AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL : श्रीलंकेचा डाव 284 धावांवर आटोपला, पहिल्या डावात भारताकडे 178 धावांची आघाडी

भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला कसोटी सामना सुरू आहे. या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात भारताने 178 धावांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे दुसऱ्या डावात काय निकाल लागेल याची उत्सुकता वाढली आहे.

IND vs SL : श्रीलंकेचा डाव 284 धावांवर आटोपला, पहिल्या डावात भारताकडे 178 धावांची आघाडी
IND vs SL : श्रीलंकेचा डाव 284 धावांवर आटोपला, पहिल्या डावात भारताकडे 178 धावांची आघाडीImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Aug 17, 2026 | 5:05 PM
Share

भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला कसोटी सामना गॉल आंतरराष्ट्रीय मैदानात सुरू आहे. या सामन्यात वारंवार पावसाचा व्यत्यय आला, तरी हा सामना निर्णायक ठरू शकतो अशा स्थितीत आहे. कारण तिसऱ्या दिवसाचा खेळ संपण्याच्या एक तासाआधीच श्रीलंकेचा डाव आटोपला. भारताने पहिल्या डावात सर्व गडी गमवून 462 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेडने 284 धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे भारताकडे 178 धावांची आघाडी आहे. या आघाडीसह भारतीय संघ दुसर्‍या डावात खेळणार आहे. खेळपट्टी फिरकीला मदत करणारी आहे. त्यामुळे दुसऱ्या डावात भारताने अतिरिक्त 200 धावा केल्या तरी सामना भारताच्या पारड्यात झुकण्याची शक्यता आहे.

श्रीलंकेची डावाची सुरूवात काही खास झाली नाही. आघाडीचे पाच फलंदाज झटपट बाद झाले. 90 धावांवर 5 गडी तंबूत होते. पण सहाव्या विकेटसाठी सोनल दिनुषा आणि निरोशन डिकवेला यांनी 146 धावांची निर्णायक भागीदारी केली. केएल राहुलने झेल सोडल्यानंतर निरोशनने त्याचा पुरेपूर फायदा घेतला. या दोघांच्या खेळीमुळे श्रीलंकन संघ सुस्थितीत आला. निरोशनन डिकवेला याने 115 चेंडूत 80 धावा केल्या. तर सोनल डिनुषा याने 168 चेंडूंचा सामना केला आणि 100 धावांची खेली केली. या दोघांव्यतिरिक्त एकही फलंदाज मोठी धावसंख्या करू शकलं नाही.

भारताकडून फिरकीपटू मानव सुथारने चमकदार कामगिरी केली. त्याने 21.4 षटकं टाकली आणि 76 धावा देत 4 विकेट काढल्या. त्या खालोखाल रवींद्र जडेजाने 21 षटकं टाकत 3 गडी बाद केले. तर मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि कुलदीप यादवच्या खात्यात प्रत्येकी एक विकेट गेली.

Follow Us
तरुणांसाठी शासनाची खास योजना! 1 कोटीच्या गुंतवणुकीवर 50 लाखांची...
तरुणांसाठी शासनाची खास योजना! उद्योगातील 1 कोटीच्या गुंतवणुकीवर 50 लाखांची सबसिडी, तब्बल...
मानेवाडीच्या मैदानावर रंगली भन्नाट बैलगाडा शर्यत; गावातीला आणवणींना...
मानेवाडीच्या मैदानावर रंगली भन्नाट बैलगाडा शर्यत; गावातील आठणवणींना उजाळा देणारा जबरदस्त व्हिडीओ
नुसती धावपळ...धुराचा कल्लोळ...आयकर विभागाच्या कार्यालयाला भीषण आग!
नुसती धावपळ... धुराचा लोट...आयकर विभागाच्या कार्यालयाला आग! अग्निशमनच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये धवपळ, 13 हुन अधिक...
गोल्डन नेस्टजवळ मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
गोल्डन नेस्टजवळ मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; मोठी दुर्घटना टळली
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
तर तुमच्या मागे रेडा लावणार', गिरीश महाजनांबाबत राऊतांचं विधान...
तर तुमच्या मागे रेडा लावणार', गिरीश महाजनांबाबत राऊतांचं अगदी जिव्हारी लागणारं वक्तव्य
राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट
मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट: राज्याच्या विकासासाठी मागितले सहकार्य
रायगडला नवा पालकमंत्री, गोगावलेंच्या निवडीने माणगावात आनंदोत्सव...
रायगडला नवा पालकमंत्री, गोगावलेंच्या निवडीने माणगावात आनंदोत्सव
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेशोत्सवासाठी रस्ते दुरुस्तीचा घेणार आढावा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेशोत्सवासाठी रस्ते दुरुस्तीचा घेणार आढावा