AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021 : सिनिअर खेळाडूंना बाजूला सारत रिषभ पंत दिल्लीच्या कर्णधारपदी, सोशल मीडियावर नेटकऱ्यांचं ‘ट्रोलिंग वर्क!’

दिल्ली कॅपिटल संघात शिखर धवन, स्टीव्ह स्मिथ, अजिंक्य रहाणे आणि रविचंद्रन अश्विन सारखे सिनिअर खेळाडू असूनही रिषभ पंतला दिल्लीचं कर्णधारपद देण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाने घेतला आहे.

IPL 2021 : सिनिअर खेळाडूंना बाजूला सारत रिषभ पंत दिल्लीच्या कर्णधारपदी, सोशल मीडियावर नेटकऱ्यांचं 'ट्रोलिंग वर्क!'
Rishabh Pant troll On Social Media
Akshay Adhav
Akshay Adhav | Updated on: Mar 31, 2021 | 9:39 AM
Share

मुंबई :  सिनिअर खेळाडूंना बाजूला सारत दिल्ली कॅपिलल्सच्या कर्णधारपदी युवा खेळाडू रिषभ पंतच्या नावाची घोषणा झाली आहे. दिल्ली कॅपिटल्सचा दिग्गज खेळाडू आणि कर्णधार श्रेयस अय्यर (Shyeyas Iyer) दुखापतग्रस्त असल्याने त्याच्या ऐवजी रिषभ पंतवर (Rishabh pant) संघाच्या कर्णधापदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. रहाणे, धवन, स्मिथ, अश्विन अशा एकापेक्षा एक दिग्गज खेळाडूंना पछाडत पंतने बाजी मारली. यानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर सिनिअर खेळाडूंना ट्रोल करायला सुरुवात केली आहे. (IPL 2021 Delhi Capital Rishabh Pant Annoucement DC Captain Rahane Ashwin Shikhar Steve Smith Troll On Social Media)

दिल्ली कॅपिटल संघात शिखर धवन, स्टीव्ह स्मिथ, अजिंक्य रहाणे आणि रविचंद्रन अश्विन सारखे सिनिअर खेळाडू असूनही रिषभ पंतला दिल्लीचं कर्णधारपद देण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाने घेतला आहे. कर्णधारपद न मिळाल्याने स्टीव्ह स्मिथ, अजिंक्य रहाणे, रविचंद्रन अश्विन, शिधप धवनला या सिनिअर खेळाडूंना ट्विटरवर ट्रोल केले जात आहे. यावरुन नेटकरी मिम्स बनवून सिनिअर खेळाडूंना ट्रोल करत आहेत.

नेटकऱ्यांचे भन्नाट मिम्स

सिनिअर खेळाडू बाजूला, संघ व्यवस्थापनाचा रिषभवर विश्वास

श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाल्यानंतर दिल्लीच्या कर्णधारपदी कोण, असा मोठा प्रश्न होता. अजिंक्य रहाणे, शिखर धवन, रवीचंद्रन अश्विन, स्टीव्ह स्मिथ अशी दिग्गज नावं दिल्लीच्या कर्णधारपदाच्या शर्यतीत होती. परंतू या सगळ्या नावांना पिछाडीवर टाकत संघ व्यवस्थापनाने आणि दिल्लीच्या फ्रॅचायझीने रिषभचा फॉर्म पाहता त्याच्यावर विश्वास टाकला आहे.

दिल्लीचं नेतृत्व करणं हा माझ्यासाठी सर्वोत्तम आनंदाचा क्षण

“नव्या जबाबदारीसंबंधी बोलताना रिषभ म्हणाला, दिल्ली जिथे मी वाढलो, जिथे सहा वर्षांपूर्वी मी आयपीएलचा माझा प्रवास सुरु केला, त्याच संघाचा एक दिवस कर्णधार व्हायचं, असं माझं स्वप्न होतं. ते स्वप्न आझ प्रत्यक्षात उतरलंय. मी सन्मानित झाल्याची फिलिंग अनुभवतोय.”

“ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट असेल. येणाऱ्या हंगामात मी माझ्याकडून 100 टक्के देण्याचा प्रयत्न करेल, असा विश्वास संघ व्यवस्थापनाला देतो कारण कर्णधारपदाच्या जबाबदारीला त्यांनी मला लायक समजलं”, असं रिषभ पंत म्हणाला.

(IPL 2021 Delhi Capital Rishabh Pant Annoucement DC Captain Rahane Ashwin Shikhar Steve Smith Troll On Social Media)

हे ही वाचा :

सचिनसाठी शोएब अख्तरने अल्लाहकडे मागितली दुवा, म्हणाला…

IPL 2021 : यंदाच्या पर्पल कॅपचा मानकरी कोण? हे 4 बोलर्स प्रबळ दावेदार…

IPL 2021 : “माही भाईच्या नेतृत्वात खेळणं हा माझ्यासाठी गर्वाचा आणि आनंदाचा क्षण”

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली