AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND Vs AUS | पहिल्या कसोटीत विकेटकीपर साहा की पंत? दिग्ग्जाची ‘या’ खेळाडूला पसंती

पंत आणि साहाने पहिल्या कसोटीसाठी विकेटकीपर म्हणून दावेदारी सिद्ध केली आहे.

IND Vs AUS | पहिल्या कसोटीत विकेटकीपर साहा की पंत? दिग्ग्जाची 'या' खेळाडूला पसंती
| Updated on: Dec 13, 2020 | 4:56 PM
Share

एडिलेड : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 17 डिसेंबरपासून 4 सामन्यांची कसोटी मालिका (IND VS AUS Test Series 2020-21) खेळण्यात येणार आहे. या आधीच्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला आहे. तर टी 20 मालिकेत टीम इंडियाने कांगारुंचा पराभव केला आहे. त्यामुळे ही कसोटी मालिका कोण जिंकणार याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे. मात्र त्याआधी पहिल्या कसोटी सामन्यात अंतिम 11 खेळाडूंमध्ये विकेटकीपर म्हणून कोणाला संधी द्यायची असा प्रश्न उभा राहिला आहे. टीम इंडियाकडे ऋषभ पंत (Rushabh Pant) आणि ऋद्धीमान साहा (riddhiman Saha) असे 2 विकेटकीपर आहेत. यामुळे हा पेच निर्माण झाला आहे. मात्र प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणला विकेटकीपर म्हणून संधी द्यावी, याबाबत टीम इंडियाचा माजी खेळाडू संजय मांजरेकरने मत मांडलं आहे. ind vs aus Sanjay Manjrekar selects Riddhiman Saha as wicketkeeper in first Test against Australia

पहिल्या कसोटीत विकेटकीपर म्हणून पंत की साहा यापैकी कोणाला संधी मिळावी, असा प्रश्न मांजरेकरला ट्विटरवर विचारला होता. यावर मांजरेकरने साहाला पसंती दिली. “कसोटीत कौशल्याचां कस लागतो. विकेटकीपरच्या स्कीलसला प्रथम प्राधान्य द्यायला हवं. पंतने स्टीव्ह स्मिथचा झेल सोडल्याने त्याने द्विशतक लगावलं. त्यामुळे मी साहाला पंसती देईन. तसेच आपल्याला सर्वोत्तम विकेटकीपर हवाय, त्यामुळेच मी साहाला पसंती देतो, असं प्रत्युतर मांजरेकरने एका चाहत्याच्या ट्विटला दिलं.

दोघेही प्रबळ दावेदार

पहिल्या सराव सामन्यात साहाने तर दुसऱ्या सराव सामन्यात पंतला विकेटकीपिंगची संधी देण्यात आली. या दोघांनी विकेटकीपिंगसह बॅटिंगनेही दमदार कामगिरी केली आहे. पहिल्या सराव सामन्यात साहाने अर्धशतकी खेळी केली. तर दुसऱ्या सामन्यात पंतने शानदार शतक झळकावलं. यामुळे साहा आणि पंत या दोघांनी पहिल्या सामन्यात विकेटकीपर म्हणून प्रबळ दावेदारी सिद्ध केली आहे. त्यामुळे या दोघांमध्ये विकेटकीपरच्या जागेसाठी चढाओढ पाहायला मिळणार आहे.

टीम इंडियाला कडवं आव्हान

ऑस्ट्रेलियाचा प्रमुख गोलंदाज मिचेल स्टार्क संघात परतला आहे. स्टार्कने कौटुंबिक कारणांमुळे टी 20 मालिकेतून माघार घेतली होती. मात्र आता स्टार्क परतला आहे. यामुळे टीम इंडियाच्या फलंदाजांना स्टार्कसह पॅट कमिन्स, जॉश हेजलवूड, नॅथन लायन या गोलंदाजाच्या भेदक माऱ्याचा सामना करावा लागणार आहे. त्यातच पहिल्या कसोटीनंतर विराट मायदेशी परतणार आहे. यामुळे टीम इंडियाचा कसोटी मालिकेत चांगलाच कस लागणार आहे.

कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिली टेस्ट – 17 ते 21 डिसेंबर – अॅडलेड

दुसरी टेस्ट – 26 ते 31 डिसेंबर – मेलबर्न किंवा अॅडलेड

तिसरी टेस्ट – 7 ते 11 जानेवारी – सिडनी

चौथी टेस्ट – 15 ते 19 जानेवारी – ब्रिस्बेन

असा आहे कसोटी संघ : विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋद्धीमान साहा (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन आणि मोहम्मद सिराज

संबंधित बातम्या :

IND vs AUS : रोहितबाबत बीसीसीआयची मोठी अपडेट, ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्यासाठी द्यावी लागणार आणखी एक फिटनेस टेस्ट क्रिकेट

India vs Australia 2020 2nd T20 | ऑस्ट्रेलियाच्या डोकेदुखीत वाढ, मिचेल स्टार्कची टी 20 मालिकेतून माघार

ind vs aus Sanjay Manjrekar selects Riddhiman Saha as wicketkeeper in first Test against Australia

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...