AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs England 1st T20 | नरेंद्र मोदी मैदानाच्या खेळपट्टीवर विराट कोहलीचं मोठं भाष्य

टीम इंडियाला पहिल्या टी 20 सामन्यात इंग्लंडकडून 8 विकेट्सने (india vs england 1st t20i) पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात कर्णधार विराट कोहली सपशेल अपयशी ठरला. विराटने या (virat kohli on pitch) पराभवासाठी खेळपट्टीला जबाबदार ठरवण्याचा प्रयत्न केला आहे.

India vs England 1st T20 | नरेंद्र मोदी मैदानाच्या खेळपट्टीवर विराट कोहलीचं मोठं भाष्य
Virat kohli
| Updated on: Mar 13, 2021 | 4:15 PM
Share

अहमदाबाद : “खेळपट्टीमुळे आम्हाला नीट खेळता आलं नाही. या पीचवर आम्हाला नक्की काय करायचंय, याबाबत माहिती नव्हतं. आम्ही आमची चूक मान्य करतो, असं म्हणत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने खेळपट्टीवर पराभवाचं खापर फोडलं आहे. तसेच पुढील सामन्यात आम्ही जोरदार कमॅबॅक करु’, असा आशावादही कोहलीने व्यक्त केला. टीम इंडियाला इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे टीम इंडिया 5 सामन्यांच्या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. (india vs england 1st t20i captain virat kohli reaction on pitch)

आम्ही वाईट फलंदाजी केली – विराट

“आमची फलंदाजी फार वाईट राहिली. आम्ही काही गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. मात्र आता सत्य परिस्थिती स्वीकारावी लागेल. जर खेळपट्टी पोषक असेल तर तुम्ही पहिल्या चेंडूपासून फटकेबाजी करु शकता. खेळपट्टी जाणून घेण्यासाठी आम्ही फार वेळ दवडला नाही. मात्र श्रेयस अय्यरने तो प्रयत्न केला. मात्र त्यांनंतरही आम्ही 150 पेक्षा अधिक धावा करु शकलो नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे चढ उतार येतात. आपलं भाग्य जोरदार असतं त्या दिवशी आपण मोठी धावसंख्या उभारतो. पण नेहमीच असं होत नाही”, असंही विराटने स्पष्ट केलं.

“आगामी वर्ल्ड कपच्या दृष्टीने प्रयोग करायचेत”

आम्ही मागील काही टी 20 मालिका जिंकल्या आहेत. टी 20 वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर इंग्लंड विरुद्धच्या 5 सामन्यांच्या मालिकेत आम्ही असंख्य प्रयोग करायचे आहेत. पण आम्ही इंग्लंड विरुद्ध कोणत्याही बाबतीत हलक्यात घेण्याची चूक करणार नाहीत,असं विराटने नमूद केलं.

टीम इंडियाची पहिल्या सामन्यात निराशाजनक कामगिरी

पहिल्या टी 20 मध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंनी सपशेल निराशा केली. इंग्लंडने टॉस जिंकून भारताला फलंदाजीसाठी भाग पाडले. केएल राहुल, विराट कोहली आणि शिखर धवन या टॉपच्या 3 फलंदाजांना विशेष काही करता आले नाही. यामुळे भारताची खराब सुरुवात झाली. मात्र त्यानंतर रिषभ पंत आणि श्रेयस अय्यरने फटकेबाजी केली. अय्यरने 67 तर पंतने 21 धावांची खेळी केली. या जोरावर भारताने इंग्लंडला विजयासाठी 125 धावांचे आव्हान दिले.

हे विजयी आव्हान इंग्लंडने 2 विकेट्सच्या मोबदल्यात 15.3 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. इंग्लंडकडून जेसन रॉयने सर्वाधिक 49 धावांची खेळी केली. जोस बटलरने 28 तर जॉनी बेयरस्टोने नाबाद 26 धावा केल्या. टीम इंडियाकडून युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दुसरी टी-20 मॅच 14 मार्चला

दरम्यान उभय संघातील दुसरा टी 20 सामना 14 मार्चला खेळवण्यात येणार आहे. या मॅचचे आयोजन अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आले आहे. या मॅचला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. या सामन्यात विजय मिळवून जोरदार पुनरागमन करण्याचा मानस टीम इंडियाचा असेल. त्यामुळे भारतीय संघ दुसऱ्या सामन्यात कशी कामगिरी करते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

तर माझा टीव्ही बंद राहील, ‘हिटमॅनला’ डच्चू दिल्याने ‘सुलतान’ विराटवर भडकला

पहिल्या टी ट्वेण्टीत पराभव, भारतापेक्षा मुंबई इंडियन्स भारी, डिवचणाऱ्या इंग्लंडच्या माजी कर्णधाराला जाफरचं उत्तर

(india vs england 1st t20i captain virat kohli on pitch)

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...