AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ : न्यूझीलंडच फायनलमध्ये पोहोचणं टीम इंडियासाठी वाईट बातमी, असं का? त्यासाठी एकदा हे आकडे बघा

IND vs NZ : न्यूझीलंडची टीम चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 फायनलमध्ये पोहोचणारा दुसरा संघ ठरला आहे. लाहोरमध्ये झालेल्या सेमीफायनल मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या टीमने न्यूझीलंडसमोर शरणागती पत्करली. न्यूझीलंडने विजयासाठी दिलेल्या 363 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला 50 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 312 धावाच करता आल्या.

IND vs NZ : न्यूझीलंडच फायनलमध्ये पोहोचणं टीम इंडियासाठी वाईट बातमी, असं का? त्यासाठी एकदा हे आकडे बघा
Virat Kohli Image Credit source: PTI
| Updated on: Mar 06, 2025 | 8:10 AM
Share

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत आणि न्यूझीलंडची टीम आमने-सामने असणार आहे. पहिल्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाने शानदार विजय मिळवला. दुसऱ्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला धूळ चारली. न्यूझीलंडचा विजय हा टीम इंडियासाठी वाईट बातमी आहे. कारण यामागचा इतिहास नक्कीच भारतीय फॅन्सची चिंता वाढवू शकतो. चॅमिपयन्स ट्रॉफी 2025 च्या साखळी फेरीत भारताने न्यूझीलंडवर मोठा विजय मिळवला. पण फायनलमध्ये न्यूझीलंडने नेहमीच टीम इंडियाला त्रास दिला आहे. न्यूझीलंडच फायनलमध्ये पोहोचण टीम इंडियासाठी वाईट बातमी का आहे? ते जाणून घ्या.

टीम इंडिया एक मजबूत टीम आहे, या बद्दल कुठलीही शंका नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सलग चार मॅच जिंकून त्यांनी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. पण न्यूझीलंडला कमी समजणं चुकीच ठरेल. खासकरुन न्यूझीलंडचा ICC टुर्नामेंटसच्या फायनलमध्ये भारताविरुद्ध 100 टक्के विजयाचा रेकॉर्ड आहे.

आयसीसी टुर्नामेंटमध्ये कोण-कोणावर भारी

15 ऑक्टोंबर 2000 रोजी पहिल्यांदा आयसीसीच्या फायनलमध्ये भारत-न्यूझीलंडच्या टीम आमने-सामने होत्या. त्यावेळी न्यूझीलंडने टीम इंडियाचा चार विकेटने पराभव केला होता. या मॅचमध्ये भारताने प्रथम फलंदाजी करताना 264 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात किवी टीमने 2 चेंडू राखून विजय मिळवलेला. त्यानंतर आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये 2021 साली दोन्ही टीम्स आमने-सामने आल्या. त्यावेळी पुन्हा एकदा न्यूझीलंडच्या टीमने 8 विकेटने सामना जिंकला. आयसीसी वनडे टुर्नामेंटच्या 2 सेमीफायनलमध्ये भारताने न्यूझीलंडला पराभूत केलेलं आहे.

टीम इंडियाचा रेकॉर्ड काय?

आयसीसीच्या वनडे टुर्नामेंटमध्ये भारत-न्यूझीलंड दोन्ही टीम्समध्ये नेहमीत रंगतदार सामने झाले आहेत. आयसीसी वनडे टुर्नामेंटसमध्ये भारताने न्यूझीलंडला 8 मॅचेसमध्ये हरवलं आहे. 7 सामन्यात न्यूझीलंडला विजय मिळाला आहे. चांगली बाब ही आहे की, मागच्या तीन आयसीसी वनडे टुर्नामेंट्समध्ये भारताने न्यूझीलंड विरुद्ध विजय मिळवला आहे. याच टुर्नामेंटच्या ग्रुप स्टेजमध्ये भारताने न्यूझीलंडला 44 धावांनी हरवलं. भारताने प्रथम फलंदाजी केली. निर्धारित 50 ओव्हर्समध्ये 249 धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडची टीम 205 रन्सवर ऑलआऊट झाली. वरुण चक्रवर्तीने 42 धावा देऊन पाच विकेट काढल्या.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.