IndvsAus: अंधुक प्रकाश की रडीचा डाव, 17 षटकं आधीच खेळ थांबला!

IndvsAus: अंधुक प्रकाश की रडीचा डाव, 17 षटकं आधीच खेळ थांबला!

सिडनी: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या सिडनी कसोटीचा तिसऱ्या दिवसाचा खेळ अपुऱ्या प्रकाशामुळे लवकर थांबवण्यात आला.  दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने 6 बाद 236 अशी मजल मारली आहे. भारताकडे अद्याप 386 धावांची आघाडी आहे. आजचा जवळपास 17 षटकांचा खेळ वाया गेला. त्यामुळे अर्थातच त्याचा फायदा ऑस्ट्रेलियाला झाला. अन्यथा या 17 षटकांमध्ये भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव आजच गुंडाळून त्यांच्यावर फॉलोऑन लादला असता. सध्या पीटर हॅण्डस्कॉम्ब 28 आणि पॅट कमीन्स 25 धावांवर खेळत आहेत. ऑस्ट्रेलियाला फॉलोऑन टाळण्यासाठी जवळपास दोनशे धावांची गरज आहे. भारताकडून कुलदीप यादवने तीन, रवींद्र जाडेजाने दोन तर शमीने एक विकेट घेतली.

कमीन्स आणि हॅण्ड्सॉम्ब खेळत असताना, 83 व्या षटकात तिसऱया चेंडूवर रवींद्र जाडेजाने हॅण्डस्कॉम्बला पायचितची अपील केली. अंपायरने त्याला बाद दिलं नाही. त्यानंतर कोहलीने रिव्ह्यू घेतला, पण पंचाच्या बाजूने निर्णय देण्यात आला आणि भारताचा रिव्ह्यू वाया गेला. यानंतर अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या सिडनी कसोटीत भारत इतिहास रचण्याच्या तयारीत आहेत. भारताने पहिल्या डावात 622 धावांचा डोंगर उभारल्यानंतर, ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव तातडीने गुंडाळण्याचं ध्येय भारतीय गोलंदाजांचं आहे. चहापानापर्यंत ऑस्ट्रेलियाचे पाच फलंदाज तंबूत परतले.  चहापानापर्यंत ऑस्ट्रेलियाने 5 बाद 198 अशी मजल मारली . भारताचे वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटू कांगारुंना झटपट गुंडाळण्याचा प्रयत्न करत आहेत.

दरम्यान, आज ऑस्ट्रेलियाने बिनबाद 24 धावांवरुन तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. मर्कस हॅरिस आणि उस्मान ख्वाजा यांनी आज टिच्चून फलंदाजी केली. या दोघांनी 72 धावांची सलामी दिली. शेवटी कुलदीप यादवने ख्वाजाला पुजाराकरवी झेलबाद करुन भारताला पहिलं यश मिळवून दिलं. ख्वाजा 27 धावा करुन माघारी परतला. मात्र मर्कस हॅरिसने एक बाजू लावून धरली.  हॅरिसने जबरदस्त खेळी करत 79 धावा फटकावल्या. त्याला जाडेजाने त्रिफळाचित केलं. मग शॉन मार्शला जाडेजाने जास्त वेळ मैदानात टिकू न देता त्याला 8 धावांवर माघारी धाडलं. तर सावध खेळी करणाऱाया लाबुशेनला शमीने 38 धावांवर बाद केलं. त्यानंतर  टीम हेडची डोकेदुखी कुलदीप यादवने दूर केली. हेडने 20 धावा केल्या. यानंतर कर्णधार टीम पेनचा अडथळाही कुलदीपनेच दूर केला. पेनने केवळ 5 धावा केल्या.

भारताचा धावांचा डोंगर

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या सिडनी कसोटीचा दुसरा दिवस, भारताच्या चेतेश्वर पुजारा आणि विकेटकीपर ऋषभ पंतच्या खणखणीत शतकांनी गाजवला. पुजाराने 193 तर पंतने नाबाद 159 धावा ठोकल्यानंतर, भारताने पहिला डाव 7 बाद 622 धावांवर घोषित केला. भारताने पहिल्या डावात चेतेश्वर पुजारा 193, ऋषभ पंत नाबाद 159, जाडेजा 81 आणि मयांक अग्रवाल 77 धावांच्या जोरावर 7 बाद 622 अशी मजल मारली. त्यानंतर फलंदाजीस उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवसअखेर  बिनबाद 24 धावा केल्या.

संबंधित बातम्या 

AusvsInd: पुजाराची हुकमी तर पंत-जाडेजाच्या वादळी खेळीने दिवस गाजवला  

रिषभ पंतने 52 वर्ष जुना रेकॉर्ड मोडला   

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI