विराट कोहलीचं होणार मंदीर, बड्या अभिनेत्याने केली मोठी घोषणा; नेमकी अट काय?
एका अभिनेत्याने विराट कोहलीचं थेट मंदीर उभं करण्याची शपथ घेतली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात नेमकं काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

PBKS Vs RCB Final Match : सध्या आयपीएलची सगळीकडे चर्चा आहे. आज (3 जून) पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अंतिम लढत होणार आहे. म्हणजेच या सामन्यात जो संघ विजयी होईल, तो थेट ट्रॉफी घरी घेऊन जाणार आहे. दरम्यान गेल्या कित्येक वर्षांपासून बंगळुरू संघ जेतेपदासाठी प्रयत्न करतो. पण अद्याप या संघाला ट्रॉफी घरी नेता आलेली नाही. असे असतानाच आता एका अभिनेत्याने बंगळुरू संघ जिंकला तर स्टार क्रिकेटर विराट कोहलीचं थेट मंदीर बांधणार असल्याचं जाहीर केलं आहे.
सगळे करतायत देवाकडे प्रार्थना
आज अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर बंगळुरू आणि पंजाब किंग्स ज्यांच्यात हा अंतिम सामना होणार आहे. गेल्या 18 वर्षांपासून बंगळुरू संघ विजेता व्हावा यासाठी या संघाचे फॅन्स देवाकडे प्रार्थना करत आहेत. विराट कोहलीचे फॅन्सनादेखील बंगळुरूने विजयी व्हावे यासाठी प्रार्थना करत आहेत. असे असतानाच प्रसिद्ध टीव्ही अभिनेता नकुल मेहता याने तर बंगळुरू संघ विजयी झाला तर मी विराटचे मंदीर बांधतो असं जाहीर करून टाकलंय.
विजय माल्याच्या कर्जाचीही परतफेडही करेन
एवढंच नाही तर बंगळुरू संघ जिंकला तर मी कानडी भाषादेखील शिकतो. तसेच मी साऊथ इंडियन जेवण खाण्यालाही सुरुवात करेन, असं या अभिनेत्याने म्हटलंय. बंगळुरू संघ जिंकला तर मी विजय माल्याच्या कर्जाचीही परतफेडही करेन, असं त्याने मस्करीत म्हटलंय. दरम्यान, पंजाब आणि बंगळुरू यांच्यातील अंतिम सामन्याला सुरुवात झाली आहे. बंगळुरू संघ फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला आहे. तर पंजाब किंग्स संघ गोलंदाजी करतोय. या सामन्यात विराट कोहली नेमकं काय करणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
View this post on Instagram
18 वर्षांपासूनचं स्वप्न पूर्ण होणार का?
दरम्यान, गेल्या 18 वर्षांपासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ आयपीएलमध्ये खेळतोय. पण या संघाला एकदाही आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरता आलेलं नाही. या संघात विराट कोहली असल्यामुळे त्याच्याही लाखो चाहत्यांना बंगळुरू संघाने ट्रॉफी जिंकावी, असे वाटते. त्यामुळे गेल्या 18 वर्षांपासून पाहिलेलं हे स्वप्न आज पूर्ण होणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
