AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ओरिजनल फिनिशर कोण?’, बेवनच्या वाढदिवशी आयसीसीने थेट धोनीला ट्रोल केलं, फॅन्स भडकले!

ऑस्ट्रेलियाचे महान दिग्गज फलंदाज ज्यांना क्रिकेट जगतात सर्वोत्तम मॅच फिनिशर म्हणून ओळखलं जातं, काल (08 मे) त्यांचा वाढदिवस पार पडला. यानिमित्ताने आयसीसीने त्यांना शुभेच्छा देताना थेट भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. (ICC Trolled MS Dhoni Micael bevans Birthday)

'ओरिजनल फिनिशर कोण?', बेवनच्या वाढदिवशी आयसीसीने थेट धोनीला ट्रोल केलं, फॅन्स भडकले!
| Updated on: May 09, 2021 | 10:31 AM
Share

मुंबई : ऑस्ट्रेलियाचे महान दिग्गज फलंदाज मायकल बेवन…. ज्यांना क्रिकेट जगतात सर्वोत्तम मॅच फिनिशर म्हणून ओळखलं जातं, काल (08 मे) त्यांचा वाढदिवस पार पडला. यानिमित्ताने आयसीसीने त्यांना शुभेच्छा देताना थेट भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला (MS Dhoni) ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. आयसीसीच्या (ICC) या प्रयत्नावर मात्र क्रिकेट फॅन्स चांगलेच भडकलेले पाहायला मिळाले. फॅन्सनी ट्विटरवर शाळा भरवली. (ICC Trolled Captain Cool MS Dhoni Over Micael bevans Birthday)

मायकल बेवन यांना ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज म्हणून ओळखलं जातं तसंच आपल्या मॅच फिनिश करण्याच्या स्टाईलने त्यांचं जागतिक क्रिकेटवर गारुड होतं. क्रिकेटमध्ये त्यांचं नाव आणखीही आदराने घेतलं जातं. काल त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आयसीसीने धोनीला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.

आयसीसीने धोनीला ट्रोल केलं?

आयसीसीनं बेव्हनच्या वाढदिवसाला ट्विट करताना महेंद्रसिंह धोनीचं नाव घेतलेलं नाही. बेव्हनचं वर्णन करताना बर्फासारखा थंड असणारा त्याच्या जवळपास देखील जाऊ शकत नाही, असं म्हणतं निळ्या रंगाचा इमोजी शेअर केलाय. त्यामुळे नेटकरी चिडलेत.

आयसीसीच्या ट्विटनंतर चाहत्यांनी भरवली शाळा

आयसीसीचा खोचकपणा नेटकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ट्विटरवर शाळा भरवली. महेंद्रसिंग धोनीची महती सांगत मायकल यांना शुभेच्छा देताना धोनीला चिमटा काढण्याची गरज होती का?, असे प्रश्न चाहत्यांनी उपस्थित केले आहेत.

कोण होते मायकल बेवन

क्रिकेटमध्ये फार थोडे मॅच फिनिशर आहेत. ज्यामध्ये भारतीय संघाचा माजी कर्णधार एम एस धोनीचं (MS Dhoni) नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल. त्याच्या मॅच फिनिश करण्याच्या स्टाईलबद्दल अनेक वेळा चर्चा झाल्या. पण त्याच्याही अगोदर क्रिकेट जगतात एक ओरिजनल मॅच फिनिशर होता तो खास त्याच्या स्टाईलमध्ये मॅच संपवायचा आणि संघाला विजय मिळवून द्यायचा, आम्ही सांगतोय ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज मायकल बेवन (Michael Bevan) यांच्याबद्दल…

ऑस्ट्रेलियाकडून खेळताना ते मधल्या फळीतील फलंदाज म्हणून खेळायचे. चार किंवा पाच नंबरला खेळायला येऊन मॅच संपवूनच ते ड्रेनिंग रुममध्ये जायचे, अशी त्यांची खासियत होती. ऑस्ट्रेलियाकडून खेळताना त्यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यांनी 46 अर्धशतक केली तर 6 शतकंही ठोकली.

मायकेल बेवन ऑस्ट्रेलियन संघाचे संकटमोचक फलंदाज म्हणून ओळखला गेले. 90 च्या दशकात जेव्हा जेव्हा ऑस्ट्रेलियन संघ पराभवाच्या छायेत असायचा तेव्हा मायकेल बेव्हन खेळपट्टीवर पाय रोवायचे आणि आपल्या संघाला विजय मिळवून देऊनच पॅव्हेलियनमध्ये जायचे. 1994 मध्ये त्यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तर 2004 मध्ये त्यांनी शेवटचा सामना खेळला.

(ICC Trolled Captain Cool MS Dhoni Over Micael bevans Birthday)

हे ही वाचा :

केविन पीटरसनच्या वाढलेल्या पोटावर ख्रिस गेलची जबरा कमेंट

करीनाच्या गाण्यावर प्राचीच्या अदा, पृथ्वी शॉ झाला फिदा, म्हणाला ‘कातिलाना’

‘भारतीय संघात निवड होताच आईवडिलांना कडकडून मिठी मारली’, 23 वर्षीय अर्जन नागवासवाला भावूक

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.