ICC World Cup 2019 : वन डे क्रिकेटमधून निवृत्तीनंतर शोएब मलिकची घोषणा, पाकिस्तान झिंदाबाद!

पाकिस्तानचा सर्वात अनुभवी अष्टपैलू खेळाडू अशी ओळख असणाऱ्या शोएब मलिकने कसोटीनंतर आता एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. विश्वचषकात बांगलादेशवर पाकिस्तानने विजय मिळवल्यानंतर शोएब मलिकने ही घोषणा केली.

ICC World Cup 2019 : वन डे क्रिकेटमधून निवृत्तीनंतर शोएब मलिकची घोषणा, पाकिस्तान झिंदाबाद!

shoaib malik retirement लंडन : पाकिस्तानचा सर्वात अनुभवी अष्टपैलू खेळाडू अशी ओळख असणाऱ्या शोएब मलिकने कसोटीनंतर आता एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. विश्वचषकात बांगलादेशवर पाकिस्तानने विजय मिळवल्यानंतर शोएब मलिकने ही घोषणा केली. विश्वचषकातील पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात आले, त्यानंतर मलिकने वन डे क्रिकेटला अलविदा केला. यापूर्वी 2015 मध्येच त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.

दरम्यान पाकिस्तान-बांगलादेश सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शोएब मलिकने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. “मी आज आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटला अलविदा करत आहे. क्रिकेट कारकिर्दीत मला साथ देणाऱ्या खेळाडू, प्रशिक्षक, मित्र, कुटुंबीय आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझे चाहते या सर्वांचे आभार, आय लव्ह यू ऑल पाकिस्तान झिंदाबाद”.

वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी शोएब मलिक टी 20 क्रिकेट खेळणार आहे.

इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानावर काल (5 जुलै) पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश सामना झाला. मात्र या सामन्यात शोएब मलिकला स्थान देण्यात आलं नव्हतं. विश्वचषकात शेवटचा सामना शोएब मलिक भारताविरुद्ध खेळला आणि तोच त्याचा अखेरचा सामना ठरला.

या सामन्यात पाकिस्तानने सुरुवातीला फलंदाजी करत बांगलादेशसमोर विजयासाठी 316 धावांचं आव्हान दिलं. या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेश सर्व बाद 221 धावांपर्यंतची मजल मारु शकला. त्यामुळे पाकिस्तानने यंदाच्या विश्वचषकाच्या शेवटच्या लढतीत 94 धावांनी विजय मिळवला. हा विजय मिळवला असला तरी, या आधीच्या पराभवामुळे पाकिस्तान विश्वचषकातून आऊट झाला आहे.

विश्वचषकात निराशजनक कामगिरी

यंदाच्या विश्वचषकात शोएबने निराशजनक कामगिरी केली. इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषकात  पाकिस्तानकडून त्याला केवळ 3 सामन्यात संधी देण्यात आली. त्यातील दोन सामन्यात तो शून्यावर बाद झाला. तर एका सामन्यात त्याने केवळ 8 धावा केल्या. विश्वचषकात त्याला चांगली फलंदाजी न करता आल्याने पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांची निराशा झाली. मलिकच्या जागी हरिस सोहेल याला संघात जागा मिळाली आणि त्याने दमदार कामगिरी केल्याने मलिकला पुन्हा संघात स्थान देण्यात आले नाही. शोएबने त्याचा शेवटचा सामना भारताविरुद्ध खेळला होता. त्यात तो शून्यावर बाद झाला.

कसोटी क्रिकेटमधून 2015 मध्ये निवृत्ती

मलिकने एक दिवसीय क्रिकेटमधून 2015 मध्येच कसोटी क्रिकेटमधून संन्यास घेतला होता. आता त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली आहे. आता तो फक्त टी 20 सामन्यात खेळताना दिसणार आहे. पुढील वर्षी म्हणजे 2020 मध्ये होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपनंतर तो सर्व प्रकारच्या क्रिकेटला रामराम करेल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी

मलिकने 1994 मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये शोएबने 287 सामन्यांत 9 शतकं आणि 44 अर्धशतकांच्या जोरावर 7 हजार 534 धावा  केल्या. यात 143 या  त्याच्या वैयक्तित सर्वोच्च धावा आहेत.

फलंदाजीसोबत गोलंदाजीतही उत्कृष्ट कामगिरी

शोएब मलिकने कसोटी क्रिकेटमध्ये 35 सामन्यात 1898 धावा केल्या आहेत. त्यात त्याने 3 शतकं आणि 8 अर्धशतक ठोकली आहेत. 245 ही त्याची कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या आहे. फलंदाजीसोबत शोएबने गोलंदाजीतही उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याने एकदिवसीय सामन्यात 158 विकेट्स घेतल्या आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *