फोटो शेअर करुन आयसीसीने विचारलं, 'ओळखा पाहू कोण?' युझर्स म्हणाले - कुमारस्वामी

भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ फायनलमध्ये जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. हा सामना सुरु असताना आयसीसीने एक फोटो ट्विटरवर शेअर केला आणि त्यासोबत ‘ओळखा पाहू’, असं कॅप्शनही दिलं.

फोटो शेअर करुन आयसीसीने विचारलं, 'ओळखा पाहू कोण?' युझर्स म्हणाले - कुमारस्वामी

मुंबई : आयसीसी विश्वचषक-2019 चा पहिला सेमीफायनल सामना मॅनचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर होतो आहे. यामध्ये भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ फायनलमध्ये जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. हा सामना सुरु असताना आयसीसीने एक फोटो ट्विटरवर शेअर केला आणि त्यासोबत ‘ओळखा पाहू’, असं कॅप्शनही दिलं.

आयसीसीच्या या ट्वीटवर अनेकांनी मजेशीर रिप्लाय दिले आहेत. काहींनी हा फोटो महेंद्रसिंग धोनीचा असल्याचं सांगितलं. तर अनेकांनी हा फोटो रविंद्र जाडेजाचा असल्याचं म्हटलं. यातच वंशज भारद्वाज नावाच्या युझरने या फोटोवर कमेंट करत कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचा फोटो शेअर केला, त्यासोबत ‘हे आहेत ते’, असं कॅप्शन दिलं.

ज्यांच्यामुळे काही क्रिकेटर्स आणि ट्रोलर्सचं घर चालत आहेत, हे तेच आहेत, असं ट्विटर युझर निधिने लिहिलं.

आयसीसीने शेअर केलेला हा फोटो भारतीय कर्णधार विराट कोहलीचा आहे. कारण, त्यांच्या कॅपवर जो चश्मा लागला आहे, तोच चश्मा आज विराज कोहलीने सामन्यादरम्यान घातला होता.

भारत आणि न्यूझीलंडमध्ये आज आयसीसी विश्वचषक-2019 चा पहिला सेमीफायनल सामना खेळवला जात होता. मात्र, पावसाने या सामन्यात विर्जन घातलं. या सामन्यात टॉस जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, भारताच्या गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांना धोबीपछाड दिला. न्यूझीलंडला अत्यंत कमी धावांमध्ये रोखण्यात भारत यशस्वी झाला. मात्र, 46.1 षटकात पावसाने खोळंबा घातल्याने सामना थांबवावा लागला. तोपर्यंत न्यूझीलंडच्या फलंदाजांनी 5 विकेट्स गमावून 211 धावा केल्या होत्या.

संबंधित बातम्या :

भारत वि. न्यूझीलंड सामन्यात खोळंबा, पाऊस न थांबल्यास पुढे काय?

विश्वचषकाची सेमीफायनल आणि फायनल रद्द झाल्यास पुढे काय होतं?

न्यूझीलंडविरुद्ध मैदानात उतरताच धोनीने इतिहास रचला

भारत वि. न्यूझीलंड सामन्यादरम्यान मैदानावरुन जाण्यास विमानांना बंदी

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *