AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2020, RR vs MI : राजस्थानच्या बेन स्टोक्स-संजू सॅमसनचा मुंबईवर ‘हल्ला बोल’, 8 विकेट्सने मात

नाबाद 107 धावा करणारा बेन स्टोक्स ठरला 'मॅन ऑफ द मॅच'.

IPL 2020, RR vs MI : राजस्थानच्या बेन स्टोक्स-संजू सॅमसनचा मुंबईवर 'हल्ला बोल', 8 विकेट्सने मात
| Updated on: Oct 25, 2020 | 11:33 PM
Share

अबुधाबी : राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) बेन स्टोक्स-संजू सॅमसन (Ben Stokes-Sanju Samson) या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी केलेल्या नाबाद 152 धावांच्या भागीदारीच्या जोरावर मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) 8 विकेट्सने मात केली आहे. मुंबईने राजस्थानला विजयासाठी 196 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान राजस्थानने 18.2 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून पूर्ण केले. राजस्थानकडून बेन स्टोक्सने नाबाद 107 धावा केल्या. तर संजू सॅमसनने 54 धावा करत स्टोक्सला चांगली साथ दिली. मुंबईकडून जेम्स पॅटिन्सनने 2 विकेट्स घेतल्या.

विजयी आव्हानाचे पाठलाग करायला आलेल्या राजस्थानची निराशाजनक सुरुवात राहिली. रॉबिन उथप्पाच्या रुपात राजस्थानला पहिला धक्का लागला. उथप्पा 13 धावांवर बाद झाला. यानंतर कर्णधार स्टीव्ह स्मिथ मैदानात आला. स्टीव्हने काही वेळ मैदानात घालवला. मात्र स्टीव्हलाही जेम्स पॅटिन्सनने 11 रन्सवर आऊट केले. त्यामुळे राजस्थानची 4.4 ओव्हरमध्ये 44-2 अशी परिस्थिती झाली.

त्यानंतर मैदानात आलेल्या संजू सॅमसनच्या सोबतीने सलामीवीर बेन स्टोक्सने मुंबईच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. तर दुसऱ्या बाजूने संजू सॅमसननेही स्टोक्सला चांगली साथ दिली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी नाबाद 152 धावांची नाबाद भागीदारी केली. या भागीदारीदरम्यान संजू सॅमसनने आपले अर्धशतक पूर्ण केले. तसेच स्टोक्सनेही सिक्स मारत शतक पूर्ण केले. स्टोक्सने 59 चेंडूत दमदार शतक पूर्ण केलं. स्टोक्सने एकूण 60 चेंडूत नाबाद 107 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 3 सिक्स आणि 14 फोर लगावले. तर संजू सॅमसननेही 54 धावांवर नाबाद राहिला. त्याने या खेळीत 3 सिक्स आणि 4 फोर फटकावले. मुंबईकडून जेम्स पॅटिन्सनने 2 विकेट्स घेतल्या. पॅटिन्सनचा अपवाद वगळता मुंबईच्या एकाही गोलंदाजाला विकेट घेण्यात यश आले नाही.

त्याआधी मुंबईने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. हार्दिक पांड्याच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने 5 विकेट्स गमावून 20 ओव्हरमध्ये 195 धावा केल्या. मुंबईकडून हार्दिक पांड्याने सर्वाधिक नाबाद 60 धावांची खेळी केली. तर सूर्यकुमार यादवने 40 रन्स केल्या. राजस्थानकडून जोफ्रा आर्चर आणि श्रेयस गोपाळने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

बॅटिंगसाठी आलेल्या मुंबईची निराशाजनक सुरुवात राहिली. मुंबईला 7 धावांवर पहिला धक्का क्विंटन डी कॉकच्या रुपात लागला. क्विंटन 6 धावांवर आऊट झाला. त्यानंतर इशान किशन आणि सूर्यकुमार यादव दोघांनी चांगली खेळी केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 83 धावांची भागीदारी केली. ही जोडी कार्तिक त्यागीने मोडली. कार्तिकने इशान किशनला 37 धावांवर बाद केलं. किशनने 36 चेंडूत 37 धावा केल्या. यामध्ये किशनने 4 फोर आणि 1 सिक्स लगावला. इशाननंतर सूर्यकुमार यादव 40 धावावंर बाद झाला. त्याने या खेळीत 26 चेंडूत 4 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने 40 धावा केल्या. कर्णधार कायरन पोलार्डला आज विशेष करता आले नाही. पोलार्ड 6 रन्स करुन माघारी परतला.

