AusvsInd: पुजाराची हुकमी तर पंत-जाडेजाच्या वादळी खेळीने दिवस गाजवला

सिडनी: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या सिडनी कसोटीचा दुसरा दिवस, भारताच्या चेतेश्वर पुजारा आणि विकेटकीपर ऋषभ पंतच्या खणखणीत शतकांनी गाजवला. पुजाराने 193 तर पंतने नाबाद 159 धावा ठोकल्यानंतर, भारताने पहिला डाव 7 बाद 622 धावांवर घोषित केला. त्यानंतर फलंदाजीस उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवसअखेर  बिनबाद 24 धावा केल्या. सलामीवीर मार्क्स हॅरिस 19 तर उस्मान ख्वाजा 5 धावांवर मैदानात आहेत. …

AusvsInd: पुजाराची हुकमी तर पंत-जाडेजाच्या वादळी खेळीने दिवस गाजवला

सिडनी: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या सिडनी कसोटीचा दुसरा दिवस, भारताच्या चेतेश्वर पुजारा आणि विकेटकीपर ऋषभ पंतच्या खणखणीत शतकांनी गाजवला. पुजाराने 193 तर पंतने नाबाद 159 धावा ठोकल्यानंतर, भारताने पहिला डाव 7 बाद 622 धावांवर घोषित केला. त्यानंतर फलंदाजीस उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवसअखेर  बिनबाद 24 धावा केल्या. सलामीवीर मार्क्स हॅरिस 19 तर उस्मान ख्वाजा 5 धावांवर मैदानात आहेत.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या सिडनी कसोटीत, टीम इंडियाचा हुकमी एक्का चेतेश्वर पुजाराचं द्विशतक अवघ्या 7 धावांनी हुकलं. पुजारा 193 धावा ठोकून माघारी परतला. ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायनने पुजाराला स्वत:च्याच गोलंदाजीवर झेलबाद केलं. पुजारा बाद होताच सिडनी मैदानाने अक्षरश: उभं राहून पुजाराचे जबरदस्त खेळीला सलाम केला. टाळ्यांच्या कडकडाटात पुजाराचं स्वागत केलं. पुजारा बाद झाला त्यावेळी भारताची अवस्था 6 बाद 418 अशी होती.

पुजाराचं शतक हुकल्यानंतर खेळाची सूत्रं ऋषभ पंत आणि रवींद्र जाडेजाने हाती घेतली. सुरुवातील सावध खेळणाऱ्या पंत-जाडेजाने मग ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची पिसं काढायला सुरुवात केली. ऋषभ पंतने डॅशिंग फटकेबाजी केली, त्याला जाडेजाच्या तुफानी फटक्यांची साथ मिळाली. बघता बघता ऋषभ पंतने कसोटीतील दुसरं शतक पूर्ण केलं. अवघ्या 137 चेंडूत त्याने 8 चौकारांच्या सहाय्याने शतक झळकावलं.  शतकानंतर पंतपचा प्रहार सुरुच होता. त्याने 185 चेंडूत दीडशतक पूर्ण करुन धोनीनंतर सर्वाधिक धावा करणारा विकेटकीपरच मान मिळवला.

एकीकडे पंतने शतक झळकावलं असताना, जाडेजानेही वेगाने अर्धशतकाकडे वाटचाल केली. केवळ वाटचाल न करता जाडेजा थांबला नाही. जाडेजाने 89 चेंडूत अर्धशतक झळकावत, भारताला सहाशे धावांचा टप्पा ओलांडून दिला.  जाडेजा शतकाकडे वाटचाल करत असताना लायननेच 81 धावांवर त्याला त्रिफळाचित केलं. जाडेजा बाद होताच कोहलीने भारताचा डाव 7 बाद 622  धावांवर घोषित केला. जाडेजा पंतने सातव्या विकेटसाठी 204 धावांची भागीदारी केली.

दुसऱ्या दिवसाची सुरुवात

आज भारताने कालच्या 4 बाद 303 धावांवरुन खेळाला सुरुवात केली. चेतेश्वर पुजारा आणि हनुमा विहारीने आजच्या डावाचा प्रारंभ केला. ऑस्ट्रेलियाला पहिल्या सत्रात हनुमा विहारीलाच बाद करता आलं. काल 39 धावांवर नाबाद असलेला हनुमा विहारी तीन धावांची भर घालून 42 धावांवर बाद झाला. पुजारा आणि हनुमाने पाचव्या विकेटसाठी तब्बल 101 धावांची भागीदारी रचली.

हनुमा विहारी बाद झाल्यानंतर विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत फलंदाजीसाठी मैदानात उतरला. त्याने पुजाराला उत्तम साथ दिली.

दरम्यान, कसोटीचा आज दुसरा दिवस आहे. आज टीम इंडिया धावांचा डोंगर उभारुन ऑस्ट्रेलियाला फलंदाजीची संधी देते का ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

पहिल्या दिवसाचा खेळ

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या सिडनी कसोटीत भारताचा हुमकी एक्का चेतेश्वर पुजाराने पहिला दिवस गाजवला. पुजाराने पहिल्याच दिवशी खणखणीत शतक ठोकलं. त्यामुळे दिवसअखेर भारताला 4 बाद 303 अशी मजल मारता आली. पुजारा 130 आणि हनुमा विहारी 39 धावांवर नाबाद राहिला. चेतेश्वर पुजाराने ऑस्ट्रेलियात धावांचा रतीब कायम ठेवला . पुजाराने सिडनी कसोटीतही खणखणीत शतक ठोकलं. पुजाराचं हे कारकिर्दीतील 18 वं कसोटी शतक आहे. पुजाराने 199 चेंडूत 100 धावा ठोकल्या. या मालिकेतील पुजाराने झळकावलेलं हे तिसरं शतक ठरलं. यापूर्वी पुजाराने पहिल्या अॅडलेड कसोटीत  123, तिसऱ्या मेलबर्न कसोटीत 106 धावा केल्या होत्या. त्यानंतर पुजाराने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या आणि मालिकेतील शेवटच्या कसोटीतही शतक झळकावलं. पुजाराच्या शतकाने भारताने 4 बाद 300 धावांचा टप्पा ओलांडला.

संबंधित बातम्या 

AusvsInd: पुजाराने दिवस गाजवला, दिवसअखेर भारत 4/303   

अपयशी राहुलसाठी कोहलीचा हट्ट का?

टीम पेनने आधी पंतला डिवचलं, आता पेनच्या पत्नीचीही ‘वादात’ उडी   

रोहितच्या घरी गोंडस बाळाचं आगमन, विमान पकडून हिटमॅन मुंबईकडे   

मेलबर्न कसोटीत भारताची ऑस्ट्रेलियावर मात   

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *