AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021 | आयपीएलच्या 14 व्या मोसमाआधी राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का, स्टार खेळाडूची माघार

आयपीएलच्या 14 व्या मोसमाला (IPL 2021) 9 एप्रिलपासून पासून सुरुवात होत आहे. त्याआधी राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर (Jofra Archer) माघार घेणार असल्याचं समजत आहे.

IPL 2021 | आयपीएलच्या 14 व्या मोसमाआधी राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का, स्टार खेळाडूची माघार
आयपीएलच्या 14 व्या मोसमाला (IPL 2021) 9 एप्रिलपासून पासून सुरुवात होत आहे. त्याआधी राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर (Jofra Archer) माघार घेणार असल्याचं समजत आहे.
| Updated on: Mar 21, 2021 | 10:48 AM
Share

अहमदाबाद : आयपीएलचा 14 वा हंगाम (IPL 2021) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सर्व संघ आपल्या परीने तयारीला लागले आहेत. त्याआधी राजस्थान रॉयल्ससाठी (Rajasthan Royals ) एक वाईट बातमी येत आहे. राजस्थानचा स्टार गोलंदाज जोफ्रा आर्चर (Jofra Archer) आयपीएलच्या 14 व्या पर्वातून माघार घेणार असल्याचं समजतंय. त्यामुळे हा राजस्थान टीमसाठी एक मोठा धक्का समजला जात आहे. (IPL 2021 Rajasthan Royals fast bowler Jofra Archer likely to withdraw from 14th season)

जोफ्रा माघार घेणार असल्याचं वृत्त द टेलिग्राफने दिलं आहे. रिपोर्टमध्ये म्हटलंय की, इंग्लंडसाठी जास्तीत जास्त खेळण्यासाठी जोफ्रा हा निर्णय घेऊ शकतो. कसोटीत उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी तो अधिक वेळ देऊ इच्छित आहे. तसेच जोफ्राला काही दुखापतीही आहेत. त्याच्या हाताला दुखापत आहे. त्यावर तो उपचार घेत आहे. यामुळे जोफ्रा 14 व्या पर्वातून माघार घेऊ शकतो.

2018 पासून राजस्थानचे प्रतिनिधित्व

जोफ्रा 2018 पासून राजस्थानचे प्रतिनिधित्व करत आहे. जोफ्रा राजस्थानचा महत्वाचा गोलंदाज आहे. जोफ्राने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील एकूण 35 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 7.13 च्या इकॉनॉमीने 46 विकेट्स घेतल्या आबेत. तसेच 195 धावाही केल्या होत्या. जोफ्राने आयपीएलच्या 13 व्या मोसमात 20 विकेट्स घेतल्या होत्या. जोफ्रा आयपीएलमध्ये 2018 पासून राजस्थानसाठी निर्णायक भूमिका पार पाडत आहे. जोफ्राला राजस्थानने 2018 मध्ये 7 कोटी 20 लाख मोजून आपल्या ताफ्यात घेतलं होतं.

भारत दौऱ्यात शानदार कामगिरी

इंग्लंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील कसोटी आणि टी 20 मालिका पार पडली आहे. जोफ्राने या टी 20 मालिकेतील 5 सामन्यात एकूण 7 विकेट्स घेतल्या. जोफ्राने या मालिकेत आपल्या अचूक आणि भेदक माऱ्याने भारतीय फलंदाजांना जेरीस आणले. दरम्यान टी 20 मालिकेनंतर आता उभयसंघात एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे.

2019 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण

जोफ्रा मुळचा बारबाडोसचा आहे. त्याने 2019 च्या वर्ल्ड कपआधी पदार्पण केलं होतं. इंग्लंडने हा वर्ल्ड कप जिंकला होता. यामध्ये जोफ्राने निर्णायक भूमिका बजावली होती. त्यानंतर जोफ्राला कसोटीमध्ये खेळण्याची संधी मिळाली. जोफ्राने आतापर्यंत तिनही फॉर्मेटमध्ये मिळून एकूण 41 सामने खेळले आहेत. यात त्याने एकूण 86 विकेट्स घेतल्या आहेत.

9 एप्रिलपासून आयपीएलला सुरुवात

दरम्यान आयपीएलच्या 13 व्या मोसमाला 9 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. या मोसमात एकूण 56 साखळी सामने खेळवण्यात येणार आहे. ही स्पर्धा एकूण 51 दिवस रंगणार आहे. या पर्वाचे आयोजन एकूण 6 शहरांमध्ये करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या :

IPL Rajasthan Royals Team 2021 | ख्रिस मॉरिसकडून रेकॉर्ड ब्रेक, विराटचा ‘हा’ खेळाडूही ताफ्यात, पाहा राजस्थानची टीम

IPL 2021 Time Table | आयपीएलच्या 14 व्या मोसमाचं वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखेपासून रंगणार थरार

(IPL 2021 Rajasthan Royals fast bowler Jofra Archer likely to withdraw from 14th season)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.