झटपट विकेट्स गमावल्यानंतर हार्दिक पांड्या आणि सौरभ तिवारीने काही ओव्हर फटकेबाजी केली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी केली. सौरभ तिवारी फटकेबाजीच्या नादात 34 धावांवर बाद झाला. त्याने 24 चेंडूत 4 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने 34 धावा केल्या. सौरभनंतर कृणाल पांड्या मैदानात आला. कृणालच्या सोबतीने हार्दिकने तुफान फटकेबाजी केली. हार्दिकने 21 चेंडूत नाबाद 60 धावांची आक्रमक खेळी केली. यामध्ये 7 सिक्स आणि 2 फोर लगावले. राजस्थानकडून जोफ्रा आर्चर आणि श्रेयस गोपाळने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर कार्तिक त्यागीने 1 विकेट घेतली. IPL 2020 RR vs MI Live Score Update Today Cricket Match Rajasthan Royals vs Mumbai Indians Live स्कोअर

[svt-event title=”राजस्थानचा मुंबईवर धमाकेदार विजय” date=”25/10/2020,11:29PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बेन स्टोक्सचे शानदार शतक” date=”25/10/2020,11:28PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थानला विजयासाठी 4 ओव्हरमध्ये 24 धावांची गरज” date=”25/10/2020,10:51PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”संजू सॅमसनचे शानदार अर्धशतक” date=”25/10/2020,10:46PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी” date=”25/10/2020,10:41PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थान मजबूत स्थितीत” date=”25/10/2020,10:36PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थान 12 ओव्हरनंतर” date=”25/10/2020,10:29PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बेन स्टोक्सचे अर्धशतक” date=”25/10/2020,10:20PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थान 8 ओव्हरनंतर” date=”25/10/2020,10:09PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पावर प्लेच्या 6 ओव्हरनंतर राजस्थान” date=”25/10/2020,9:59PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थानला दुसरा धक्का” date=”25/10/2020,9:52PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”3 ओव्हरनंतर राजस्थान” date=”25/10/2020,9:43PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थानला पहिला धक्का” date=”25/10/2020,9:38PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थानला विजयासाठी 196 धावांचे आव्हान” date=”25/10/2020,9:16PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हार्दिक पांड्याचे तडाखेदार अर्धशतक” date=”25/10/2020,9:13PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईचा अर्धा संघ तंबूत” date=”25/10/2020,9:06PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”17 ओव्हरनंतर मुंबई” date=”25/10/2020,8:58PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबई 15 ओव्हरनंतर” date=”25/10/2020,8:46PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”14 ओव्हरनंतर मुंबई” date=”25/10/2020,8:42PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईला चौथा धक्का” date=”25/10/2020,8:38PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईला तिसरा धक्का” date=”25/10/2020,8:34PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईला दुसरा धक्का” date=”25/10/2020,8:32PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”10 ओव्हरनंतर मुंबई” date=”25/10/2020,8:31PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पावर प्लेच्या 6 ओव्हरनंतर मुंबई” date=”25/10/2020,8:29PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईला पहिला धक्का” date=”25/10/2020,8:28PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”असे आहेत दोन्ही संघ” date=”25/10/2020,7:15PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईची टीम” date=”25/10/2020,7:15PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थानची टीम” date=”25/10/2020,7:14PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईने टॉस जिंकला” date=”25/10/2020,7:12PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

मुंबईने यंदाच्या मोसमात आतापर्यंत एकूण 10 सामने खेळले आहेत. यापैकी 7 सामन्यात मुंबईने विजय मिळवला आहे, तर 3 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मुंबई पॉइंट्सटेबलमध्ये 14 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर राजस्थान रॉयल्स 8 गुणांसह 7 व्या क्रमांकावर आहे.

मुंबई विरुद्ध राजस्थान

आयपीएलमध्ये आतापर्यंत राजस्थान आणि मुंबई एकूण 21 सामन्यात आमनेसामने भिडले आहेत. या 21 पैकी 11 सामन्यात मुंबईने राजस्थानवर विजय मिळवला आहे. तर राजस्थानने 10 मॅचेसमध्ये मुंबईला पराभवाची धूळ चारली आहे.

संबंधित बातम्या :

IPL 2020, MI vs RR : मुंबई इंडियन्सचा राजस्थानवर 57 धावांनी ‘रॉयल’ विजय

IPL 2020 RR vs MI Live Score Update Today Cricket Match Rajasthan Royals vs Mumbai Indians Live

भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.