AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 : पंजाबच्या विजयी सलामीनंतरही कॅप्टन अडचणीत, श्रेयस अय्यरला मोठा धक्का , ‘ती’ कृती पडणार महागात

Shreyas Iyer: आयपीएलमध्ये पंजाब किंग्सने विजय सलामी देत दमदार सुरूवात केली. मात्र असं असलं तरी कर्णधार श्रेयस अय्यर हा अडचणीत सापडला असून त्याला मोठा फटका बसला आहे. नेमकं काय झालं ?

IPL 2026 : पंजाबच्या विजयी सलामीनंतरही कॅप्टन अडचणीत, श्रेयस अय्यरला मोठा धक्का , 'ती' कृती पडणार महागात
श्रेयस अय्यर
| Updated on: Apr 01, 2026 | 12:30 PM
Share

इंडियन प्रीमियर लीग अर्थात IPL 2026 स्पर्धेला जोरदार सुरूवात झाली असून कालच्या सामन्यात पंजाब किंग्सच्या संघाने गुजरात टायटन्सचा पराभव करत विजयी सलामी दिली. मा्त्र असं असलं तरी ही मॅच पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरसाठी खास नव्हता. आधी तर त्याला मॅचदरम्यानच दुखापत झाली आणि विजयी सलामीनंतरही आता त्याला मोठा फटका बसला आहे. त्याचं कारण म्हणजे त्याला आता दंड भरावा लागणार आहे. पंजाब किंग्स (PBKS) चा कॅप्टन असलेल्या श्रेयस अय्यरवर दंडाची कारवाई करण्याचा निर्णय आयपीएल कमिटीने घेतला आहे.

पंजाब किंग्सने (PBKS) गुजरात टायटन्सवर (GT) मिळवलेल्या विजयानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) श्रेयस अय्यरला 12 लाख रुपयांचा मोठा दंड ठोठावला आहे. इंडियन प्रीमियर लीग 2026 (आयपीएल) मध्ये काल मंगळवारी (31 मार्च) न्यू चंदीगड येथील महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर गुजरात वि. पंजबा हा सामना खेळला गेला. 2025 च्या अंतिम फेरीतील संघ असलेल्या पंजाबने, कालचा सामना तीन गडी राखून जिंकला. यामध्ये पदार्पण करणाऱ्या कूपर कॉनोलीने 44 चेंडूंमध्ये नाबाद 72 धावा करून विजयात मोलाचा वाटा बजावला आणि सामनावीर (POTM) पुरस्कार पटकावला.

श्रेयसला दंड का ?

पंजाबने आयपीएल २०२६ मधील आपला सलामीचा सामना गुजरात टायटन्सविरुद्ध 3 गडी राखून जिंकला. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 20 षटकांत 162 धावा केल्या. प्रत्युत्तरात, पंजाब किंग्सने 19.1 षटकांत 7 गडी गमावून 163 धावांचे लक्ष्य पूर्ण केले. सांघिक कामगिरीच्या दृष्टीने, हा सामना पंजाब किंग्ससाठी चांगला ठरला. पण, फक्त श्रेयस अय्यरबद्दल बोलायचं झाल तर, त्याच्या हाताला दुखापत झाली, तो फक्त 18 धावांवर स्वस्तात बाद झाला आणि त्यानंतर त्याला दंडही ठोठावण्यात आला.

ओव्हर रेट स्लो ठेवल्याबद्दल पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएलने जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकानुसार, ओव्हर रेट कमी ठेवल्याच्या नियमाचे उल्लंघन करण्याची पंजाब किंग्सची ही पहिलीच वेळ असल्याने कर्णधार श्रेयस अय्यरला 12 लाख रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे. यामुळे तो चांगलाच अडचणीत सापडला आहे.

मागील वर्षांप्रमाणे, श्रेयसवर आता अनेक चुकांसाठी बंदी घालण्याचा धोका नाही. 2025 च्या हंगामापासून, BCCIने आपल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बदल केला आहे. आयसीसीच्या आचारसंहितेनुसार आता डिमेरिट पॉइंट्स दिले जातात. पूर्वी, जर कर्णधाराच्या संघाने एका हंगामात तीन ओव्हर-रेटचे उल्लंघन केले, तर त्याच्यावर एका सामन्याची बंदी घातली जात असे. 2024 च्या हंगामात, ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्या (ज्याच्यावर 2025 हंगामाच्या पहिल्या सामन्यासाठी बंदी घालण्यात आली होती) यांना निलंबित करण्यात आले होते.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.