AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs England 1st ODI Live Streaming | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड आमनेसामने, जाणून घ्या सामन्याबद्दल सर्वकाही

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेला (india vs england 1st odi 2021) आजपासून (23 मार्च ) सुरुवात होत आहे.

India vs England 1st ODI Live Streaming | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड आमनेसामने, जाणून घ्या सामन्याबद्दल सर्वकाही
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेला (india vs england 1st odi 2021) आजपासून (23 मार्च ) सुरुवात होत आहे.
| Edited By: | Updated on: Mar 23, 2021 | 7:40 AM
Share

पुणे : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिला एकदिवसीय (India vs England 1st ODI) सामना आज (23 मार्च) खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. हा सामना पुण्यातील गहुंजे स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. इंग्लंडच्या भारत दौऱ्यातील ही शेवटची मालिका आहे. इंग्लंडला याआधीच्या कसोटी आणि टी 20 मालिकेत पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे इंग्लंडचा या मालिकेत विजय मिळवण्याचा प्रयत्न असणार आहे. तर टीम इंडिया आपली विजयी घोडदौड कायम ठेवण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे. या पहिल्या सामन्याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात. (india vs england 1st odi 2021 pune live streaming when where to watch match from Maharashtra Cricket Association Stadium)

सामना किती वाजता सुरु होणार?

सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 1 वाजता टॉस उडवण्यात येणार आहे.

सामना कुठे खेळवण्यात येणार?

या सामन्याचे आयोजन पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे स्टेडियममध्ये करण्यात आले आहे.

मॅच कुठे पाहता येणार?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर पाहता येणार आहेत. सोबतच tv9marathi.com या आमच्या वेबसाईटवर तुम्हाला सामन्याचे लाईव्ह अपडेट्स जाणून घेता येतील.

सामना मोबाईलवर पाहता येणार का?

होय. हॉटस्टार आणि जियो टीव्हीवरही सामना ऑनलाईन पाहायला मिळणार आहे.

प्रेक्षकांना स्टेडियममध्ये परवानगी असणार का?

नाही. ही संपूर्ण मालिका बंद दाराआड खेळवण्यात येणार आहे. म्हणजेच या सामन्यासाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये उपस्थित राहण्याची परवानगी नसणार आहे. महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाचा उद्रेक वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

इंग्लंडची टीम

इयॉन मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, मोईन अली, जॉनी बेयरस्टो, सॅम बिलिंग्स, जॉस बटलर, सॅम करन, टॉम करन, लियम लिविंगस्टोन, मॅट पर्किंसन, आदिल रशीद, बेन स्टोक्स, रीस टॉपले, मार्क वुड, ख्रिस जॉर्डन, जॅक बॉल आणि डेव्हिड मलान.

एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, केएल राहुल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, कृणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दुल ठाकूर.

संबंधित बातम्या :

India vs England, 1st Odi | पहिल्या सामन्याआधी कर्णधार विराट कोहलीची मोठी घोषणा,रोहित-शिखर सलामीला येणार

India vs England Odi Series 2021 | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड, एकूण 100 वेळा आमनेसामने, कोण वरचढ, कोण कमजोर?

(india vs england 1st odi 2021 pune live streaming when where to watch match from Maharashtra Cricket Association Stadium)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.