विश्वचषकाची सेमीफायनल आणि फायनल रद्द झाल्यास पुढे काय होतं?

आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2019 वर अनेकदा पावसाचं सावट राहिलं. त्यामुळे 45 पैकी 4 सामने रद्दही झाले. पावसामुळे इतके सामने रद्द होण्याची ही विश्वचषकातील पहिली वेळ आहे.

विश्वचषकाची सेमीफायनल आणि फायनल रद्द झाल्यास पुढे काय होतं?
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Jul 09, 2019 | 6:32 PM

मँचेस्टर: आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2019 वर अनेकदा पावसाचं सावट राहिलं. त्यामुळे 45 पैकी 4 सामने रद्दही झाले. पावसामुळे इतके सामने रद्द होण्याची ही विश्वचषकातील पहिली वेळ आहे.

आता सेमीफायनल आणि फायनलवरही पावसाचे सावट आहे. त्यामुळे जर पावसामुळे सेमीफायनल आणि फायनल दोन्ही सामने रद्द झाले तर काय होणार असा प्रश्न अनेक क्रिकेट चाहत्यांच्या मनात घर करुन आहे. जर असं झालं तर मग विश्वचषक विजेता संघ कसा ठरणार हा देखील अनेकांना पडलेला प्रश्न.

विजेता मैदानावरच ठरावा यासाठी अनेक नियम

आयसीसीने विजेता मैदानावरच ठरावा यासाठी अनेक नियम बनवले आहेत. मालिकेतील सामन्यांसाठी केलेल्या नियमांनुसार आयसीसीने दोन सेमीफायनल आणि फायनलसाठी प्रत्येकी एक राखीव दिवसाचीही निवड केली आहे. याद्वारे एकदा सामना रद्द झाला तरी तो पुन्हा अन्य दिवशी खेळला जावा, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. यानुसार पहिल्या सेमीफायनलसाठी 10 जुलै, दुसऱ्या सेमीफायनलसाठी 12 जुलै आणि फायनलसाठी 15 जुलै या राखील दिवसांची निवड केली आहे. या नियोजनामुळे सामन्यात कोठेही अडथळा आला तर तो सामना राखीव दिवशी खेळवला जातो. संबंधित सामना त्याच दिवशी पूर्ण व्हावा यासाठीच प्रयत्न होतात. त्यासाठी 20 षटकांपर्यंत कपात करणे अथवा 2 तास खेळ वाढवणे असे पर्याय देखील उपलब्ध असतात.

सामना एकही चेंडू न खेळता पूर्णपणे रद्द झाला तर?

एखादा सामना एकही चेंडू न खेळता पूर्णपणे रद्द झाला तर मग विजेता कसा ठरवणार असाही प्रश्न शिल्लक राहतो. अशा स्थितीत गुणतालिकेत सर्वाधिक गुण असलेल्या संघांना फायदा होतो. या नियमाप्रमाणे जर भारत-न्युझीलंड सामना रद्द झाला तर भारत थेट फायनलमध्ये जाईल. कारण गुणतालिकेत भारत पहिल्या तर न्युझीलंड चौथ्या स्थानी आहे. अशीच स्थिती ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडम सामन्यात तयार झाली तर दुसऱ्या क्रमांकावर असणारा ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये प्रवेश करेल.

अंतिम सामन्यासाठीचे नियम

फायनल सामना पावसाच्या अथवा अन्य कारणाने निश्चित दिवशी आणि राखीव दिवशी रद्द झाला तर फायनलमधील दोन्ही संघाना विजेतेपद विभागून दिले जाते.


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें