IND vs NZ 1st ODI लाइव्ह स्कोर : न्यूझिलंड टीमचा 7 गडी राखून विजय, लॅथमची दमदार खेळी

| Updated on: Nov 27, 2022 | 8:44 AM

भारत vs न्युझीलँड 1st ODI लाइव्ह स्कोर अपडेट्स : टीम इंडियाच्या सलामी जोडीची चांगली खेळी

IND vs NZ 1st ODI लाइव्ह स्कोर : न्यूझिलंड टीमचा 7 गडी राखून विजय, लॅथमची दमदार खेळी
India vs New Zealand 1st ODI MatchImage Credit source: twitter

T20 सीरीजमधील विजयानंतर आजपासून वनडे मालिकेला सुरुवात होत आहे. टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये ऑकलंड येथे वनडे सामना सुरु आहे. भारताने  आज जबरदस्त फलंदाजी केली. धीम्या सुरुवातीनंतर टीम इंडियाचा 306 धावांपर्यंत पोहोचला. शिखर धवन 72, शुभमन गिल 50 धावांची इनिंग खेळला. श्रेयस अय्यरने 80 आणि संजू सॅमसनने 36 धावा केल्या. ऋषभ पंत आणि सूर्यकुमार यादवची बॅट चालली नाही. पंतने 15 आणि सूर्यकुमारने 4 धावा केल्या. न्यूझीलंडकडून साऊदी आणि फर्ग्युसनने प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या. न्यूझीलंडला विजयासाठी 307 धावांच लक्ष्य दिलं आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 25 Nov 2022 10:28 PM (IST)

    पाणी द्या अन्यथा कर्नाटकात जाण्याचा गावांचा इशारा

    Marathi News LIVE Update

    सीमावर्ती भागातील गावांचा पाण्यासाठी एल्गार

    जत तालुक्यातील 40 गावे पाण्यासाठी कर्नाटकात जाणार?

    राज्य सरकारला दिला आठवडाभराचा अल्टिमेटम

    पाणी द्या अन्यथा कर्नाटकात जाण्याचा गावांचा इशारा

  • 25 Nov 2022 09:03 PM (IST)

    कोरोनाला रोखण्यासाठी नाकावाटे लस विकसीत

    Marathi News LIVE Update कोरोनाला रोखण्यासाठी नाकावाटे लस विकसीत

    भारताच्या ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने दिली मंजूरी

    शुक्रवारी नझल व्हॅक्सीन iNCOVACC ला हिरवा झेंडा

    अत्यंत गरजेच्यावेळी रुग्णांना ही लस नाकावाटे देण्यात येईल

  • 25 Nov 2022 08:44 PM (IST)

    वीज कनेक्शन तोडल्यास रट्टेच देतो

    Marathi News LIVE Update

    वीज कनेक्शन तोडल्यास रट्टेच देतो

    आमदार संतोष बांगर पुन्हा वादात

    महावितरणच्या कर्मचाऱ्याला फोनवरुन धमकी

    शेतकऱ्यांनी केली होती आमदारांकडे तक्रार

  • 25 Nov 2022 08:41 PM (IST)

    अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर येरवड्यात उपचार करा

    Marathi News LIVE Update

    अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर येरवड्यात उपचार करा

    मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांचा हल्लाबोल

    मराठवाड्यातील तरुणांची माथी न भडकविण्याचा इशारा

    विकासासाठी राज्यकर्त्यांकडे पाठपुरावा सुरु-पाटील

  • 25 Nov 2022 06:55 PM (IST)

    करदात्यांना येत्या अर्थसंकल्पात मोठा दिलासा मिळण्याची शक्यता

    Marathi News LIVE Update

    करदात्यांना येत्या अर्थसंकल्पात मोठा दिलासा मिळण्याची शक्यता

    80 सी अंतर्गत करदात्यांना मिळणार मोठी सवलत

    गृहकर्जावर सध्या 1.50 लाखांची सवलत

    ही सवलत 5 लाखांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे

  • 25 Nov 2022 05:09 PM (IST)

    गुणरत्न सदावर्तेंविरोधात मराठा समाज आक्रमक

    Marathi News LIVE Update

    गुणरत्न सदावर्तेंविरोधात मराठा समाज आक्रमक

    उस्मानाबादमध्ये सदावर्तेंचा केला निषेध

    स्वतंत्र मराठवाडा राज्याच्या मागणीसाठी सदावर्ते उस्मानाबादमध्ये

    मराठा समाजातील काही नेते आपल्या पाठिशी-सदावर्ते

  • 25 Nov 2022 05:07 PM (IST)

    हिंमत असल्यास सरकार पाडून दाखवा

    Marathi News LIVE Update हिंमत असल्यास सरकार पाडून दाखवा

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विरोधकांना आवाहन

    आमचे सर्व निर्णय लोकांच्या हिताचे

    हे सरकार शेतकरी, गोरगरीब लोकांचे-शिंदे

  • 25 Nov 2022 03:03 PM (IST)

    न्यूझिलंड टीमचा 7 गडी राखून विजय

    टीम इंडियाने पहिल्या वनडेत न्यूझीलंडसमोर 307 धावांचे लक्ष्य ठेवले होते. न्यूझीलंडने हे लक्ष्य 3 गडी गमावून पूर्ण केले. टॉम लॅथमने नाबाद 145 आणि केन विल्यमसनने नाबाद 94 धावा केल्या.

  • 25 Nov 2022 02:57 PM (IST)

    न्यूझिलंड टीमचा 7 गडी राखून विजय, लॅथमची दमदार खेळी

    न्यूझिलंड टीमचा 7 गडी राखून विजय, लॅथमची दमदार खेळी

  • 25 Nov 2022 02:40 PM (IST)

    विल्यमसन आणि लॅथम ही जोडी भारतासाठी धोक्याची ठरेल

    विल्यमसन आणि लॅथम ही जोडी भारतासाठी धोक्याची ठरेल

    विल्यमसन आणि लॅथमची ही भागीदारी मोडणे भारतीय संघाला आवश्यक आहे, अन्यथा सामना हाताबाहेर जाईल.

  • 25 Nov 2022 02:39 PM (IST)

    न्यूझीलंडची धावसंख्या 200 वर पोहोचली

    न्यूझीलंडची धावसंख्या 200 वर पोहोचली वॉशिंग्टन सुंदरच्या षटकात केवळ चार धावा आल्या. टॉम लॅथमने आपल्या कर्णधारासोबत भक्कम भागीदारी रचली असून ही भागीदारी आता भारतासाठी कठीण होत आहे. पुढच्याच षटकात लॅथमनेही अर्शदीप सिंगला षटकार ठोकला. न्यूझीलंडची धावसंख्या 200 वर पोहोचली आहे.

  • 25 Nov 2022 02:37 PM (IST)

    न्यूझीलंडची धावसंख्या 200 वर पोहोचली

    वॉशिंग्टन सुंदरच्या षटकात केवळ चार धावा आल्या. टॉम लॅथमने आपल्या कर्णधारासोबत भक्कम भागीदारी रचली असून ही भागीदारी आता भारतासाठी कठीण होत आहे. पुढच्याच षटकात लॅथमनेही अर्शदीप सिंगला षटकार ठोकला. न्यूझीलंडची धावसंख्या 200 वर पोहोचली आहे.

  • 25 Nov 2022 02:15 PM (IST)

    IND vs NZ Live Score: 40 ओव्हर्सनंतर अशी आहे स्थिती

    40 ओव्हर्सनंतर न्यूझीलंडच्या 3 बाद 241 धावा झाल्या आहेत. विलयम्सन (73) आणि लॅथमची (100) जोडी भारतीय गोलंदाजांना दाद देत नाहीय. न्यूझीलंडला विजयासाठी 66 धावांची गरज.

  • 25 Nov 2022 01:53 PM (IST)

    IND vs NZ Live Score: विलयम्सन-लॅथमची जोडी जमली

    36 ओव्हर्सनंतर न्यूझीलंडच्या 3 बाद 191 धावा झाल्या आहेत. कॅप्टन केन विलयम्सन (70) आणि टॉम लॅथमची (55) जोडी जमली आहे.

  • 25 Nov 2022 01:34 PM (IST)

    32 षटकांनंतर न्यूझीलंडची धावसंख्या 3 बाद 163

    32 षटकांनंतर न्यूझीलंडची धावसंख्या - 163/3

    न्यूझीलंडने 32 षटकांत 3 गडी गमावून 163 धावा केल्या आहेत. टॉम लॅथम (36 धावा) आणि केन विल्यमसन (64 धावा) क्रीझवर आहेत.

  • 25 Nov 2022 01:27 PM (IST)

    29 षटकांनंतर न्यूझीलंडची धावसंख्या - 143/3

    29 षटकांनंतर न्यूझीलंडची धावसंख्या - 143/3

    न्यूझीलंडने 29 षटकांनंतर 3 गडी गमावून 143 धावा केल्या आहेत. टॉम लॅथम (31 धावा) आणि केन विल्यमसन (51 धावा) क्रीझवर आहेत.

  • 25 Nov 2022 01:25 PM (IST)

    विल्यमसनने 51 चेंडूत 3 चौकार आणि एका षटकारासह 45 धावा केल्या

    केन विल्यमसन क्रीजवर स्थिरावला असून तो अर्धशतकाच्या जवळ आहे. विल्यमसनने 51 चेंडूत 3 चौकार आणि एका षटकारासह 45 धावा केल्या. त्याचवेळी टॉम लॅथम 23 धावा करून नाबाद आहे. न्यूझीलंडची धावसंख्या 27.1 षटकांनंतर 3 बाद 128 अशी आहे.

  • 25 Nov 2022 01:07 PM (IST)

    23 षटकांनंतर न्यूझीलंडची धावसंख्या - 106/3

    न्यूझीलंडने 23 षटकांत तीन विकेट गमावून 106 धावा केल्या आहेत. टॉम लॅथम (14 धावा) आणि केन विल्यमसन (32 धावा) क्रीझवर आहेत.

  • 25 Nov 2022 01:06 PM (IST)

    न्यूझिलंडची तिसरी विकेट पडली

    न्यूझीलंडने 88 धावांवर तिसरी विकेट गमावली. डेव्हॉन कॉनवेनंतर उमरान मलिकने डॅरेल मिशेललाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले आहे.

  • 25 Nov 2022 01:03 PM (IST)

    न्यूझिलंडची तिसरी विकेट पडली

    न्यूझीलंडने 88 धावांवर तिसरी विकेट गमावली. डेव्हॉन कॉनवेनंतर उमरान मलिकने डॅरेल मिशेललाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले आहे.

  • 25 Nov 2022 12:58 PM (IST)

    लॅथमचा शानदार चौकार

    लॅथमचा शानदार चौकार

    युजवेंद्र चहलने 21व्या षटकात पाच धावा दिल्या. ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर स्वीप करताना लॅथमने फाइन लेगवर चौकार मारला.

  • 25 Nov 2022 12:41 PM (IST)

    न्यूझीलंडने 18 षटकांत 2 गडी गमावून 80 धावा केल्या

    18 षटकांनंतर न्यूझीलंडची धावसंख्या - 80/2

    न्यूझीलंडने 18 षटकांत 2 गडी गमावून 80 धावा केल्या आहेत. डॅरेल मिशेल (10 धावा) आणि केन विल्यमसन (22 धावा) क्रीझवर आहेत.

  • 25 Nov 2022 12:36 PM (IST)

    उमरान मलिकने कॉनवेला बाद केले

    उमरान मलिकने वनडे कारकिर्दीतील पहिली विकेट मिळवत डेव्हन कॉनवेला बाद केले. षटकाच्या पहिल्या चेंडूवर कॉनवेला मोठा फटका खेळायचा होता. पण बॅटला चेंडू लागून पंतच्या हातात झेल गेला . कॉनवे 42 चेंडूत 24 धावा करून परतला.

  • 25 Nov 2022 12:29 PM (IST)

    उमरान मलिकने वनडे कारकिर्दीतील पहिली विकेट घेतली

    भारतीय संघाला आणखी एक यश मिळाले आहे. उमरान मलिकने वनडे कारकिर्दीतील पहिली विकेट घेतली आहे. डेव्हॉन कॉनवे आऊट झाला.

  • 25 Nov 2022 12:23 PM (IST)

    14 षटकांनंतर न्यूझीलंडची धावसंख्या 57

    14 षटकांनंतर न्यूझीलंडची धावसंख्या 57/1

    न्यूझीलंडने 14 षटकांत 1 गडी गमावून 57 धावा केल्या आहेत. डेव्हॉन कॉनवे (22 धावा) आणि केन विल्यमसन (11 धावा)

  • 25 Nov 2022 12:17 PM (IST)

    न्यूझीलंडची धावसंख्या 50 च्या पुढे गेली

    वॉशिंग्टन सुंदरने बाराव्या षटकात चार धावा दिल्या. यासह न्यूझीलंडची धावसंख्या ५० च्या पुढे गेली आहे. विल्यमसन आणि कॉनवे दोघेही संथ फलंदाजी करत आहेत.

