India vs England 2nd Test 1st Day | हिटमॅन रोहित शर्माचा अनोखा कारनामा, ठरला पहिलाच भारतीय

संजय पाटील, Tv9 मराठी

|

Updated on: Feb 13, 2021 | 6:09 PM

रोहित शर्माने (Rohit Sharma) इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना 161 धावांची खेळी केली.

India vs England 2nd Test 1st Day | हिटमॅन रोहित शर्माचा अनोखा कारनामा, ठरला पहिलाच भारतीय
हिटमॅन रोहित शर्मा

चेन्नई | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीतील पहिल्या दिवसाचा (India vs England 2nd Test) खेळ संपला आहे. भारताने पहिल्या दिवसापर्यंत 6 विकेट्स गमावून 300 धावा केल्या. पहिल्या दिवसापर्यंत टीम इंडियाकडून हिटमॅन रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) सर्वाधिक धावा केल्या. रोहितने 161 धावांची शानदार खेळी केली. तर अजिंक्यने रोहितला चांगली साथ देत 67 धावांची अर्धशतकी खेळी केली. रोहितने आपल्या 161 धावांच्या खेळीसह एक अफलातून कामगिरी केली आहे. अशी कामगिरी करणारा रोहित पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे. (india vs england 2nd test 1st day rohit sharma become first batsman who hit 200 sixes in india)

काय आहे कामगिरी?

रोहितने आपल्या खेळीमध्ये एकूण 2 सिक्स लगावले. यामध्ये रोहितने सामन्याच्या 38 व्या ओव्हरमध्ये मोईन अलीच्या बोलिंगवर जोरदार सिक्स खेचला. यासह रोहितने सिक्सचे द्विशतक पूर्ण केलं. म्हणजेच रोहितने भारतात 200 सिक्स लगावण्याची कामगिरी केली. अशी कामगिरी करणारा पहिला आणि एकमेव भारतीय ठरला.

भारतात सर्वाधिक सिक्स मारणारे टीम इंडियाचे फलंदाज

रोहित शर्मा – 200*

महेंद्रसिह धोनी – 186

युवराज सिंह – 113

वीरेंद्र सेहवाग – 111

विराट कोहली – 110

सचिन तेंडुलकर – 107

चौथ्या विकेटसाठी महत्वाची भागीदारी

टीम इंडियाची निराशाजनक सुरुवात झाली. भारताने 86 धावांवर 3 विकेट्स गमावल्या. यामुळे टीम इंडियाची बिकट स्थिती झाली होती. पण यानंतर रोहित आणि अजिंक्य रहाणेने चौथ्या विकेटसाठी 162 धावांची जबरदस्त भागीदारी केली. या भागीदारीदरम्यान रोहितने शानदार दीडशतक पूर्ण केलं. तर रहाणेनेही आपलं अर्धशतक पूर्ण केलं. पण यानंतर हे दोन्ही सेट फलंदाज बाद झाले.

दरम्यान पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा रिषभ पंत आणि अक्षर पटेल मैदानात खेळत होते. या जोडीकडून दुसऱ्या दिवशी चांगल्या खेळीची अपेक्षा असणार आहे.

संबंधित बातम्या :

India vs England 2nd Test | ‘रनमशीन’ विराटची अपयशाची मालिका सुरुच, तब्बल इतक्यांदा शून्यावर बाद

India vs England 2nd Test, 1st Day Live | रोहित-रहाणेची संयमी भागीदारी, पहिल्या दिवसखेर टीम इंडियाच्या 300 धावा

India vs England 2nd Test | कॅप्टन कोहली आणि जो रुटला किर्तीमान करण्याची संधी, अश्विनही स्पर्धेत

(india vs england 2nd test 1st day rohit sharma become first batsman who hit 200 sixes in india)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI