AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2024 : सेमीफायनलमध्ये पावसाचा व्यत्यय ? भारतीय संघाचं काय होणार ? रिझर्व्ह-डेचा नियम काय ?

India Final Scenario in T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये भारतीय संघाने चमकदार कामगिरी केली आहे. त्याने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही आणि अपराजित राहून उपांत्य फेरीतही प्रवेश केला आहे. आता सेमीफायनलमध्ये 27 जूनला भारतीय संघाचा इंग्लंडशी होणार आहे. मात्र या सामन्यावर पावसाचे सावट आहे.

T20 World Cup 2024 : सेमीफायनलमध्ये पावसाचा व्यत्यय ? भारतीय संघाचं काय होणार ? रिझर्व्ह-डेचा नियम काय ?
| Updated on: Jun 26, 2024 | 12:21 PM
Share

कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने T20 वर्ल्ड कपमध्ये अक्षरश: खळबळ माजवली आहे. या स्पर्धेत संघाने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. भारतीय संघाने ग्रुप स्टेज आणि नंतर सुपर-8 मध्ये आपले सर्व सामने जिंकून सेमीफायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. भारतीय संघासाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे सुपर-8 च्या गट-1 मध्ये अव्वल स्थानावर राहून या टीमने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे आता सेमीफायनलमध्ये 27 जून रोजी भारतीय संघाचा इंग्लंडशी होणार आहे. हा सामना गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडियमवर खेळवला जाणार असून तो पाहण्यासाठी लाखो प्रेक्षक उत्सुक आहेत.

सेमीफायनलमध्ये रिझर्व्ह-डे असेल का?

पण भारत वि. इंग्लंड सामना पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या चाहत्यांची काळजी वाढवणारा एक मुद्दा आहे, तो म्हणजे पाऊस. या सामन्यावर पावसाचे सावट आहे. जर त्या दिवशी पाऊस पडला आणि उपांत्य फेरीचा सामना रद्द झाला तर ? सेमीफायनलमधील या सामन्यासाठी रिझर्व्ह-डे ठेवण्यात आला आहे का ? सामना रद्द झाल्यास भारतीय संघ स्पर्धेतून बाहेर पडेल का ? असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. त्याबद्दलच जाणून घेऊया…

या वर्ल्डकपमध्ये एक सस्पेन्स आहे. तो म्हणजे, दुसऱ्या सेमीफायनलसाठी आयसीसीने कोणताही रिझर्व्ह डे (राखीव दिवस)ठेवलेला नाही. पण पहिल्या सेमीफायनलसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. दुसऱ्या सेमीफायनलमध्ये पाऊस पडल्यास रिझर्व्ह डे ऐवजी त्या सामन्यासाठी 4 तास 10 मिनिटांचा अतिरिक्त वेळ ठेवण्यात आला आहे, जेणेकरून सामना त्याच दिवशी खेळवला जाईल.

मॅच रद्द झाल्यास पुढे काय ?

27 जून रोजी सेमीफायनलच्या दिवशी गयानामध्ये पावसाची बरीच शक्यता आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघाची सेमीफायनल मॅच पावसामुळे वाहून जाऊ शकते. अशा परिस्थितीत, प्रथम 4 तास 10 मिनिटांच्या अतिरिक्त वेळेत सामना पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. जर असे झाले नाही तर ग्रुप स्टेजमध्ये अव्वल असलेल्या संघाला फायदा होईल आणि त्या संघाला थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळेल. म्हणजे भारतालाच फायदा होईल. भारतीय संघाने सुपर-8 च्या गट-1 मध्ये अव्वल स्थानी राहून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. अशा परिस्थितीत सामना रद्द झाल्यास टीम इंडियाचा अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित होईल. तर ग्रुप-2 मध्ये दुसऱ्या स्थानावर असलेला इंग्लंडचा संघ बाहेर पडेल.

टी20 वर्ल्ड कप मध्ये भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायसवाल, व‍िराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुम्राह, हार्द‍िक पंड्या, मोहम्मद सिराज

Follow Us
धान्य, फळं अन्… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने....
Pune Ganpati Visarjan : धान्य, फळं अन् उसाची शेती… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने वेधलं पुणेकरांचं लक्ष
ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
Lalbaugcha Raja : बाप्पाला निरोप देण्यासाठी कोळी बांधवांचा जल्लोष! पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ..
Mumbaicha Raja Visarjan : मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ व्हायरल
ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत...
Ganpati Visarjan 2026 : ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत मुंबईकरांची मानवंदना
ढोल-ताशांचा निनाद अन्... पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं ड्रोन दृश्य
Pune Ganpati Visarjan : ढोल-ताशांचा निनाद, गुलालाची उधळण अन्... पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं ड्रोन दृश्य पाहून डोळेच दिपतील
लालबागच्या राजाची मंडपातील शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू
Lalbaugcha Raja Aarti : लालबागच्या राजाची मंडपातील शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! जयघोषाने दुमदुमली मुंबई...
Ganpati Visarjan 2026 : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! जयघोषाने दुमदुमली मुंबई; भाविकांचा निरोपाचा भावूक क्षण
शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू; चिंचपोकळीच्या चिंतामणीला भाविकांचा...
Chintamani Ganpati : शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू; चिंचपोकळीच्या चिंतामणीला भाविकांचा भावूक निरोप
गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी चोख सुरक्षा आणि सुविधांची व्यवस्था
Video : मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी चोख सुरक्षा आणि सुविधांची व्यवस्था
Video : दगडूशेठ गणपती विसर्जन, पारंपरिक चेंडा वादनाने उत्सव खास
Video : दगडूशेठ गणपती विसर्जन, पारंपरिक चेंडा वादनाने उत्सव खास