भारताचा नवा यॉर्करकिंग मोहम्मद सिराजची रोहित शर्माबद्दल तक्रार, म्हणाला…

भारताचा नवा यॉर्करकिंग मोहम्मद सिराजने सलामीवीर रोहित शर्माबद्दल एक प्रेमळ तक्रार केली आहे. सिराजच्या प्रेमळ तक्रारीमधून भारताच्या खेळाडूंचं एकमेकांशी नातं किती घट्ट आहे, हे लक्षात येईल. (India Tour of England WTC Final 2021 Mohammed Siraj Complain About Rohit Sharma)

भारताचा नवा यॉर्करकिंग मोहम्मद सिराजची रोहित शर्माबद्दल तक्रार, म्हणाला...
रोहित शर्मा आणि मोहम्मद सिराज
Follow us
| Updated on: Jun 05, 2021 | 6:42 AM

मुंबई :  टीम इंडियाचे (Team India) सगळे खेळाडू इंग्लंडमध्ये (India Tour of England) पोहोचले आहेत. 2 जून रोजी मध्यरात्री भारतीय संघांच्या खेळाडूंनी इंग्लंडसाठी उड्डाण घेतलं. 3 जून रोजी संघ लंडनमध्ये पोहोचला. तिथून 2 तास बसने प्रवास करत साऊथहॅम्प्टन… यादरम्यान भारतीय खेळाडूंनी प्रवासाचा आनंद घेतला. यादरम्यानच्या गमतीजमती, किस्से भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने एक ट्विट करत प्रेक्षकांसमोर आणल्या आहेत. याच व्हिडीओत भारताचा नवा यॉर्करकिंग मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) सलामीवीर रोहित शर्माबद्दल (Rohit Sharma) एक प्रेमळ तक्रार केली आहे. सिराजच्या प्रेमळ तक्रारीमधून भारताच्या खेळाडूंचं एकमेकांशी नातं किती घट्ट आहे, बॉन्डिंग आणि वेवलेन्थ किती चांगली आहे, हेच दिसून येतं. (India Tour of England WTC Final 2021 Mohammed Siraj Complain About Rohit Sharma)

सिराजची रोहित शर्माबद्दल कोणती तक्रार?

भारताच्या इंग्लंड दौऱ्याची जशी प्रेक्षकांना उत्सुकता आहे तशी खेळाडूंना देखील आहे. प्रवासात खेळाडूंनी धमाल केली. कोण सिनेमा पाहिला तर कुणी आराम करणं पसंत केलं. सगळे खेळाडू खूप खूश दिसून येत होते. फक्त मोहम्मद सिराजने रोहित शर्माबद्दल एक प्रेमळ तक्रार केली. रोहित शर्माने मला झोपू दिलं नाही, त्यामुळे मला झोप लागली नाही, असं मोहम्मद सिराज म्हणाला.

व्हिडीओमध्ये सिराज म्हणतो, “आता आम्ही हवाई अड्ड्यावर उतरलोय. आता हॉटेलवर पोहोचण्यासाठी आम्हाला दोन तासांचा प्रवास करावा लागतोय. मी दोन तास झोपलो पण नंतर रोहितभाईने मला उठवलं. ज्यानंतर मला झोपच लागली नाही. लँडिगअगोदर 2 तास मला थोडी झोप लागली. सध्या मी आता थकलोय. कारण काल खूप हेवी प्रॅक्टिस केलीय.”

तीन दिवसांचा क्वारंटाईन पिरियड

न्यूझीलंड आणि भारत यांच्याच 18 ते 23 जूनदरम्यान साऊथहॅम्प्टनच्या क्रिकेट ग्राऊंडवर सामना रंगेल. या सामन्याची उत्सुकता दोन्ही देशांच्या खेळाडूंना आहे. WTC फायनलअगोदर न्यूझीलंडच्या संघाला इंग्लंडविरुद्ध 2 कसोटी सामने खेळायचे आहेत. त्यापैकी सध्या एक कसोटी सुरु आहे.

कोरोनाना संसर्गाच्या अनुषंगाने ब्रिटन सरकारने घालून दिलेल्या नियमांनुसार भारतीय खेळाडूंना आता क्वारंटाईन रहावं लागणार आहे. इथून पुढे 3 दिवस त्यांना बंद खोलीत रहावं लागेल. यादम्यान खेळाडूंना एकमेकांना भेटता येणार नाही. भारतीय संघाला 3 दिवसांचा क्वारंटाईन पिरीयड पूर्ण करायचा आहे.

खेळाडूंच्या कोरोना टेस्ट होणार

न्यूझीलंडला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये मात देण्यासाठी भारतीय संघाची खरी रणनिती ही मैदानावरच होईल परंतु त्याअगोदर भारतीय खेळाडूंना तीन दिनसांच्या क्वारंटाईनमध्ये रहावं लागेल. या क्वारंटाईनच्या दिवसांत भारतीय खेळाडूंच्या रेग्युलर कोरोना टेस्ट केल्या जातील. यादरम्यान बायोबबलमधून बाहेर पडण्याची त्यांना परवानगी देण्यात येणार नाही.

भारताचे शिलेदार तयार

इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघात सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये असणाऱ्याच खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) या संपूर्ण टीमचे नेतृत्त्व करणार असून कोहलीसह अजिंक्य रहाणे(उपकर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव हेही या दौऱ्यात असणार आहेत. या दौऱ्यात आधी डब्लूटीसीचा अंतिम सामना आणि त्यानंतर इंग्लंडविरोधात 5 कसोटी सामने भारत खेळणार आहे.

भारताचं 72 तासांचं विशेष मिशन

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यासाठीची तयारी टीम इंडिया (Inidan Cricket Team) बंद खोलीत करणार आहे. यासाठी संघाने एक ‘सिक्रेट प्लॅन’ तयार केला आहे. त्या प्लॅननुसार संपूर्ण टीम 72 तास बंद खोलीत राहून न्यूझीलंडच्या खेळाडूंची सर्व रणनीती लक्षपूर्वक जाणून घेणार आहे. प्रत्येक खेळाडूची खेळण्याची पद्धत महत्त्वाचे शॉट या साऱ्याचा अभ्यास यावेळी करण्यात येईल.

(India Tour of England WTC Final 2021 Mohammed Siraj Complain About Rohit Sharma)

हे ही वाचा :

रोहित शर्मा की विराट कोहली, टी-20 बेस्ट बॅट्समन कोण? गावस्करांनी सांगितलं तिसरंच नाव!

WTC Final पूर्वी टीम इंडियावर निर्बंध, साऊथहॅम्प्टनमध्ये खेळाडूंना एकमेकांना भेटण्यासही मज्जाव

सुनील गावस्करांची भविष्यवाणी, भारत-इंग्लंड मालिका कोण जिंकणार, स्पष्टच सांगितलं!

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.