भारत वि. न्यूझीलंड सामन्यात खोळंबा, पाऊस न थांबल्यास पुढे काय?

हा सामना रद्द झाल्यास काय होईल, असा प्रश्न प्रत्येक चाहत्याच्या मनात आहे. पहिल्या सेमीफायनसाठी 10 जुलै हा राखीव दिवस ठेवण्यात आलाय. त्यामुळे आज सामना पूर्ण न झाल्यास हा सामना उद्या याच मैदानावर खेळवण्यात येईल.

भारत वि. न्यूझीलंड सामन्यात खोळंबा, पाऊस न थांबल्यास पुढे काय?
Follow us
| Updated on: Jul 10, 2019 | 11:03 AM

लंडन : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात पावसाने खोळंबा घातलाय. भारताने न्यूझीलंडला अत्यंत कमी धावा देण्यात यश मिळवलंय. पण 46.1 षटकात पावसाने खोळंबा घातल्याने सामना थांबवावा लागला. त्यामुळे हा सामना रद्द झाल्यास काय होईल, असा प्रश्न प्रत्येक चाहत्याच्या मनात आहे. पहिल्या सेमीफायनसाठी 10 जुलै हा राखीव दिवस ठेवण्यात आलाय. त्यामुळे आज सामना पूर्ण न झाल्यास हा सामना उद्या याच मैदानावर खेळवण्यात येईल.

सामना पुन्हा खेळवण्यात आला तरी पहिल्यापासून सुरुवात केली जात नाही. भारताने न्यूझीलंडला अत्यंत कमी धावा करु दिल्या आहेत. सामना उद्या झाला तरीही 46.1 षटकापासूनच पुढे सुरुवात होईल. म्हणजेच सामना पुन्हा नव्याने सुरु होणार नाही. 11 जुलैला होणाऱ्या दुसऱ्या सेमीफायनलसाठी 12 जुलै हा राखीव दिवस ठेवण्यात आलाय.

राखीव दिवसाला सामना रद्द झाल्यास पुढे काय?

या परिस्थितीमध्ये या परिस्थितीमध्ये दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिला जाईल. गुणतालिकेत भारत सध्या 15 गुणांसह अव्वलस्थानी आहे. जर सामना रद्द होऊन भारताला 1 गुण मिळाला तर भारताच्या खात्यात 16 गुण जमा होतील. दुसरीकडे न्यूझीलंड 11 गुणांसह चौथ्या स्थानी आहे. त्यांना एक गुण मिळाला तर त्यांच्या खात्यात  12 गुण जमा होतील. त्यामुळे सर्वाधिक गुणांमुळे भारत सहज फायनलमध्ये पोहोचेल.

या विश्वचषकात पावसाने पहिल्यापासूनच खोळंबा घातलाय. याअगोदरही न्यूझीलंड आणि भारत यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. चार सामने पावसामुळे रद्द झाले होते. परिणामी अनेक संघांना याचा फटका बसला. पावसामुळे सेमीफायनल रद्द झाल्यास न्यूझीलंडसाठी अत्यंत दुःखद गोष्ट असेल, कारण न खेळताच त्यांना विश्वचषकातील प्रवास इथेच थांबवावा लागेल.

फायलन रद्द झाल्यास पुढे काय?

सेमीफायनल आणि फायनल सामना टाय झाल्यानंतर सुपर ओव्हरच्या माध्यमातून निकाल लावला जातो. पण फायनल सामना पावसामुळे रद्द झाल्यास राखीव दिवसानंतर दोन्ही संघांना ट्रॉफी शेअर करावी लागते.

Non Stop LIVE Update
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.