इंग्लंडचा इयान बेल भारतीय खेळाडूवर फिदा, म्हणतो, ‘त्याच्याशिवाय मी भारतीय संघाची कल्पनाच करु शकत नाही!’

रिषभ भारताचं भविष्य आहे आणि तो जागतिक स्तरावरचा सर्वोत्तम खेळाडू बनण्याच्या रस्त्यावर आहे. त्याचं भविष्य उज्वल आहे, असं इयान बेल म्हणाला. Cannot Imagine indian team Without Rishabh pant Says ian bell

इंग्लंडचा इयान बेल भारतीय खेळाडूवर फिदा, म्हणतो, 'त्याच्याशिवाय मी भारतीय संघाची कल्पनाच करु शकत नाही!'
Ian bell Appriciate Rishabh pant
Follow us
| Updated on: Mar 30, 2021 | 7:12 AM

मुंबई :  भारतीय संघाचा नवोदित विकेट कीपर फलंदाज ज्याने इंग्लंडविरुद्धच्या (India Vs England) कसोटी, टी ट्वेन्टी आणि शेवटी पार पडलेल्या वनडे मालिकेत आपला क्लास दाखवला. ज्याने आपल्या बॅटिंगने आणि विकेट कीपिंगने भल्याभल्या खेळाडूंची नजर आपल्यावर रोखून धरायला लावली त्या रिषभ पंतवर (Rishabh Pant) इंग्लंडचा माजी आक्रमक आणि दिग्गज खेळाडू इयान बेलने (Ian Bell) कौतुकाचा वर्षाव केला आहे. रिषभ पंतशिवाय मी भारतीय संघाची कल्पनादेखील करु शकत नाही, असं इयान बेलने म्हटलं. (India vs England Cannot Imagine indian team Without Rishabh pant Says ian bell)

इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या वन डे मॅचसह भारताचा आंतरराष्ट्रीय हंगाम तूर्तास तरी संपला आहे. पाठीमागच्या वर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्याची पराभवाने सुरुवात झाल्यानंतर भारताने पुनरागमन करत ऑस्ट्रेलियाविरुद्ध नव्या हिंदुस्थानाची जादू दाखवली तसंच आताही इंग्लंडला तिन्ही मालिकेत पराभूत करुन भारतीय संघाची ताकद दाखवली. यामध्ये भारतीय संघाचा उभरता सितारा रिषभ पंतने आपल्या खेळाची दखल सगळ्यांनाच घ्यायला भाग पाडलीय.

काय म्हणाला इयान बेल?

“इएसपीयन क्रिक इन्फोशी बोलताना इयान बेलने रिषभचं तोंडभरुन कौतुक केलं. मी त्याच्याशिवाय भारतीय संघाची कल्पना देखील करु शकत नाही. मला असं वाटतं की रिषभ भारताचं भविष्य आहे आणि तो जागतिक स्तरावरचा सर्वोत्तम खेळाडू बनण्याच्या रस्त्यावर आहे. त्याचं भविष्य उज्वल आहे. त्याच्याजवळ अलोट प्रतिभा आहे. तो अविश्वसनीय खेळाडू आहे. तो मॅचविजेता खेळाडू आहे”, अशी एकाहून एक स्तुतीसुमने बेलने रिषभवर उधळली.

“रिषभ पंतने इंग्लंडविरुद्धच्या तिन्ही मालिकेत निर्णायक क्षणी चांगलं प्रदर्शन केलं. कसोटी, ट्वेन्टी आणि एकदिवसीय मालिकेत त्याने शानदार खेळी केली. मी त्याच्यात एक शांत चित्ताचा विकेट कीपर फलंदाज पाहिलाय. त्याने संघाला गरज असताना जोखीम पत्करणारे शॉट न खेळता संघाला आधार दिला आणि भूमिका जबाबदारीने सांभाळली.”

बेलला रिषभच्या खेळाची भुरळ

इंग्लंडच्या दौऱ्यात तर रिषभ पंतच्या खेळाने भल्याभल्यांची बोलती बंद झालीय. अंतिम 11 मध्ये त्याला स्थान द्यायचं की नाही इथपासून सुरु झालेला प्रवास मॅचच्या निर्णायक क्षणी रिषभवर भिस्त असणं, इथपर्यंतचा प्रवास हा थक्क करणारा आहे. काही महिन्यातच रिषभ पंतने स्वत:ला सिद्ध केलंय. त्याने त्याच्या विकेट कीपिंगमध्ये तर एवढी सुधारणा केलीय की तो आता अव्वल दर्जाचा विकेट कीपर वाटतो. याच सगळ्या कारणांनी इंग्लंडचा दिग्गज माजी फलंदाज इयान बेलला रिषभची भुरळ पडलीय.

हे ही वाचा :

Irfan Pathan Corona : सचिन, युसूफ पाठोपाठ इरफान पठाणही कोरोना पॉझिटिव्ह!

IND vs ENG : सॅम करनच्या जबरदस्त खेळीमागे महेंद्रसिंह धोनीचा हात?

Kyle Jamieson IPL 2021 RCB Team Player : अष्टपैलू कायले जॅमिसनच्या समावेशाने विराटसेना अधिक मजबूत

Non Stop LIVE Update
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.
मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!
मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!.
माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा भाजप...,रवींद्र धंगेकरांची मागणी काय
माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा भाजप...,रवींद्र धंगेकरांची मागणी काय.
शिवतीर्थावर मोदी-राज एकाच मंचावर, युद्धपातळीवर तयारी; कधी धडाडणार तोफ?
शिवतीर्थावर मोदी-राज एकाच मंचावर, युद्धपातळीवर तयारी; कधी धडाडणार तोफ?.
यामिनी जाधवांना त्रास दिला, त्या रडल्या त्यांनी... शिंदेंचा गौप्यस्फोट
यामिनी जाधवांना त्रास दिला, त्या रडल्या त्यांनी... शिंदेंचा गौप्यस्फोट.
मोदींना जिरेटोप अन् विरोधकांची टीका, प्रफुल्ल पटेलांचं प्रत्युत्तर काय
मोदींना जिरेटोप अन् विरोधकांची टीका, प्रफुल्ल पटेलांचं प्रत्युत्तर काय.
ठाकरे व्होट जिहादचे आका, शिवसेनाभवनात बोलावून हिरवी चादर...कुणाची टीका
ठाकरे व्होट जिहादचे आका, शिवसेनाभवनात बोलावून हिरवी चादर...कुणाची टीका.