थरारक सामन्यात द. आफ्रिकेकडून आस्ट्रेलियाचा पराभव, भारत वि. न्यूझीलंड सेमीफायनल रंगणार

गुणतालिकेत भारताने अव्वल स्थानावर झेप घेतली. यामुळे चौथ्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंडविरुद्ध भारताचा सेमीफायनल होईल. तर इंग्लंड विरूद्ध आॅस्ट्रेलिया यांच्यातही फायनलसाठी लढत होईल

थरारक सामन्यात द. आफ्रिकेकडून आस्ट्रेलियाचा पराभव, भारत वि. न्यूझीलंड सेमीफायनल रंगणार

लंडन : द. आफ्रिकेने संपूर्ण विश्वचषकात समाधानकारक कामगिरी केली नसली तरी समारोप मात्र जबरदस्त केलाय. गुणतालिकेत अव्वल असलेल्या आॅस्ट्रेलियावर द. आफ्रिकेने दहा धावांनी मात केली. द. आफ्रिकेने दिलेल्या 326 धावांचा पाठलाग करताना आॅस्ट्रेलियाचा डाव 315 धावांवर आटोपला. द. आफ्रिकेकडून कॅगिसो रबाडाने सर्वाधिक तीन फलंदाजांना माघारी पाठवलं. तर पहलुकालवायो 2, प्रिटोरियस 02, इम्रान ताहिर आणि ख्रिस माॅरिसने प्रत्येकी एक विकेट घेतली.

आॅस्ट्रेलियाकडून सलामीवीर डेव्हिड वाॅर्नरने पुन्हा एकदा 122 धावांची शतकी खेळी केली. त्यानंतर एलेक्स कॅरीनेही 69 चेंडूत 85 धावांचं योगदान दिलं. पण द. आफ्रिकेच्या उत्तम गोलंदाजीमुळे आॅस्ट्रेलियाला पराभवाचा सामना करावा लागला.

भारत वि. न्यूझीलंड सेमीफायनल

गुणतालिकेत भारताने अव्वल स्थानावर झेप घेतली. यामुळे चौथ्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंडविरुद्ध भारताचा सेमीफायनल होईल. तर इंग्लंड विरूद्ध आॅस्ट्रेलिया यांच्यातही फायनलसाठी लढत होईल. विशेष म्हणजे या विश्वचषकात न्यूझीलंड एकमेव असा संघ आहे, ज्यासोबत भारताचा सामना झाला नाही. पावसामुळे या दोन संघांमधला सामना रद्द झाला होता.

भारत वि. न्यूझीलंड हा पहिला सेमीफायनल मँचेस्टरमध्ये 9 जुलैला खेळवण्यात येईल. तर आॅस्ट्रेलिया वि. इंग्लंड हा दुसरा सेमीफायनल 11 जुलैला होईल आणि दोन विजयी संघ विश्वविजेता होण्यासाठी 14 तारखेला लाॅर्ड्सवर भिडतील.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *