IPL 2021 : आर अश्विनचा आयपीएल स्पर्धा सोडण्याचा निर्णय, ट्विट करुन घोषणा, दिल्लीला धक्का!

भारतीय संघाचा दिग्गज फिरकीपटू आणि आयपीएलच्या (IPL 2021) दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाच्या गोलंदाजीचं प्रमुख अस्त्र आर अश्विनने (R Ashwin) आयपीएल 2021 च्या उरलेल्या सामन्यांतून माघार घेतली आहे. (IPL 2021 Delhi Capital R Ashwin Break From IPL 2021 Due To Family Member fight Covid 19)

IPL 2021 : आर अश्विनचा आयपीएल स्पर्धा सोडण्याचा निर्णय, ट्विट करुन घोषणा, दिल्लीला धक्का!
आर अश्विनचा आयपीएल स्पर्धा सोडण्याचा निर्णय
Follow us
| Updated on: Apr 26, 2021 | 1:04 PM

नवी दिल्ली : भारतीय संघाचा दिग्गज फिरकीपटू आणि आयपीएलच्या (IPL 2021) दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाच्या गोलंदाजीचं प्रमुख अस्त्र आर अश्विनने (R Ashwin) आयपीएल 2021 च्या उरलेल्या सामन्यांतून माघार घेतली आहे. सध्या माझं कुटुंब हलाखीच्या परिस्थितीतून जात आहे. कोरोनाने होत्याचं नव्हतं केलंय. माझं कुटुंब कोरोनाचा सामना करत आहे. अशावेळी मी त्यांच्यासोबत असणं महत्त्वाचं वाटतं. त्याचमुळे मी उरलेल्या सामन्यांतून माघार घेत आहे, अशी घोषणा आर अश्विनने ट्विट करुन केली आहे. (IPL 2021 Delhi Capital R Ashwin Break From IPL 2021 Due To Family Member fight Covid 19)

अश्विनने आयपीएल स्पर्धा अर्ध्यावर सोडली, ट्विटमध्ये अश्विन काय म्हणाला?

आयपीएल स्पर्धा सोडण्याचा निर्णय जाहीर करताना अश्विनने ट्विटमध्ये म्हटलंय, “आयपीएलच्या 14 व्या पर्वात मी उद्यापासून ब्रेक घेतोय. माझे कुटुंबीय कोरोनाविरुद्ध लढा देत आहेत. या कठीण काळात मी माझ्या कुटुंबासमवेत असावं असं मला वाटतं. जर पुढील गोष्टी योग्य दिशेने घडत गेल्या तर मी पुन्हा दिल्लीसाठी खेळायला येईन ”

अश्विनचं कुटुंब कोरोनाशी लढतंय…

रवीचंद्रन अश्विनचं कुटुंब सध्या कोरोनाशी दोन हात करतंय. अशा कठीण काळी अश्विनने कुटुंबासमवेत राहण्याचा निर्णय घेतलाय. अश्विनने आयपीएच्या 14 व्या पर्वात दिल्लीसाठी 5 मॅचेस खेळल्या आहेत ज्यामध्ये त्याने केवळ 1 विकेट घेतली आहे. स्पर्धेमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेणारा अश्विन हा एकमेव खेळाडू आहे.

चेन्नई, पंजाब व्हाया दिल्ली- अश्विनचा प्रवास

चेन्नई सुपर किंग्ज आणि किंग्ज इलेव्हन पंजाब या संघांसाठी अश्विन याअगोदर खेळला होता. आताच्या मोसमात तो दिल्लीकडून खेळतो आहे. 2020 च्या हंगामाअगोदर दिल्लीने त्याला 7 कोटी 60 लाख रुपये देऊन खरेदी केली आहे.

अश्विनची आयपीएल कारकीर्द

आर अश्विन दिल्लीचा बिनीचा शिलेदार आहे. केवळ अश्विन संघात असण्याने संघाला मोठा धीर असतो. तो विकेट टेकर फिरकीपटू आहे. अश्विन आतापर्यंत 159 आयपीएल मॅचेस खेळला आहे. त्यामध्ये त्याने 139 विकेट्स घेतल्या आहेत. शिवाय त्याच्या नावावर 419 रन्स देखील आहेत.

(IPL 2021 Delhi Capital R Ashwin Break From IPL 2021 Due To Family Member fight Covid 19)

हे ही वाचा :

IPL 2021 : सर जाडेजाच्या बहारदार बॅटिंगला साक्षीचा सलाम, पोस्ट शेअर करत म्हणाली…

IPL 2021 : चेन्नईविरुद्धची मॅच हारल्यानंतरही विराट कोहली भलताच खूश, म्हणतो, ‘सर जाडेजा इज ग्रेट…!’

IPL 2021 : ‘जिसे डरते थे, वहीं बात हो गयी’, चेन्नईविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीला ‘डबल धक्का’!

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.