Mahendra Singh Dhoni | कामगिरी हिट कमाई सुपरहिट, धोनीचा कमाईबाबत तगडा रेकॉर्ड

महेंद्रसिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) आपल्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्ज्सला 3 वेळा आयपीएलचं विजेतेपद मिळवून दिले आहे.

Mahendra Singh Dhoni | कामगिरी हिट कमाई सुपरहिट, धोनीचा कमाईबाबत तगडा रेकॉर्ड
महेंद्रसिंह धोनी

मुंबई : अवघ्या काही दिवसांवर आयपीएलचा 14 वा हंगाम (IPL 2021) येऊन ठेपला आहे. क्रिकेट चाहते आयपीएलची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत. या मोसमाची तारीखही जवळपास निश्चित झाली आहे. तसेच यंदा या 14 व्या पर्वाचं आयोजनही भारतात करण्यात आलं आहे. 18 फेब्रुवारीला खेळाडूंचा लिलाव होणार आहे. या लिलाव प्रक्रियेसाठी सर्व फ्रॅंचायजींने रिटेन आणि रिलीज खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. चेन्नई सुपर किंग्जसने कॅप्टन (Mahednra singh Dhoni) महेंद्रसिंह धोनीला (Chennai Super Kings) रिटेन केलं आहे. यासह धोनीने आणखी एक रेकॉर्ड केला आहे. (ipl 2021 ms dhoni has become highest earning player in ipl history)

काय आहे रेकॉर्ड?

धोनी आयपीएलमधून 150 कोटी रुपये कमावणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे. अशी कमाई करणारा तो एकमेव खेळाडू ठरला आहे. चेन्नईने धोनीला रिटेन करण्याआधी त्याची कमाई ही 137 कोटी इतकी होती. धोनी एका मोसमात खेळण्यासाठी 15 कोटी आकारतो. आगामी मोसमातील मानधनाची रक्कम जोडल्यावर धोनीच्या कमाईचा आकडा हा  150  कोटी पार गेला आहे.

सर्वाधिक कमाई करणारे खेळाडू

धोनीनंतर सर्वाधिक कमाईच्या बाबतीत रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना आणि एबी डीव्हीलियर्सचा क्रमांक लागतो. रोहितने 131 कोटी 6 लाख रुपयांची कमाई केली आहे. रोहितने आपल्या कॅपटन्सीमध्ये मुंबई इंडियन्सला तब्बल 5 वेळा विजेतेपद मिळवून दिलं आहे. रोहित या स्पर्धेतील एकमेव यशस्वी कर्णधार आणि खेळाडू आहे. त्याने बॅटिंगसह बोलिंगनेही शानदार कामगिरी केली आहे. रोहितने आयपीएलमध्ये हॅटट्रिक घेण्याची कामगिरी केली आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीचा कमाईच्या बाबतीत तिसरा क्रमांक लागतो. विराटने आतापर्यंत एकूण 126 कोटी 6 लाख कमावले आहेत. या 14 व्या मोसमानंतर विराटही 130 कोटींचा आकडा ओलांडणार आहे. विराटला अजूनही बंगळुरुला आपल्या नेतृत्वामध्ये जेतेपद मिळवून देता आलेले नाही.

100 कोटींच्या क्लबमध्ये समावेश

मिस्टर आयपीएल सुरेश रैना आणि मिस्टर 360 एबी डीव्हीलियर्सचा 100 कोटी कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत समावेश झाला आहे. रैनाने 2021 आधी 99. 7 कोटींची कमाई केली. तर डिव्हीलियर्सने आतापर्यंत आयपीएलमधून 91.5 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 14 व्या सिझनमधील अकरा कोटींचं मानधन धरुन हा आकडा 102.5 कोटींवर जाईल.

धोनी आयपीएल इतिहासातील यशस्वी कर्णधार

धोनी आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील यशस्वी कर्णधार राहिला आहे. धोनी आयपीएलच्या सुरुवातीपासून चेन्नईचे नेतृत्व करतोय. धोनीने आपल्या नेतृत्वात चेन्नईला 2010, 2011 आणि 2018 मध्ये विजेतेपद मिळवून दिलं आहे. धोनी आणि चेन्नईची 13 व्या मोसमात निराशाजनक कामगिरी राहिली. यामुळे इतिहासात पहिल्यांदाज चेन्नईचं आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आलं होतं.

संबंधित बातम्या :

Ab De Villiers मालामाल; धोनी, विराट, रोहितनंतर IPL मध्ये सर्वाधिक कमाई

IPL 2021 | लवकरच चौकार षटकार, आयपीएलच्या 14 व्या मोसमाची तारीख जवळपास निश्चित

Suresh Raina | ‘मिस्टर आयपीएल’ सुरेश रैनाचा कमाईबाबत विक्रम, मानाच्या पंगतीत स्थान

(ipl 2021 ms dhoni has become highest earning player in ipl history)

Published On - 1:05 pm, Tue, 2 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI