टीम पेनला कर्णधारपदावरुन हटवा, भारताच्या माजी दिग्गज क्रिकेटपटूची मागणी

आजचं बेशिस्त आणि आक्षेपार्ह वागणं पाहता तो कर्णधारपदावर राहण्यास लायक नाही, अशी सडकून टीका गावस्कर यांनी केलीय.

टीम पेनला कर्णधारपदावरुन हटवा, भारताच्या माजी दिग्गज क्रिकेटपटूची मागणी

सिडनी :  भारताचे माजी दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर (Sunil Gawaskar) यांनी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनची (Tim paine) कर्णधारपदावरुन हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. टीम पेनने कर्णधारपदाच्या ज्या काही मर्यादा असतात त्या सगळ्या मर्यादांचं उल्लंघन केलंय. त्याचं तिसऱ्या कसोटीतील अखेरच्या दिवशीचं बेशिस्त आणि आक्षेपार्ह वागणं पाहता तो कर्णधारपदावर राहण्यास लायक नाही, अशी सडकून टीका गावस्कर यांनी केलीय. (Ind Vs Aus 3rd test Tim paine Should Be removed From Captaincy Says Sunil GaVaskar)

“रविचंद्रन अश्विन आणि हनुमा विहारी शारिरीक दुखापत सहन करत आपल्या संघाला ड्रॉ च्या दिशेने घेऊन जात होते. तर प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार त्यांचं मानसिक खच्चीकरण करत होता. हे निश्चितच शोभा देणारं नव्हतं. अश्विनवर त्याने ज्याप्रकारे शेरेबाजी केली ती खेळभावनेला शोभणारी नव्हती”, असं गावस्कर म्हणाले.

“टीम पेनने अश्विनवर शेरेबाजी केली पण शेवटी अश्विन जिंकला. समोरच्या फलंदाजाच्या खेळाविषयी बोलणं, हा प्रतिस्पर्धी खेळाडूला अधिकार आहे. परंतु समोरचा संघ दुखापतीने झुंजतो आहे तसंच जिगरबाज पद्धतीने लढतो आहे. मात्र भारताचा हा सगळा जिगरबाज खेळ सहन करणं किंवा रुचवणं टीम पेनला जमलं नाही. म्हणून त्याने त्याची हताशा दाखवून दिली”, अशा शेलक्या शब्दात गावस्कर यांनी टीम पेनला सुनावलं आहे.

दुखापतग्रस्त दोन खेळाडू शिवाय ऑस्ट्रेलियाच्या चिवट माऱ्याचा भारतावर कसलाही परिणाम झाला नाही. दुखापतग्रस्त हनुमा विहारी (Hanuma Vihari) आणि आर. अश्विनने (R Ashwin) चिवट खेळी करत शेवटपर्यंत पीचवर उभे राहून सिडनी कसोटी ड्रॉ केली. ही कसोटी मालिका ड्रॉ झाल्याने मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. याचदरम्यान, ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनने (tim paine )अश्विनचं मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न केला. अश्विननेही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं. अश्विनच्या प्रत्युत्तरानंतर टीम पेनचं तोंड पाहण्यासारखं झालं होतं.

अश्विनचं टीम पेनला जोरदार प्रत्युत्तर

भारताचा स्कोअर 319 रन्सवर 5 विकेट होता. नॅथन लायनसमवेत सारेच बोलर्स आर अश्विन आणि विहारीला आऊट करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र दोघा फलंदाजांनी अशी बॅटिंग केली की ऑस्ट्रेलियाच्या नाकात दम आला. शेवटी ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनने अश्विनची एकाग्रता भंग करण्याचं काम केलं. पेन म्हणाला, “आता गाबा टेस्टची जास्त वाट पाहू शकत नाही. यापुढची टेस्ट मॅच ब्रिस्बेनच्या गाबावरच होणार आहे”, त्यावर अश्विननेही त्याला तितकंच जोरदार प्रत्युत्तर दिलं. अश्विन म्हणाला,” तुम्ही भारतात खेळायला येण्याची आम्ही वाट पाहू, ती तुमची शेवटची सिरीज असेल”. अश्विनच्या या प्रत्युत्तरानंतर पेनचं तोंड पाहण्यासारखं झालं होतं.

संबंधित बातम्या

Published On - 10:36 pm, Mon, 11 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI