AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cricket : श्रेयसची खेळी व्यर्थ, रोहितच्या टीमचा 6 विकेट्सने विजय, सलग दुसरा सामना जिंकला

Icc T20i World Cup 2026 Warm Up Match : नेपाळने चेन्नईत रोहित पौडेल याच्या नेतृत्वात कॅनडावर मात करत सलग दुसरा सराव सामना जिंकला. नेपाळने यासह वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सज्ज असल्याचं दाखवून दिलंय.

Cricket : श्रेयसची खेळी व्यर्थ, रोहितच्या टीमचा 6 विकेट्सने विजय, सलग दुसरा सामना जिंकला
T20 World Cup TrophyImage Credit source: Daniel Pockett-ICC/ICC via Getty Images
| Updated on: Feb 05, 2026 | 6:34 PM
Share

टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेआधी 4 फेब्रुवारीला एकमेव सराव सामन्यात दणदणीत विजय मिळवला. भारताने गतउपविजेता दक्षिण आफ्रिकेवर 30 धावांनी मात केली. भारताने यासह मुख्य स्पर्धेआधी तयारी आणखी मजबूत केली. या स्पर्धेआधी सहभागी संघ सध्या सराव सामने खेळत आहेत. या स्पर्धेतील 12 व्या सराव सामन्याचं आयोजन हे चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. या सामन्यात रोहितच्या संघाने विजय मिळवला. रोहितच्या नेतृत्वातील विजयामुळे श्रेयसची खेळी व्यर्थ ठरली.

चेन्नईतील या मैदानात आयोजित करण्यात आलेल्या सामन्यात कॅनडा विरुद्ध नेपाळ आमनेसामने होते. नेपाळने या सामन्यात रोहित पौडेल याच्या नेतृत्वात कॅनडावर 6 विकेट्सने विजय मिळवला. नवनीत धालीवाल याच्या 41 आणि श्रेयस मोव्वा याने केलेल्या नाबाद 38 धावांच्या जोरावर कॅनडाने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 161 रन्स केल्या. नेपाळने प्रत्युत्तरात 162 धावांचं आव्हान हे 12 बॉलआधी 6 विकेट्स राखून पूर्ण केलं. नेपाळने 18 षटकांत 4 विकेट्स गमावून 162 धावा केल्या.

नेपाळची बॅटिंग

नेपाळची विजयी धावांचा पाठलाग करताना काही खास सुरुवात राहिली नाही. कॅनडाने सलमीवीर फलंदाज कुशल भुर्टेल याला आऊट करत नेपाळला पहिला धक्का दिला. जसकरण सिंह याने कुशलला 12 रन्सवर एलबीडब्ल्यू केलं. त्यानंतर सुंदीप जोरा आणि आसिफ शेख या जोडीने निर्णायक भागीदारी करत नेपाळच्या विजयाचा पाया रचला. मात्र त्यानंतर सुंदीप आऊट झाला. सुंदीपने 30 बॉलमध्ये 40 रन्सचं योगदान दिलं. तर आसिफला रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर जावं लागलं. आसिफने 29 चेंडूत 3 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 58 धावा केल्या. त्यानंतर लोकेश बाम 5 धावा करुन माघारी परतला.

लोकेश आऊट झाल्याने नेपाळचा स्कोअर 16.1 ओव्हरमध्ये 3 आऊट 143 असा झाला. त्यानंतर दीपेंद्र सिंह आयरी आणि गुलशन झाला या जोडीने नेपाळला विजयापर्यंत पोहचवलं. दीपेंद्रने नाबाद 9 धावा केल्या. तर गुलशनने 31 धावांची निर्णायक खेळी केली. कॅनडासाठी जसकरण व्यतिरिक्त साद बिन जफर आणि अजयवीर हुंदल या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

नेपाळचा दुसरा विजय

दरम्यान नेपाळचा हा सराव सामन्यातील सलग आणि एकुण दुसरा विजय ठरला आहे. नेपाळ टीमने कॅनडाआधी यूएईवर 3 फेब्रुवारीला 7 विकेट्सने मात केली होती.

मी केवळ शब्दाचा पक्का नाही, तर कामाचा माणूस आहे
मी केवळ शब्दाचा पक्का नाही, तर कामाचा माणूस आहे.
दुबेंना मोदी-शाहांचा पाठिंबा होता का? वर्षा गायकवाड यांची टीका
दुबेंना मोदी-शाहांचा पाठिंबा होता का? वर्षा गायकवाड यांची टीका.
सभागृहात न बसणाऱ्या खासदारांची पंतप्रधान मोदींकडून कानउघडणी!
सभागृहात न बसणाऱ्या खासदारांची पंतप्रधान मोदींकडून कानउघडणी!.
मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी ठाकरेंची सेना उमेदवार देणार
मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी ठाकरेंची सेना उमेदवार देणार.
वाहतूक कोंडीला नेहरूच जबाबदार म्हणू नका; अंबादास दानवेंचा खोचक टोला
वाहतूक कोंडीला नेहरूच जबाबदार म्हणू नका; अंबादास दानवेंचा खोचक टोला.
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून राऊत यांचा खोचक टोला
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून राऊत यांचा खोचक टोला.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेनंतर 'विकासा'चा आणखी एक मार्ग झाला बंद
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेनंतर 'विकासा'चा आणखी एक मार्ग झाला बंद.
दुष्काळी तालुक्यात थंड प्रदेशातील राजमाची यशस्वी शेती
दुष्काळी तालुक्यात थंड प्रदेशातील राजमाची यशस्वी शेती.
पवार कुटुंबाची विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक; राज्याचं लक्ष
पवार कुटुंबाची विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक; राज्याचं लक्ष.
राजकीयदृष्टीनं सुरू असलेल्या चर्चेवरून दु:ख वाटतं! रोहित पवारांनी व्यक
राजकीयदृष्टीनं सुरू असलेल्या चर्चेवरून दु:ख वाटतं! रोहित पवारांनी व्यक.