Ind vs Aus : भारताची ऑस्ट्रेलियावर 36 धावांनी मात, मालिकेत बरोबरी

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर 36 धावांनी मात केली. तीन सामन्याच्या या वनडे मालिकेमध्ये भारताने 1-1 ने बरोबरी साधली आहे.

Ind vs Aus : भारताची ऑस्ट्रेलियावर 36 धावांनी मात, मालिकेत बरोबरी
Follow us
| Updated on: Jan 18, 2020 | 9:53 AM

राजकोट : टीम इंडियानेदुसऱ्या वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियावर 36 धावांनी मात करुन, तीन सामन्यांच्या या वनडे मालिकेत  1-1 अशी बरोबरी साधली आहे. भारताने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 341 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या कांगारुंना भारतीय गोलंदाजांनी 304 धावांत गुंडाळलं. भारताकडून मोहम्मद शमीने 3 विकेट्स घेतल्या. तर नवदिप सैनी, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेत भारताला विजय मिळवून दिला. या मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना 19 जानेवारीला बंगळूरुमध्ये होणार आहे.

या सामन्यात टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने 6 बाद 340 धावांचा डोंगर रचला होता. सलामीवीर शिखर धवनच्या 96, विराट कोहलीच्या 76 आणि मधल्या फळीतील धडाकेबाज फलंदाज के एल राहुलच्या 80 धावांच्या जोरावर भारताने निर्धारित 50 षटकात 6 बाद 340 अशी मजल मारली होती.

या आव्हानाचा पाठलाग करताना, ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर आणि पहिल्या सामन्यात शतक ठोकणारा डेव्हिड वॉर्नरने अवघ्या 15 धावा करुन माघारी परतला. मनीष पांडेने त्याचा अप्रतिम झेल टिपला.

यानंतर कर्णधार फिंच आणि स्टिवन स्मिथ यांनी दुसऱ्या विकेट्ससाठी 82 धावांची खेळी केली. त्यानंतर रविंद्र जाडेजाने फिंचची विकेट घेत धक्का दिला. ऑस्ट्रेलियाकडून स्मिथने 102 चेंडूत 9 चौकारांसह 98 धावांची खेळी केली. त्याचं शतकं अवघ्या दोन धावांनी हुकलं. स्मिथचा विकेट गेल्यानंतर मात्र ऑस्ट्रेलियाचे फलंदाज माघारी परतले.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने 6 बाद 340 धावांचा डोंगर रचला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 341 धावांची गरज होती. सलामीवीर शिखर धवनच्या 96, विराट कोहलीच्या 76 आणि मधल्या फळीतील धडाकेबाज फलंदाज के एल राहुलच्या 80 धावांच्या जोरावर भारताने निर्धारित 50 षटकात 6 बाद 340 अशी मजल मारली होती.

करो या मरोच्या लढाईत विराट कोहलीने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत भारतीय सलामीवीरांनी हा निर्णय सार्थ ठरवला. रोहित शर्मा (42) आणि शिखर धवन (96) या दोघांनी दमदार खेळी करत, पहिल्या विकेटसाठी 81 धावांची भागीदारी रचली. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर कर्णधार कोहली आज तिसऱ्या क्रमांकावर आला. त्याने धवनच्या साथीने धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला. कोहलीने 76 चेंडूत 78 धावा केल्या.  पहिल्या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या के एल राहुल आज चौथ्या स्थानी आला. राहुलने अवघ्या 52 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांसह तब्बल 80 धावा कुटल्या.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा वन डे सामना आज राजकोटमध्ये (IndvsAus Rajkot one day) खेळवण्यात आला. पहिल्या वन डे सामन्यात तब्बल 10 विकेट्सने पराभव झालेल्या टीम इंडियाला, तीन सामन्यांच्या मालिकेत आपलं आव्हान कायम ठेवण्यासाठी, आजचा सामना जिंकणं आवश्यक होते. मुंबईतील वानखेडे स्टेडियममधील पहिल्या वन डेत ऑस्ट्रेलियाने 10 विकेट्स राखून हा सामना जिंकल्याने, कागारुंचं मनोबल उंचावलं होते. पण अखेर कोहली ब्रिगेड ऑस्ट्रेलियाचा पराभव करत विजय (IndvsAus Rajkot one day) मिळवला.

पहिल्या वन डे सामन्यात विराट कोहली चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला होता. मात्र त्याला मोठी खेळी करण्यात अपयश आलं. त्यामुळे कोहली आज पुन्हा त्याच्या नेहमीच्या तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला.

दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि अरॉन फिंच हे तुफान फॉर्ममध्ये असल्याचं पहिल्या सामन्यात पाहायला मिळालं. दोघांनीही नाबाद शतकं झळकावत 258 धावांची अभेद्य भागीदारी रचली. या दोघांना लवकरात लवकर कसं बाद करता येईल, याचं उत्तर भारतीय गोलंदाजांना शोधावं लागेल.

कोहली विरुद्ध झाम्पा

जगातील सर्वोत्तम फलंदाज असलेल्या विराट कोहलीला ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अडम झाम्पाने अनेकवेळा बाद केलं आहे. आंतरराष्ट्रीय गोलंदाज जिथे कोहलीची विकेट घेण्यासाठी घाम गाळतात, तिथे झाम्पाने तब्बल 6 वेळा कोहलीला माघारी धाडलं आहे. वन डे सामन्यात 4 वेळा तर 2 वेळा टी 20 सामन्यात झाम्पाने कोहलीची विकेट घेतली आहे.

संभाव्य संघ भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, शिखर धवन, शिवम दुबे, श्रेयस अय्यर, रवींद्र जाडेजा, केदार जाधव, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मनीष पांडे, लोकेश राहुल, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर

ऑस्ट्रेलिया : अरॉन फिंच (कर्णधार), अॅलेक्स कॅरी, पॅट कमिन्स, अॅश्टन अगर, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेजलवूड, मार्नस लाबुशॅन, केन रिचर्डसन, डी आर्की शॉर्ट, स्टीव स्मिथ, मिशेल स्टार्क, अॅश्टन टर्नर, डेविड वार्नर, अॅडम झाम्पा.

Non Stop LIVE Update
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात.
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर.
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट.
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली.
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका.
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे.
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा.