IPL 2020 Final, MI vs DC | आयपीएल सर्वात कठीण स्पर्धा, अंतिम सामन्यात खेळणं अभिमानास्पद : कर्णधार श्रेयस अय्यर

मुंबईने अंतिम सामन्यात दिल्लीवर 5 विकेट्सने शानदार विजय मिळवला.

IPL 2020 Final, MI vs DC | आयपीएल सर्वात कठीण स्पर्धा, अंतिम सामन्यात खेळणं अभिमानास्पद : कर्णधार श्रेयस अय्यर
Follow us
| Updated on: Nov 11, 2020 | 5:00 PM

दुबई : आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमातील अंतिम सामन्यात (IPL 2020 FINAL) मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) दिल्ली कॅपिटल्सवर (Delhi Capitals) 5 विकेट्सने शानदार विजय मिळवला. या विजयासह मुंबईने आयपीएलचं पाचव्यांदा विजेतेपद पटकावलं. तर दिल्लीचं पहिल्यांदा जेतेपद पटकावण्याचं स्वप्न अधुरं राहिलं. “मला माझ्या खेळाडूंचा अभिमान आहे. अंतिम सामन्यात खेळणं ही गौरवास्पद बाब आहे”, अशी प्रतिक्रिया दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने (DC Captain Shreyas Iyer) पराभवानंतर दिली. ipl 2020 final mi vs dc Playing in IPL final is a great achievement says delhi capitals captain shreyas iyer

श्रेयस काय म्हणाला?

“आम्ही अंतिम सामन्यात अपयशी ठरलो. मात्र आम्ही पुढच्या वेळेस चांगली कामिगरी करुन विजेतेपद पटकावण्याचे प्रयत्न करु, अशी आशा श्रेयसने यावेळेस व्यक्त केली. पराभवानंतर उपविजेत्या ठरलेल्या दिल्लीला 12 कोटी 50 लाखांचा धनादेश सूपूर्त करण्यात आला. यानंतर श्रेयसने ही प्रतिक्रिया दिली. “आयपीएल स्पर्धा अनेक कठीण स्पर्धांपैकी एक आहे. या स्पर्धेत खेळणं हे सौभाग्यपूर्ण आहे. आमचा या मोसमातील इथवरचा प्रवास शानदार राहिला. संघातील सर्व खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. अंतिम सामन्यात पोहचणं ही मोठी उपलब्धी आहे. विजेतेपद पटकावणं त्यापेक्षाही मोठी उपलब्धी आहे”, असं श्रेयस म्हणाला.

समर्थकांचे आभार

श्रेयसने या वेळेस बोलताना दिल्लीच्या समर्थकांचे आभार मानले. “दिल्लीचा प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगचं श्रेयसने कौतुक केलं. मी आयपीएलमध्ये खूप जणांच्या मार्गदर्शनाखाली खेळलोय. त्या सर्वांपेक्षा रिकी सर्वश्रेष्ठ आहे. याबाबत मी अनेकदा म्हटलंय. तो आमच्यासोबत आहे, ही आमची जमेची बाजू आहे. तो आमच्या सोबत असल्याने आमच्यातील विश्वास दुणावतो. मी त्याचा फार सन्मान करतो. तो माझ्यासाठी आदरणीय आहे. खेळाडूंना तो ज्या प्रकारे प्रोत्साहित करतो, हे फार भन्नाट आहे”, अशा शब्दात श्रेयसने आपल्या प्रशिक्षकाचं कौतुक करत आभारही मानले.

मुंबई सर्वोत्कृष्ट टीम

रिकी पॉन्टिंगने मुंबईचं कौतुक केलं. “मुंबई सर्वोत्कृष्ट टीम आहे. या मोसमात मुंबईने आम्हाला साखळी फेरीतील 2 ,क्वालिफायर 1 आणि अंतिम सामना अशा एकूण 4 सामन्यात पराभूत केलं. आम्ही ज्या प्रकारे खेळ केला, त्याबाबत मला गर्व आहे. आमच्याकडे चांगले खेळाडू आहेत”, असंही पॉन्टिंग म्हणाला.

संबंधित बातम्या :

IPL 2021 | आयपीएलच्या नव्या मोसमात नवी टीम दिसण्याची शक्यता, बीसीसीआयची जोरदार तयारी

IPL 2021 | आयपीएल संपण्यापूर्वीच नव्या मोसमाचं नियोजन, 4 महिन्यांनी पुन्हा चौकार-षटकार?

ipl 2020 final mi vs dc Playing in IPL final is a great achievement says delhi capitals captain shreyas iyer

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.