  • 25 Nov 2022 12:16 PM (IST)

    उमरानने पहिल्याच षटकात 4 धावा दिल्या

    उमरान मलिकने त्याचे षटक टाकले ज्यात त्याने चार धावा दिल्या. या षटकात त्याने 145 किमी प्रतितास पेक्षा जास्त वेगाने पाच चेंडू टाकले. ओव्हरच्या शेवटच्या चेंडूचा वेग 149 किमी प्रतितास होता.

  • 25 Nov 2022 12:14 PM (IST)

    न्यूझीलंडने 10 षटकात 42 धावा केल्या

    शार्दुल ठाकूरने दहाव्या षटकात पाच धावा दिल्या. कॉनवेने ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर एरियल शॉट खेळला, त्याने एक्स्ट्रा कव्हरवर चौकार मारला. 10 षटकांत न्यूझीलंडची धावसंख्या एका विकेटवर 42 धावा आहे.

  • 25 Nov 2022 12:04 PM (IST)

    वॉशिंग्टन सुंदरने नवव्या षटकात केवळ दोन धावा दिल्या

    वॉशिंग्टन सुंदरने नवव्या षटकात केवळ दोन धावा दिल्या. त्याने आतापर्यंत दोन षटकांत केवळ तीन धावा दिल्या आहेत.

  • 25 Nov 2022 11:55 AM (IST)

    8 शतकांनंतर न्यूझीलंडची धावसंख्या 35

    8 शतकांनंतर न्यूझीलंडची धावसंख्या एका विकेटनंतर 35 आहे. डेव्हॉन कॉनवे 11 आणि केन विल्यमसन 0 धावांवर खेळत आहेत.

  • 25 Nov 2022 11:53 AM (IST)

    फिन अॅलन २२ धावा करून बाद झाला.

    न्यूझीलंड संघाला पहिला धक्का बसला आहे. शार्दुल ठाकूरने फिन अॅलनला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. फिन अॅलन २२ धावा करून बाद झाला.

  • 25 Nov 2022 11:50 AM (IST)

    शार्दुलने घेतली पहिली विकेट, अॅलन पॅव्हेलियनमध्ये परतला

    शार्दुलने घेतली पहिली विकेट, अॅलन पॅव्हेलियनमध्ये परतला

  • 25 Nov 2022 11:41 AM (IST)

    अर्शदीपचा ओव्हर महागात पडला

    अर्शदीपचा ओव्हर महागात पडला

    अर्शदीपने तिसऱ्या षटकात 11 धावा लुटल्या. ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर ऍलनने मिडऑफवर चौकार मारला

  • 25 Nov 2022 11:27 AM (IST)

    न्यूझीलंडने फलंदाजीला सुरुवात केली, अॅलन-कॉनवे क्रीजवर

    न्यूझीलंडने फलंदाजीला सुरुवात केली, अॅलन-कॉनवे क्रीजवर

  • 25 Nov 2022 10:52 AM (IST)

    न्यूझिलंड टीममध्ये या खेळाडूंना संधी मिळाली आहे

    Playing XI New Zealand :फिन एलन, डेवोन कॉनवे, केन विलियमसन (कप्तान), टॉम लैथम (विकेटकीपर), डेरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल सेंटनर, एडम मिल्ने, मैट हेनरी, टिम साउथी, लॉकी फर्ग्यूसन

  • 25 Nov 2022 10:52 AM (IST)

    टीम इंडियामध्ये या खेळाडूंना संधी मिळाली

    Playing XI India: शिखर धवन (कप्तान), शुभमन गिल, ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, संजू सैमसन, वाशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकुर, उमरान मलिक, अर्शदीप सिंह, युजवेंद्र चहल

  • 25 Nov 2022 10:48 AM (IST)

    अय्यरची शानदार खेळी संपुष्टात...

    अय्यरची शानदार खेळी संपुष्टात आली. त्याने 76 चेंडूत चार चौकार आणि चार षटकारांसह 80 धावा केल्या.

  • 25 Nov 2022 10:46 AM (IST)

    सुंदरची तुफानी फलंदाजी

    सुंदरची तुफानी फलंदाजी

    49व्या षटकाची सुरुवात वाईड बॉलने झाली. सुंदरने आपला शानदार खेळ सुरूच ठेवला. त्याने ओव्हरच्या शेवटच्या तीन चेंडूंवर 14 धावा केल्या. चौथ्या चेंडूवर त्याने ओढले आणि खोलवर चौकार मारला. पाचव्या चेंडूवर स्कूप करताना त्याने सलग दुसरा चौकार मारला. ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर त्याने मिड-विकेटवर षटकार ठोकला.

  • 25 Nov 2022 10:18 AM (IST)

    सुंदर-अय्यरचे अर्धशतक, भारताने 306 धावा केल्या

    सुंदर-अय्यरचे अर्धशतक, भारताने 306 धावा केल्या

  • 25 Nov 2022 10:15 AM (IST)

    श्रेयस अय्यरचं अर्धशतक पुर्ण, 4 बाद 240

    भारतीय संघाची धावसंख्या 44 षटकांत 4 बाद 240 धावा झाली आहे. संजू सॅमसन 33 आणि श्रेयस अय्यर 60 धावा करत खेळत आहे. श्रेयसने आपल्या खेळीत एक चौकार आणि चार षटकार मारले आहेत. त्याचबरोबर संजू सॅमसनने चार चौकार मारले आहेत. या दोघांमध्ये आतापर्यंत 54 धावांची भागीदारी झाली आहे.

  • 25 Nov 2022 10:13 AM (IST)

    टीम इंडियाने 200 धावांचा टप्पा ओलांडला

    40.2 षटकांचा खेळ संपला. यावेळी भारताची धावसंख्या चार गड्यांच्या मोबदल्यात 212 होती. संजू सॅमसन 24 धावा करून खेळत आहे. तर श्रेयस अय्यरने आतापर्यंत 47 धावा केल्या आहेत. श्रेयसने या खेळीत तीन षटकार आणि एक चौकार लगावला आहे. त्याचबरोबर सॅमसनने तीन चौकार मारले आहेत.

  • 25 Nov 2022 10:00 AM (IST)

    संजू सॅमसनची शानदार फलंदाजी

    संजू सॅमसनची शानदार फलंदाजी

    38व्या षटकात टीम साऊदीने नऊ धावा दिल्या. पुढच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर संजू सॅमसनने थर्ड मॅनला चौकार ठोकला.

  • 25 Nov 2022 09:47 AM (IST)

    टीम इंडियाची धावसंख्या 184, श्रेयस अय्यर 32 आणि संजू सॅमसन 9 धावांवर खेळत आहे.

    37.2 षटक संपल्यानंतर भारतीय संघाची धावसंख्या चार विकेट्सवर 184 धावा आहे. श्रेयस अय्यर 32 आणि संजू सॅमसन 9 धावांवर खेळत आहे. श्रेयसने 45 चेंडूंच्या खेळीत दोन षटकार ठोकले आहेत. तर संजूने १२ चेंडूंचा सामना करताना चौकार मारला आहे.

  • 25 Nov 2022 09:43 AM (IST)

    IND vs NZ, 1st ODI: लॉकी फर्ग्युसनने पाच धावा दिल्या

    मिचेल सँटनरने 34व्या षटकात पाच धावा दिल्या. लॉकी फर्ग्युसनने 35 व्या षटकात पाच धावा दिल्या

  • 25 Nov 2022 09:38 AM (IST)

    पंतला लॉकी फर्ग्युसनने बोल्ड केले

  • 25 Nov 2022 09:36 AM (IST)

    33 षटकांनंतर भारताची धावसंख्या 160-4

    टी-20 क्रिकेटमध्ये जबरदस्त खेळ दाखवणारा सूर्यकुमार यादव या सामन्यात काही विशेष करू शकला नाही. सूर्याला लॉकी फर्ग्युसनने फिन ऍलनच्या हाती झेलबाद केले, सूर्याला तीन चेंडूत केवळ चार धावा करता आल्या. श्रेयस अय्यर आणि संजू सॅमसन क्रीजवर आहेत. 33 षटकांनंतर भारताची धावसंख्या 160-4

  • 25 Nov 2022 09:17 AM (IST)

    भारताचा डाव फसला, पंतपाठोपाठ सूर्यकुमारही बाद झाला.

    भारताचा डाव फसला, पंतपाठोपाठ सूर्यकुमारही बाद झाला.

  • 25 Nov 2022 09:12 AM (IST)

    IND vs NZ, 1st ODI: अय्यरच्या विरुद्ध न्यूझिलंडने घेतला होता रिव्यू

    टीम इंडियाचा फलंदाज अय्यर सध्या मैदानात फलंदाजी करीत आहे. त्यावेळी बॉल त्यांच्याकडून मिस झाल्यानंतर न्यूझिलंड टीमने जोरदार अपील केले होते. त्यानंतर रिव्यू घेतला.

  • 25 Nov 2022 09:07 AM (IST)

    शिखर धवन, गिल बाद, न्यूझीलंडचे दमदार पुनरागमन

    न्यूझीलंडचे दमदार पुनरागमन, गिलपाठोपाठ धवनही बाद झाला

  • 25 Nov 2022 09:05 AM (IST)

    28.4 ओव्हरमध्ये टीम इंडियाच्या 143 धावा, शिखर आणि गिल आऊट

    28.4 ओव्हरमध्ये टीम इंडियाच्या 143 धावा, शिखर आणि गिल आऊट

  • 25 Nov 2022 09:01 AM (IST)

    IND vs NZ, LIVE Update: श्रेयस अय्यर आणि पंत क्रीजवर

    IND vs NZ, LIVE Update: श्रेयस अय्यर आणि पंत क्रीजवर, दोघांकडून डाव सावरण्याचा प्रयत्न

  • 25 Nov 2022 08:56 AM (IST)

    अभिनेते विक्रम गोखले यांची तब्येत खालावली

    डॉक्टरांचे शर्तीचे प्रयत्न सुरू

    थोड्याच वेळात विक्रम गोखले यांचं मेडिकल बुलेटिन येणार

    दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाची माहिती

  • 25 Nov 2022 08:53 AM (IST)

    IND vs NZ, LIVE Update: श्रेयस अय्यर आणि पंत क्रीजवर

    फर्ग्युसननंतर टीम साऊदीने शिखर धवनला बाद केले. धवनने पॉइंटवर खेळ केला पण फिन ऍलनने अप्रतिम झेल घेतला. धवन 77 चेंडूत 72 धावा करून बाद झाला. भारताने सलग दोन षटकात दोन विकेट गमावल्या आहेत

  • 25 Nov 2022 08:42 AM (IST)

    शुभमन गिलचं 64 चेंडूत अर्धशतक

    टीम साऊदीने 23व्या षटकात 11 धावा लुटल्या. षटकाच्या चौथ्या चेंडूवर गिलने एकेरी घेत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने 64 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या. त्याचवेळी, ओव्हरच्या शेवटच्या दोन चेंडूंवर धवनने लागोपाठ दोन चौकार मारले, त्यामुळे आता टीम इंडियाच्या धावसंख्येमध्ये धावांची भर पडत आहे.

  • 25 Nov 2022 08:41 AM (IST)

    अर्धशतक झळकावल्यानंतर गिल आऊट, शिखर धवनची तुफान फलंदाजी

    अर्धशतक झळकावल्यानंतर गिल आऊट, शिखर धवनची तुफान फलंदाजी

  • 25 Nov 2022 08:27 AM (IST)

    शिखर धवनचं अर्धशतक...

    शिखर धवनचं पहिल्या एकदिवसीय मॅचमध्ये अर्धशतक, सलामीच्या जोडीची चांगली फलंदाजी

  • 25 Nov 2022 08:24 AM (IST)

    धवनकडून धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न

    ड्रिंक्स ब्रेक झाल्यानंतर धवनने गती बदलण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. धवनने 19व्या षटकाची सुरुवात थर्ड मॅनवर चौकार मारून केली. आणि चौथ्या चेंडूवर त्याने डीप बॅकवर्ड पॉइंटवर चौकार मारला. या षटकात अॅडम मिलनेने 9 धावा दिल्या

  • 25 Nov 2022 08:18 AM (IST)

    शिखर धवनच्या 40 धावा पुर्ण...

    या चौकारासह शिखर धवनने वैयक्तिक स्कोअर 40 पर्यंत पोहोचवला आहे, त्याच्यासोबत शुबमन गिल मैदानावर उपस्थित आहे, ज्याने आतापर्यंत 53 चेंडूत 40 धावा केल्या आहेत.

  • 25 Nov 2022 08:16 AM (IST)

    न्यूझिलंडच्या टीमने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला

  • 25 Nov 2022 08:14 AM (IST)

    शिखर धवनची चांगली फलंदाजी

    न्यूझिलंडच्या गोलंदाजांना अद्याप एकही विकेट घेता आलेली नाही. टीम इंडियाचे दोन्ही फलंदाज चांगली फलंदाजी करीत आहेत

Published On - Nov 25,2022 8:10 AM

Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.