IPL 2020 | चेन्नईला मोठा धक्का, 'हा' अष्टपैलू खेळाडू दुखापतीमुळे काही सामन्यांना मुकणार

चेन्नई पॉइंट्सटेबलमध्ये 6 गुणांसह 6 व्या क्रमांकावर आहे.

IPL 2020 | चेन्नईला मोठा धक्का, 'हा' अष्टपैलू खेळाडू दुखापतीमुळे काही सामन्यांना मुकणार

शारजा : आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमात चेन्नई सुपर किंग्जसने (Chennai Super Kings) आतापर्यंत निराशाजनक कामगिरी केली आहे. अशातच चेन्नई संकटात असताना स्टार खेळाडू ड्वेन ब्राव्होला काही सामन्यांना मुकावे लागणार आहे. याबाबतची माहिती चेन्नईचा हेड कोच स्टीफन फ्लेमिंग यांनी दिली आहे. त्यामुळे आधीच संकटात असलेल्या चेन्नईसाठी ही वाईट बातमी आहे. IPL 2020 Chennai Super Kings’ Dwayne Bravo Will Miss The Next Few Matches Due To Injury

फ्लेमिंग काय म्हणाला?

“ब्राव्होच्या मांडीला सीपीएल (CPL) स्पर्धेदरम्यान दुखापत झाली होती. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात ब्राव्होला या दुखापतीचा त्रास जास्त तीव्रतेने जाणवला. ही दुखापत गंभीर स्वरुपाची आहे. त्यामुळे ब्राव्होला आणखी त्रास नको म्हणून त्याला पुढील काही सामन्यांना मुकावे लागू शकतं. ब्राव्होला किमान 10-15 दिवस विश्रांती करावी लागणार आहे”, अशी माहिती कोच स्टीफन फ्लेमिंगने दिली. फ्लेमिंग दिल्लीविरुद्ध पराभव झाल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलत होता. “ब्राव्होची वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे. यानंतर येणाऱ्या रिपोर्टच्या तीव्रतेनुसार ब्राव्हो खेळणार की नाही, हे ठरवंल जाईल”, असंही फ्लेमिंग म्हणाला.

चेन्नई विरुद्ध दिल्ली यांच्यात शनिवारी 17 ऑक्टोबरला सामना खेळण्यात आला. या सामन्यात चेन्नईने दिल्लीला विजयासाठी 180 धावांचे आव्हान दिले होते. दिल्लीला विजयासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 17 धावांची आवश्यकता होती. धोनीने शेवटची ओव्हर फिरकीपटू रवींद्र जडेजाला टाकायला दिली. जडेजाला शेवटची ओव्हर टाकायला दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. तसेच अनेकांनी आश्चर्यही व्यक्त केलं. जडेजाच्या या ओव्हरमध्ये दिल्लीच्या अक्षर पटेलने 3 सिक्स लगावत दिल्लीला विजय मिळवून दिला.

धोनीचं स्पष्टीकरण

महेंद्रसिंह धोनीने दिल्लीविरुद्धची शेवटची ओव्हर रवींद्र जडेजाला टाकायला दिली. याबाबतचे स्पष्टीकरण धोनीने सामन्यानंतर दिले. “ब्राव्होला दुखापत झाल्याने माझ्यासमोर जडेजाशिवाय कोणताही पर्याय नव्हता. त्यामुळे नाईलाज म्हणून जडेजाला शेवटची ओव्हर टाकायला दिली”, असं धोनी म्हणाला.

धवनच्या खेळीचं कौतुक

शिखर धवनने चेन्नईविरुद्धच्या शनिवारच्या सामन्यात नाबाद शतकी खेळी केली. या खेळीचं चेन्नईचा हेड कोच स्टीफन फ्लेमिंगने कौतुक केलं. “धवनने शानदार खेळी केली करत दिल्लीला विजय मिळवून दिला”, अशा शब्दात गब्बर धवनचे कौतुक केलं. यासह चेन्नईने केलेल्या वाईट क्षेत्ररक्षणाबद्दल ही फ्लेमिंगने खंत व्यक्त केली. “आम्हाला धवनला बाद करण्याची संधी होती. मात्र आमच्या खेळाडूंनी या संधीचा लाभ घेतला नाही. धवनला 3 वेळा जीवनदान दिलं. त्यामुळे आमचा पराभव झाला”, अशी खंत फ्लेमिंगने व्यक्त केली.

संबंधित बातम्या :

IPL 2020, MI vs KXIP Live : पंजाबसमोर तगड्या मुंबईचे कडवे आव्हान

IPL 2020 Chennai Super Kings’ Dwayne Bravo Will Miss The Next Few Matches Due To Injury

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *