IPL 2020 Final, MI vs DC : कमी टार्गेट, पॉवरप्लेमध्ये बहारदार सुरुवात ते अनुभवी खेळाडूंची फौज, मुंबईच्या विजयाची पाच कारणे

दिल्ली कॅपिटल्सने दिलेल्या 157 धावांचं आव्हान मुंबईने 5 गडी राखत पूर्ण केलं (IPL 2020 Final five reason of Mubai Indians win).

IPL 2020 Final, MI vs DC : कमी टार्गेट, पॉवरप्लेमध्ये बहारदार सुरुवात ते अनुभवी खेळाडूंची फौज, मुंबईच्या विजयाची पाच कारणे
Follow us
| Updated on: Nov 10, 2020 | 11:15 PM

दुबई : मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात मंगळवारी (10 नोव्हेंबर) आयपीएलच्या तेराव्या मोसमातील अंतिम आणि महत्त्वाचा सामना खेळवण्यात आला. या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने दिलेल्या 157 धावांचं आव्हान मुंबईने 5 गडी राखत सहज पूर्ण केलं. दिल्ली आणि मुंबई या दोन्ही संघांनी या मोसमात चमकदार कामगिरी केली. त्यांची या मोसमातील कामगिरी पाहता अंतिम सामना आणखी रोचक झाला असता. पण, दिल्लीच्या फलंदाजांना रोखण्यात मुंबईच्या गोलंदाजांना चांगलं यश आलं. त्यामुळे मुंबईला सामना जिंकणं सोपं झालं (IPL 2020 Final five reason of Mubai Indians win).

मुंबईच्या विजयाची पाच प्रमुख कारणं

1. कमी टार्गेट

मुंबईच्या विजयामागील सर्वात पहिलं कारण म्हणजे दिल्लीच्या फलंदाजांना रोखण्यात मुंबईच्या गोलंदाजांना यश आलं. दिल्लीची खराब सुरुवात झाली. दिल्लीला पहिल्याच चेंडूवर पहिला झटका लागला. मार्कस स्टोयनिस शून्यावर बाद झाला. यानंतर अजिंक्य रहाणेही 2 धावांवर बाद झाला. दमदार कामगिरी करत असलेल्या शिखर धवनने आज निराशा केली. जंयत यादवने धवनला 15 धावांवर बाद केले. त्यामुळे दिल्लीची 22-3 अशी स्थिती झाली.

यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत या जोडीने दिल्लीचा डाव सावरला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 96 धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. पंत-अय्यर जोडी सेट झाली. मात्र ही जोडी तोडायला नॅथन कुल्टर नाईलला यश आले. नॅथनने पंतला हार्दिक पांड्याच्या हाती बाद केलं. पंतने 38 चेंडूत 4 फोर आणि 2 सिक्सह 56 धावांची तडाखेदार खेळी केली. अखेर 20 षटकात दिल्लीने 7 बाद 156 धावा केल्या (IPL 2020 Final five reason of Mubai Indians win)..

2. पॉवरप्लेमध्ये बहारदार सुरुवात

मुंबई विजयी होण्यामागील दुसरं प्रमुख कारण म्हणजे पॉवरप्लेमध्ये बहारदार सुरुवात केली. दिल्लीने पहिल्या पाच षटकातच 50 धावा पार केल्या होत्या. यामध्ये कर्णधार रोहित शर्माची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली. रोहितने 51 चेंडूत 68 धावा केल्या. मुंबईची सुरुवात चांगली झाल्यामुळे अंतिम षटकांमध्ये मुंबईवर फारसा दबाव राहिला नाही.

3 पहिल्या फळीतील फलंदाजांनी केलेली चमकदार कामगिरी

मुबईची सुरुवात खूप जबरदस्त झाली. पहिल्या फळीतील फलंदाज रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक, सुर्यकुमार यादव, इशान किशन यांनी चांगली खेळी केली. सुर्यकुमार यादव रोहितच्या चुकीमुळे धावबाद झाला, नाहीतर तो आजही त्याचा चांगला करिश्मा दाखवू शकला असता.

4. दिल्लीचे गोलंदाज निष्प्रभ

मुंबईच्या गोलंदाजांनी जसं दिल्लीच्या फलंदाजांवर दबाव निर्माण केला, तसा दबाव निर्माण करण्यात दिल्लीचे गोलंदाज कमी पडले. दिल्लीच्या गोलंदाजांनी अंतिम षटकांमध्ये विकेट्स घेतल्या, पण तोपर्यंत उशिर झाला होता.

5. अनुभवी खेळाडूंचा भरणा तसेच मोठ्या मॅचमध्ये खेळण्याचा अनुभव

मुंबईकडे चांगले अनुभवी खेळाडू आहेत. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळण्याचा अनुभव आहे. त्याचबरोबर इशान किशन, सुर्यकुमार यादव, किरण पोलार्ड, हार्दिक पांड्या सारख्या दमदार खेळाडूंची फौज मुंबईच्या संघात होती.

संबंधित बातमी : मुंबईचा दिल्लीवर 5 विकेट्सने ‘इशान’दार विजय, पाचव्यांदा पटकावलं आयपीएलंच विजेतेपद

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.