Ind women vs SA women 3rd Odi | तिसरा एकदिवसीय सामना शुक्रवारी, टीम इंडियाला मालिकेत आघाडी घेण्याची संधी

5 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे तिसरा सामना जिंकून भारताला (india women vs south africa women ) मालिकेत आघाडी घेण्याची संधी आहे.

Ind women vs SA women 3rd Odi | तिसरा एकदिवसीय सामना शुक्रवारी, टीम इंडियाला मालिकेत आघाडी घेण्याची संधी
5 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे तिसरा सामना जिंकून भारताला (india vs south Africa) मालिकेत आघाडी घेण्याची संधी आहे.

लखनऊ : वुमन्स टीम इंडिया विरुद्ध साऊथ आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना शुक्रवारी 12 मार्चला खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. या मॅचचे आयोजन लखनऊमधील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमध्ये करण्यात आले आहे. 5 सामन्यांच्या मालिकेत उभय संघांनी प्रत्येकी 1-1 सामना जिंकला आहे. यामुळे मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. दरम्यान तिसरा सामना जिंकून भारताला मालिकेत आघाडी घेण्याची संधी आहे. (india women vs south africa women 3rd odi match at Lucknow on 12 march 2021)

भारताची वनडे मालिकेची पराभवाने सुरुवात झाली होती. पहिल्या सामन्यात भारताला 8 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र दुसरा सामना जिंकत भारताने जोरदार पुनरागमन केलं होतं. दुसऱ्या सामन्यात भारताने आफ्रिकेवर 9 विकेट्सने शानदार विजय मिळवला होता. त्यामुळे वुमन्स टीम इंडियाचा विश्वास दुणावलेला आहे.

दुसऱ्या सामन्यात शानदार कमबॅक

भारताने दुसऱ्या सामन्यात आफ्रिकेला 157 धावांवर गुंडाळले. यामुळे टीम इंडियाला विजयासाठी 158 धावांचे माफक आव्हान मिळाले. झुलन गोस्वामीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या होत्या. तर फिरकी गोलंदाज राजेश्वरी गायकवाडने 3 तर मानसी जोशीने 2 विकेट्स मिळवल्या होत्या.

यशस्वी विजयी पाठलाग

विजयी आव्हानाचं पाठलाग करायला आलेल्या भारताची सावध सुरुवात राहिली. स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रीग्स ही सलामी जोडी मैदानात आली. या दोघांनी 22 धावांची भागीदारी केली. जेमिमा बाद झाल्यानंतर पूनम राऊत मैदानात आली. स्मृती आणि पूनम भारताचा डाव सावरला. त्यासह शानदार फलंदाजी केली. या दोघांनी भारताच्या विजयाचा पाया रचला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 138 धावांची नाबाद भागीदारी केली. या दरम्यान या दोघींनी वैयक्तिक अर्धशतकं झळकावलं. स्मृतीने 64 चेंडूत नाबाद 80 धावांची खेळी केली. तर पूनमने 89 चेंडूत नाबाद 62 धावा केल्या. या दोघांच्या खेळीच्या जोरावर भारताने सहज विजय साकारला. टीम इंडियाचा 28.4 ओव्हरमध्ये 9 विकेट्सने विजय झाला.

स्मृती जोरदार फॉर्मात

पाहुण्या आफ्रिकेसमोर टीम इंडियाच्या फलंदाजांचं आव्हान असणार आहे. जेमिमा, स्मृति आणि पूनम या जबरदस्त फॉर्मात आहे. स्मृतीने दुसऱ्या वनडेत 10 चौकार आणि 3 षटकार खेचले होते. तर पूनमने 8 फोर ठोकले होते. त्यामुळे या फलंदाजांचे आव्हान आफ्रिकेसमोर असणार आहे. मात्र आफ्रिकेला गृहीत धरुन चालणार नाही. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात टीम इंडिया आघाडी घेणार की आफ्रिका कमबॅक करणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

वनडे मालिकेसाठी भारतीय महिला संघ

मिताली राज (कॅप्टन), हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज, पूनम राऊत, प्रिया पुनिया, यास्तिका भाटिया, दयालन हेमलता, दीप्ती शर्मा, सुष्मा वर्मा (विकेटकीपर), श्वेता वर्मा, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, झुलन गोस्वामी, मानसी जोशी, पूनम यादव, सी. प्रत्युषा आणि मोनिका पटेल.

साउथ आफ्रिका टीम

सुने लूस (कर्णधार), अयाबोंगा खाका, शबनम इस्माइल, लाउरा वोलवार्डट, त्रिशा चेट्टी, सिनालो जाफता, तस्मीन ब्रिट्ज, मरिजाने काप, नोंदूमिसो शंगासे, लिजेले ली, अनेके बोश, फाये तुनिक्लीफ, नोनकुलुलेको मलाबा, मिगनोन डू प्रीज, नादिने डी क्र्लेक, लारा गुडआल आणि तुमी सेखुखुने.

संबंधित बातम्या :

South Africa Tour India | टीम इंडिया विरुद्धच्या वनडे आणि टी 20 मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाची घोषणा

(india women vs south africa women 3rd odi match at Lucknow on 12 march 2021)

Published On - 6:06 pm, Thu, 11 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI