवली आहे.

IPL : आयपीएलमध्ये हा खेळाडू कधीच 0 वर आऊट झाला नाही, खोऱ्याने धावा करत मिळवली ऑरेंज कॅप
IPL : आयपीएलमध्ये हा खेळाडू कधीच 0 वर आऊट झाला नाही, खोऱ्याने धावा करत मिळवली ऑरेंज कॅपImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: Mar 19, 2026 | 4:01 PM
Share

आयपीएल स्पर्धेत नवे विक्रम रचणं आणि जुने विक्रम मोडणं हे आलंच. त्यामुळेच आयपीएल स्पर्धा सर्वात लोकप्रिय ठरली आहे. यंदाच्या पर्वातही काही विक्रम मोडले आणि रचले जाणार यात काही शंका नाही. दुसरं सातत्यपूर्ण कामगिरी केल्याशिवाय ऑरेंज कॅपचा मान मिळवणं कठीण असतं. हे प्रत्येक खेळाडूला जमतं असं नाही. एक खराब दिवस सर्व पाण्यात घालवू शकते. असं असताना या स्पर्धेच्या इतिहासात एका पर्वात सर्वाधिक धावा करून ऑरेंज कॅप मिळवणाऱ्या खेळाडूची चर्चा रंगली आहे. हा खेळाडू कधीच शून्यावर बाद झाला नाही. त्याची सातत्यपूर्ण कामगिरीची जोरदार चर्चा आहे. कारण शून्यावर बाद न होता सर्वाधिक धावा करण्याचा मान त्याला मिळाला आहे. त्याच्या एक ऑरेंज कॅपही आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून गुजरात टायटन्सचा साई सुदर्शन आहे.

24 वर्षीय साई सुदर्शनने आयपीएल 2022 पासून आतापर्यंत 40 सामने खेळले आहेत. या दरम्याने त्याने 49.81 च्या सरासरीने 1793 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट हा 145.89 चा आहे. यात 2 शतकं आणि 12 अर्धशतकांचा समावेश आहे. या कारकि‍र्दीत साई सुदर्शन एकदाही शून्यावर बाद झालेला नाही हे विशेष..मागच्या पर्वात साई सुदर्शनने जबरदस्त कामगिरी केली होती. त्याने 15 सामन्यात 759 धाव केल्या होत्या. यात एक शतक आणि सहा अर्धशतकांचा समावेश होता. त्याची सरासरी 54.21 आणि स्ट्राईक रेट हा 156.17 चा होता. या जोरावरच त्याला ऑरेंज कॅप मिळाली आणि सर्वाधिक धावा करण्याचा मान मिळाला.

रिंकु सिंहच्या नावावरही अशीच कामगिरी

साई सुदर्शन प्रमाणे कोलकाता नाईट रायडर्सचा रिंकु सिंहही या यादीत आहे. रिंकु सिंह कधीच शून्यावर बाद झालेला नाही. त्याने आयपीएल स्पर्धेत 1000 हून अधिक धावा केल्या आहेत. रिंकु सिंहमध्ये सामना संपण्याची ताकद आहे. त्याने शेवटच्या षटकात पाच षटकार मारून हे करून दाखवलं आहे. रिंकु सिंह आयपीएलमध्ये 59 सामने खेळला आहे. यात 4 अर्धशतकांच्या जोरावर 1099 धावा केल्या आहेत. यंदाच्या पर्वातही अशीच कामगिरी असेल, असा इच्छा त्याच्या चाहत्यांनी व्यक्त केली आहे.

Follow Us
खरात यांना नाशिक पोलिसांकडून अटक; समर्थकांकडून पत्रकारांना दमदाटी
खरात यांना नाशिक पोलिसांकडून अटक; समर्थकांकडून पत्रकारांना दमदाटी.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर APMC मार्केटमध्ये आंब्याच्या पेट्या दाखल
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर APMC मार्केटमध्ये आंब्याच्या पेट्या दाखल.
मुंबईतील गिरगावात शोभायात्रेचा उत्साह, तरूणाईचा उत्साह शिगेला
मुंबईतील गिरगावात शोभायात्रेचा उत्साह, तरूणाईचा उत्साह शिगेला.
गुढीपाडव्याचा उत्सव; राज ठाकरे आणि कुटुंबियांकडून गुढीचं पूजन
गुढीपाडव्याचा उत्सव; राज ठाकरे आणि कुटुंबियांकडून गुढीचं पूजन.
चाकणकर मूर्ख, खोट बोलत आहेत, चाकणकरांवर संजय राऊत यांचा जोरदार हल्ला
चाकणकर मूर्ख, खोट बोलत आहेत, चाकणकरांवर संजय राऊत यांचा जोरदार हल्ला.
ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात, मातोश्रीचं टेन्शन वाढताच...
ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात, मातोश्रीचं टेन्शन वाढताच....
सांगली जिल्हा परिषदेत मविआची सत्ता, अध्यक्षपदी पवार गटाची महिला
सांगली जिल्हा परिषदेत मविआची सत्ता, अध्यक्षपदी पवार गटाची महिला.
उद्या गुढीपाडवा... पण नववर्ष कधी सुरू होणार?
उद्या गुढीपाडवा... पण नववर्ष कधी सुरू होणार?.
ठाकरे युतीनंतर पहिलाच गुढीपाडवा मेळावा, राज ठाकरे काय बोलणार?
ठाकरे युतीनंतर पहिलाच गुढीपाडवा मेळावा, राज ठाकरे काय बोलणार?.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गॅस तुटवड्यानंतर आणखी एक मोठं संकट
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गॅस तुटवड्यानंतर आणखी एक मोठं संकट.