IND vs NZ : टीम इंडियाची जादू चालणार की पुन्हा चाखणार पराभवाची चव ? नागपूरमध्ये न्युझीलंडविरोधात काय घडणार ?
अवघ्या 15 महिन्यांच्या आतच न्यूझीलंडने भारताला घरच्या मैदानावर दोन मोठे धक्के दिले आहेत. पहिले, त्यांनी कसोटी मालिकेत भारताला 3-0 च्या फरकाने क्लीन स्वीप दिली. एवढंच नव्हे तर घरच्या मैदानावर एकदिवसीय मालिकेतही भारताला न्युझीलंडकडून 2-1 असा पराबव सहन करावा लागला. आता टी-20 मालिकेत काय होणार ?

न्युझीलंडचा संघ सध्या भारताच्या दौऱ्यावर आला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 (T-20 Series) मालिकेला आज, बुधवारपासून सुरुवात होत आहे. त्यातील पहिला सामना हा नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जाणार आहे. आगामी टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर तयारी म्हणून ही मालिका दोन्ही संघांसाठी शेवटची संधी आहे. कारण त्यानंतर 7 फेब्रुवारीपासूनच टी-20 वर्ल्डकपची सुरूवात होणार आहे. त्यापूर्वी भारत (Team Idia) आणि न्यूझीलंडचा (New Zealand) टी-20 रेकॉर्ड कसा आहे आणि या मैदानावरील दोन्ही संघांची आकडेवारी काय दर्शवते ते जाणून घेऊया,
न्यूझीलंडचा भारतात टी20 रेकॉर्ड कसा आहे?
15 महिन्यांच्या कालावधीत, न्यूझीलंडने घरच्या मैदानावर भारताला दोन मोठे धक्के दिले. आधी त्यांनी म्हणजे, त्यांनी कसोटी मालिकेत भारताला 3-0 ने हरवलं. तर एकदिवसीय मालिकेतही किवींनी भारतावर 2-1 अशी मात केली. टी-20 सामन्याबंद्दल सांगायचं झालं तर न्युझीलंडने भारतात आत्तापर्यंत 5 वेळा टी20 सीरिज, सामने खेळले आहेत.
त्या पाचपैकी तीन टी-20 मालिका भारतीय संघाने जिंकल्या. मात्र2012 साली जेव्हा न्यूझीलंडने भारतात पहिली टी-२० मालिका खेळली तेव्हा त्यांनी भारताला हरवलं होतं. 2015-16 मध्ये वेस्ट इंडिजने विश्वचषक टी-20 मालिका जिंकली होती. मात्र, त्यानंतर टीम इंडियाने नेहमी या मालिकेत वर्चस्व गाजवले आहे.
नागपूरमध्ये काय घडलं ?
नागपूरच्या या स्टेडियमबद्दल बोलायचे झाले तर, आतापर्यंत येथे एकूण 13 टी-20 सामने खेळले गेले आहेत. या मैदानावर पहिला टी-20 सामना 2009 साली खेळला गेला होता. शेवटचा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 2022 मध्ये खेळला गेला होता, ज्यामध्ये भारताने 6 विकेट्सने विजय मिळवला होता.
या मैदानावरील भारत-न्यूझीलंडची आकडेवारी कशी ?
टीम इंडियाने या मैदानावर पाच टी-20 सामने खेळले आहेत. त्यापैकी तीन जिंकले तर दोन गमावले आहेत. दरम्यान, न्यूझीलंडने येथे एक सामना खेळला असून त्यांनी त्यात विजय मिळवला. खरं तर, 2016 साली याच मैदानावर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात एक सामना खेळला गेला होता. या सामन्यात किवी संघाने भारताचा 47 धावांनी पराभव केला.
भारत आणि न्यूझीलंडमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड
एकूण टी-२० सामने – 25
भारताने जिंकले – 12 सामने
न्यूझीलंडने जिंकले – 10
अनिर्णित – 3 सामने
भारतीय संघ :
सूर्यकुमार यादव (कर्णधार ), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), ईशान किशन, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, रिंकू सिंह, अर्शदीप सिंह, रवि बिश्नोई, हर्षित राणा.
