RR vs PBKS : वडिल टेंपोचालक, क्रिकेट खेळण्यासाठी बूट नव्हते, तीन महिन्यांपू्वी भावाची आत्महत्या, IPL पदार्पणाच्या सामन्यात भल्याभल्यांना नाचवलं

मुंबई : आयपीएलच्या 14 व्या पर्वातील चौथा सामना आज राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज (Rajasthan Royals vs punjab Kings) यांच्यात खेळवण्यात आला. मुंबईच्या वानखेडे मैदानावर (Wankhede Stadium Mumbai) खेळवण्यात आलेल्या थरारक सामन्यात पंजाबने राजस्थानवर अवघ्या 4 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने राजस्थानसमोर 221 धावांचा डोंगर उभा केला होता. परंतु राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू […]

RR vs PBKS : वडिल टेंपोचालक, क्रिकेट खेळण्यासाठी बूट नव्हते, तीन महिन्यांपू्वी भावाची आत्महत्या, IPL पदार्पणाच्या सामन्यात भल्याभल्यांना नाचवलं
Chetan Sakariya
Follow us
| Updated on: Apr 13, 2021 | 12:25 AM

मुंबई : आयपीएलच्या 14 व्या पर्वातील चौथा सामना आज राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज (Rajasthan Royals vs punjab Kings) यांच्यात खेळवण्यात आला. मुंबईच्या वानखेडे मैदानावर (Wankhede Stadium Mumbai) खेळवण्यात आलेल्या थरारक सामन्यात पंजाबने राजस्थानवर अवघ्या 4 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने राजस्थानसमोर 221 धावांचा डोंगर उभा केला होता. परंतु राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने झंझावती शतक झळकावत सामना आपल्या बाजूने फिरवला होता. परंतु शेवटच्या चेंडूवर संजूला षटकार ठोकता आला नाही, त्यामुळे हा सामना राजस्थानने गमावला. या सामन्यात राजस्थानचा अजून एक खेळाडू चमकला. चेतन सकारिया (Chetan Sakariya) असं या खेळाडूचं नाव आहे. चेतनने आजच्या सामन्याद्वारे आयपीएलमध्ये पदार्पण केलं आहे. (IPL 2021 : Chetan Sakariya left arm Fast Bowler from Saurashtra debuts Rajasthan Royals vs Punjab Kings)

राजस्थान रॉयल्सने फेब्रुवारीत झालेल्या लिलावात 1.20 कोटी रुपयांत चेतनला आपल्या ताफ्यात सामावून घेतलं होतं. चेतन सौराष्ट्रच्या वतीने देशांतर्गत क्रिकेट खेळतो. अलीकडेच त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये शानदार प्रदर्शन केलं होतं. यात त्याने पाच सामन्यांमध्ये 12 विकेट घेतल्या होत्या आणि त्याचा इकोनॉमी 5 च्या आसपास होता. गेल्या वर्षी सौराष्ट्रला रणजी करंडक स्पर्धेत विजय मिळवून देण्यात त्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. 23 वर्षीय सकारियाने मोठ्या संघर्षासह त्याचं क्रिकेट करिअर बनवलं आहे.

चेतन साकारिया आतापर्यंत सौराष्ट्रसाठी 15 प्रथम श्रेणी आणि 16 टी -20 सामने खेळला आहेत. त्यात त्याने अनुक्रमे 41 आणि 28 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर, त्याने लिस्ट ए क्रिकेटमध्ये सात सामन्यांत 10 विकेट्स घेतल्या आहेत. 2018-19 च्या हंगामापासून त्याने प्रथम श्रेणीमध्ये डेब्यू केला. जेव्हा तो सौराष्ट्रच्या संघाकडून खेळू लागला तेव्हा त्याच्याकडे क्रिकेट शूजही नव्हते. त्यानंतर त्याला त्याचा साथीदार शेल्डन जॅक्सनने मदत केली होती. नेट प्रॅक्टिस दरम्यान जॅक्सन त्याला म्हणाला होता की, जर चेतनने त्याला बाद केलं तर तो त्याला शूज गिफ्ट करेल. सकारियाने जॅक्सनला बाद केलं. त्यानंतर जॅक्सनने त्याला शूज गिफ्ट केले.

आयपीएल 2020 मध्ये बंगळुरुचा नेट गोलंदाज

आयपीएल 2020 मध्ये चेतन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा नेट गोलंदाज होता. तो या संघासह युएईलाही गेला. आरसीबीचे प्रशिक्षक माइक हेसन आणि सायमन कॅटिच यांनीही त्याचं कौतुक केलं होतं. आयपीएल 2021 च्या लिलावादरम्यान आरसीबीने त्याच्यावर बोली लावली होती. परंतु राजस्थानने अधिक बोली लावून सकारियाला आपल्या संघात सामावून घेतलं.

डावखुरा वेगवान गोलंदाज चेतन सकारिया साधारण कौटुंबिक पार्श्वभूमीवरुन आला आहे. दोन वर्षांपूर्वीपर्यंत त्याचे वडील टेम्पोचालक होते. तर पाच वर्षांपूर्वीपर्यंत त्याच्या घरात टीव्हीदेखील नव्हता. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्याने चांगलं शिक्षण घेऊन एखादी चांगली नोकरी करावी, अशी त्याच्या कुटुंबियांची इच्छा होती. परंतु त्याच्या चुलत्याने त्याला त्यांच्या दुकानात काम करायला सांगितले आणि त्याच्या शिक्षण आणि खेळाचा खर्च उचलला.

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीदरम्यान भावाची आत्महत्या

चेतन साकारिया जानेवारी 2021 मध्ये सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत सौराष्ट्राकडून खेळत होता. त्याचदरम्यान त्याच्या धाकट्या भावाने राहत्या घरी आत्महत्या केली होती. चेतन त्यावेळी टीमबरोबर बायो बबलमध्ये होता. अशा परिस्थितीत त्याच्या कुटुंबियांनी त्याला याबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. आयपीएल 2021 च्या लिलावात राजस्थान संघाने मोठी बोली लावत चेतनला संघात सामील करुन घेतलं, तेव्हा चेतनने म्हटलं होतं की, जर आज माझा धाकटा भाऊ असता तर त्याला खूप आनंद झाला असता.

संबंधित बातम्या

RR vs PBKS Match Result : संजू सॅमसनचं झंझावाती शतक, शेवटच्या बॉलवर सिक्स मारण्यात अपयश, राजस्थान जिंकता जिंकता हरला!

RR vs PBKS Playing 11 IPL 2021: विराटच्या खास माणसाचा आज डेब्यू तर पंजाबकडून खेळणार शाहरुख खान, वाचा दोन्ही संघाची प्लेईंग 11!

IPL 2021 : राजस्थान रॉयल्सला चॅम्पियन कसं बनवणार? नवोदित कर्णधार संजू सॅमसनने सांगितला संपूर्ण प्लॅन!

(IPL 2021 : Chetan Sakariya left arm Fast Bowler from Saurashtra debuts Rajasthan Royals vs Punjab Kings)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.